16/04/2018
My City My Responsibility - Aurangabad
With a sole motive to create a better neighbourhood! Join us...
आपले शहर घडवीन्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न! सामिल व्हा..
16/04/2018
06/12/2017
आपल्या शहरात चालायला नीट रस्ते नाही,पाणी नाही, आणि हे यांच्या ऑफिस साठी १५ लाख रुपये कसे खर्च करतात
जेव्हा शहराच्या विकासाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा म.न.पा. च्या तिजोरीत खडखडाट असतो मग आता एवढा अवाढव्य खर्च करायला पैसे कुठून येतो ?
आपण यांना `नगरसेवक` म्हणुन निवडून दिले आणि या `सेवकांना ` एवढी मस्ती येते कशी?
हे नक्की कोणाच्या जोरावर ? हे आपल्याच जोरावरच ना !
हे आपल्या पैशावर यांची हौस पुरवून घेतात
आणि आपण नेहमी अश्याच दळभद्री लोकांना निवडून देतो
यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे
आपण नुसतं षंडा सारखं यांचं कौतुक न बघता यांची जागा दाखवण्याची वेळ आणि आली आहे !
15/09/2017
एक तासाच्या पावसाने सारे शहर काल तुंबले.
याची जबाबदारी कुणाचीच नाही का, अनेक बिचारे नगरसेवक परेशान होत, धावपळ करताना दिसले, पण आज कुणी प्रशासनाला जाब विचारलाच नाही. याला काय म्हणावे ? भूमिगत गटार योजनेची वासलात लावलीत आणि वर या संदर्भातील प्रश्नांना टोलवत साऱ्या शहराला खेळवताय, काम सुरु झाल्यावर दोन-तीन वर्ष याची तपासणी नाही, पीएमसी नेमकी नेमली कशाला? पैशाला वाटा फोडणाऱ्या अशा अनेक युक्त्या करून मनपा शहराला वेठीस धरू पाहतेय. पीएमसी का पोसताय. पोसा पण त्यांना जाब का विचारला जात नाही. योजना नीट मार्गी लावणे हे त्यांचेही काम नाही का ? शहराचा सखल आणि उंच भाग यांना कळत नसेल तर असे सल्लागार काय कामाचे ? थर्ड पार्टी इन्स्पेक्शन योजना सुरु झाल्यावर दोन वर्षानी केले जाते हे कोणत्या आधारे, याला कुणी तरी वाचा फोडणार की नाही.?
भूमिगत चे काम सुरु होताच आम्ही काही सन्माननीय लोकप्रतिनिधी यांना या कामाच्या दर्जाबाबत आणि एकूणच भंपकगिरी बद्दल अवगत केले होते, तेव्हा आम्हालाच सांगण्यात आले, की अजून तर सुरुवात आहे, काम पुढे गेले की सगळे व्यवस्थित होणार आहे. आणखी काय व्यवस्थित व्हायचे राहिले...आमचे म्हणणे खोडून शहर खोदून काढले आणि आता या खोदकामाचा गबाळा कारभार शहराच्या माथी मारला जात आहे, शिवाय परस्पर योजनेही बदल केले. हे पाप कुणाच्या माथी मारणार ? मुख्य लाईन जोडल्याच गेल्या नाहीत, तरी काम पूर्ण होत आल्याचे संबंधित अधिकारी सांगतात, एवढे निर्लज्ज अधिकारी कुणाच्या जीवावर असे वागतात याचा विचार ही नगरसेवक मंडळी करणार आहेत की नाहीत ? का प्रत्येक बैठकीला तेच तेच प्रश्न आणि उत्तरादाखल बघतो, करतो. दरवेळी कोणत्याही योजनेत कंत्राटदाराला आधी पैसे देण्याची घाई केली जाते, मग काम जमले तर केले जाते. हे असे किती वर्ष चालणार.? भूमिगत चे तर पार वाटोळे केले आहे.
काढा योजनेची मूळ प्रत आणि बघा कितीदा बदल केला आणि अनेक महत्वाची कामे का कमी केली. याची गरज नव्हती तर आधी नियोजन करताना ही कामे का आखली गेली. घोटाळे आणि वाटोळे...तिजोरीवर वेटोळे हे समीकरण कधी तरी सोडा....आताही अनेक ज्येष्ठ मंडळी भूमिगत आता track वर आल्याचे सांगतात. पण हे वाटत नाही..हा कंत्राटदार अर्धवट काम करून निघून जाणार आणि पुन्हा दुरुस्त्या आणि त्या नावाखाली शहर खोदणे त्यासाठी पुन्हा तिजोरी खोदणे ! कब सुधारेगा ... यहां के अफसरोंको कौन संभाल रहा है...? बाकी नाल्यांचे गळे घोटणे तर वर्षानुवर्षे सुरु आहे, हे फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच समजले असे कसे म्हणता येईल? शहर दम तोडतेय....
09/08/2016
Aurangabad city today witnessed a massive protest rally against Kopardi Gang R**e incident.
27/02/2016
24/02/2016
निषेध !!
Share करा
Hon CM औरंगाबाद महापालिकेतून श्री.केंद्रेकर यांचा प्रभार काढून घेतल्याबद्दल धन्यवाद. निषेध तरी कशा कशाचा आणि कितीदा करायचा?
22/02/2016
निषेध !
औरंगाबादकर नागरिकहो ! वाचा आणि थंड बसा.......
अखेर योजनाबद्धरितीने राज्यशासनाने केंद्रेकर यांच्याकडील प्रभार काढून घेतला.
नवीन आयुक्त नियुक्ती होतेय...मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना लाख लाख धन्यवाद! अखेर आमचा कयास आपण खरा केलात, अन्यथा आम्हाला कुणाला तोंड दाखवायला जागा नव्हती! योजना तर पळवत आहात, अधिकारी तरी पळवू नका असे आम्हीआधीच म्हटले होते. अखेर ....
केंद्रेकर यांनी मनपातील बजबजपुरीवर घेतलेले निर्णय कुणाला सलले, कुणाला खुपले?
वरवर पाठींबा दर्शवत कुणी 'समांतर' मोहीम चालवून केंद्रेकर यांना घालवले का?
कुणाच्या डोक्यात 'एलईडी' चा प्रकाश पडल्याने हे घडले का ?
खुद्द मुख्यमंत्री महोदयांना इथला विकास नकोच आहे का?
स्थानिक भाजपा नेते (?) दुटप्पी वागतात का ?
की....
असे अनेक प्रश्न निर्माण करत नवीन आयुक्त नियुक्तीची बातमी येऊन थडकली आहे.
औरंगाबादकर तयार होणार आंदोलनाला.....?
- सारंग टाकळकर
सर्वांना आवाहन
यंदा पाऊसाने पाठ फिरवली आहे.
धरणातील पाणी कमी झाले आहे.
आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू.
रोज गाड्या धुवू नका.
अंगणात पाणी मारू नका.
सतत नळ चालू ठेऊ नका.
या संकटाचा एकत्र सामना करूया.
घरी पाहुणे येणे चालूच असते, कोणीही पूर्ण ग्लास पाणी पित नाही.
तरीही या भयंकर दुष्काळात पूर्ण ग्लास पाणी देऊन
"" अर्धे बाहेर फेकणे टाळावे ही विनंती.
Please save water !!!
01/08/2015
हीच का आपली जबाबदारी
रस्त्यावर कचरा फेकन्यापेक्षा कुंडीत टाकला तर कही बिघडेल का्य ?
या परिससतिल नागरिकांना नम्र विनंती ही सवय बदलायला हवी
या साठी आपली साथ हवी.......
या जगाला हेवा वाटेल अस आपल शहर घड्वुया..
Rokdiya Hanuman colony ,shivaji Highschool road
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Aurangabad
431001