SIP Abacus Bajaj Nagar Waluj MIDC
This is the official page of SIP Abacus - Bright Brain Abacus Waluj MIDC. run by SIP Academy India Pvt Ltd headquartered at Chennai.
SIP abacus training improves Learning ability of children between 7 to 12 years. Over 225000 kids across India is trained
21/06/2023
Advance level 2 upgradation at Chennai
SIP Abacus Bajaj Nagar Waluj MIDC
Anurag Pawar, SIP Bright Brain Abacus Aurangabad
National Mathematics day
11/04/2020
Enjoying online class in lockdown
शालेय विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता विकसित करणारा एकमेवाद्वितीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम : एसआयपी अबॅकस
पालकांसमोरील आव्हाने:
सर्व पालक आपापल्या मुलांच्या यशस्वीतेसाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात• आपल्या मुलांचे यश हेच सर्व पालकांच्या आयुष्याचे अंतिम ध्येय असते,
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याकरिता, किंवा लक्ष प्राप्त करण्यासाठी आपले ध्येय निश्चित करावे लागते आणि हे ध्येय गाठण्यासाठी अनुशासन, आणि कठोर परिश्रमाची आवश्यकता असते,दुसरे महत्त्वाचे म्हणजे
सध्याच्या गतिमान आधुनिक युगात मुलांच्या अध्ययन क्षमता अर्थात शिकण्याच्या क्षमता जर विकसित करता आल्या तर त्यांना आपले ध्येय गाठता येणे सहज शक्य होते; परंतु अध्ययन क्षमता विकसित करणे हे एक हे एक मोठे आव्हान आहे ,कारण सध्याच्या या गतिशील युगामध्ये मुलांना अनेक गोष्टी प्रभावित करीत आहेत ,विशेषतः फेसबूक, व्हॉट्सऍप ,इंस्टाग्राम यासारख्या गॅझेट मुळे ते मोठ्या प्रमाणावर विचलित होताना दिसून येतात ही एक मोठी समस्या पालक वर्गासमोर आहे• या परिस्थितीवर कशी मात करताकरताDear येईल याचा विचार आता बाल मानसशास्त्रज्ञही करू लागले आहेत ,अगदी लहान वयातच मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो हे वास्तव नाकारता येणार नाही त्यामुळे ते अभ्यासासाठी स्थिर होत नाहीत किंवा मुलं एकाग्रपणे किंवा स्थिर चित्त मनाने अभ्यासासाठी बसणे हे एक मोठे आव्हान आहे•शालेय विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे शाळेमध्ये शालेय अभ्यास असतो त्याच प्रमाणे त्यांना स्वतः किंवा पालकांना असे वाटते, आपल्या मुलांनी बहुआयामी असावं आणि त्यांचा सर्वंकष विकास व्हावा, त्यामुळे त्यांच्या छंदाची किंवा आवडीची जोपासना करण्यासाठी संगीत, तबला ,गायन ,खेळ स्विमिंग आदि अतिरिक्त क्लासेस लावले जातात आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे, तरुण वयात मुलांनी क्रीडांगणावर गेलच पाहिजे आणि त्यांनी आपल्या शरीराची मशागती केली पाहिजे तरच त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल;परंतु अनेक पालकांचा भर हा खाजगी क्लासेस वर अधिक असतो; मुलांना शाळेव्यतिरिक्त गणित सायन्स, इंग्रजी अशा अनेक विषयांच्या क्लासेस मध्ये अडकून टाकलेलं असतं अशा परिस्थितीत दिवसभराच्या या व्यस्त वेळापत्रकामुळे मुलं थकून जातात त्यामुळे त्यांच्या क्षमतांवर प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतात दिसून येतात, त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली वावरतात हे एक विदारक सत्य आहे• यायापार्श्वभूमीवr बाल मानसशास्त्रज्ञही पालकांच्या प्रबोधनासाठी अभ्यास वर्ग आणि कार्यशाळा योजू लागले आहेत, आणि मुलांना दबावातून किंवा तणावातून मुक्त करण्यासाठी अनेक उपाय योजना सुचवीत आहेत
अध्ययन क्षमतांचा विकास:
या सर्व गतिशील युगामध्ये जर आपण मुलांच्या अभ्यास करण्याच्या क्षमता विकसित करू शकलो तर अर्थात कमीत कमी वेळात अधिकाधिक अभ्यास करण्याची आणि नवनवीन शिकण्याची क्षमता विकसित करू शकलो आणि त्यांच्यामध्ये जीवन कौशल्यांचा विकास करू शकलो तर ते अधिक प्रभावीपणे नव्या आव्हानांना सामोरे जातील त्याचप्रमाणे त्यांचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध आणि संपन्न होऊ शकेल •अध्ययन क्षमता म्हणजे काय किंवा? त्या कशा आणि कोठे विकसित होतात? असे प्रश्न पालकांसमोर निश्चितच असतील अध्ययन क्षमतेचा थेट संबंध एकाग्रतेशी आहे. ...जर मुलांमध्ये बालवयातच आपण पण एकाग्रता विकसित करू शकलो तर त्यांची अभ्यास करण्याची क्षमता अतिशय विलक्षण होत जाते हे सिद्ध झाले आहे •ज्या मुलांची एकाग्रता चांगली आहे ती मुलं सर्वच विषयांमध्ये अतिशय चांगली प्रगती करतात आणि आनंदाने आपला अभ्यास अगदी सहजतेने पूर्ण करतात; दुसरे महत्त्वाचे म्हणजे एकाग्रते बरोबरच आपले श्रवण कौशल्य म्हणजेच ऐकण्याची कला आत्मसात झाली पाहिजे हल्ली कुणीही कुणाचं ऐकायला तयार नाही ,शाळेत किंवा क्लासेस मध्ये शिक्षक शिकवताना मुलांचं लक्ष नसतं त्यांचं मन दुसरीकडेच भरकटत असतं हे वास्तव आहे, त्यामुळे श्रवण कौशल्य अर्थात ( listening skills)विकसित करणे हा सुद्धा अध्ययन क्षमता विकसनाचा महत्त्वपूर्ण पैलू आहे त्याचप्रमाणे अध्ययन क्षमतेचा विचार करीत असताना ज्याप्रमाणे एकाग्रता आणि श्रवण कौशल्य महत्त्वपूर्ण आहेत त्याचप्रमाणे मुलांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, निरीक्षण कौशल्य, आत्मविश्वास, तार्किक विचार, करण्याची क्षमता यासारखे अनेक कौशल्ये विकसित करणे ही एक एक काळाची गरज आहे• परंतु शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये ,क्लासेस मध्ये अशा प्रकारची मूलभूत कौशल्य विकासनावर भर दिलेला नसतोच, त्यामुळे मुलांचा एकांगी विकास विकास होताना दिसून येतो ,
या सर्व बाबींचा अतिशय सखोल विचार
आणि चिंतन करून श्री दिनेश विक्टर यांनी मुलांच्या अभ्यास करण्याच्या क्षमता विकसित करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी प्रज्ञावान आणि प्रतिभाशाली विद्यार्थी घडविण्याचे स्वप्न समोर ठेवून एस आय पी अकॅडमी अर्थात (Sociable, Intellectual and Progressive Academy ची स्थापना भारतात 2003 मध्ये केली• तरुण विद्यार्थी ही देशाची खूप मोठी संपदा आहे आणि हे विद्यार्थी जर बुद्धिवान आणि प्रज्ञावान असतील तर त्या देशाचे भवितव्य उज्वल असतेच ,भारतात अशा प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या निर्मितीसाठीच एसआयपी अकॅडमी देशभरामध्ये आपल्या 700 पेक्षा अधिक अध्ययन केंद्राच्या माध्यमातून कार्य करीत आहे.
महत्त्वकांक्षी आणि परिपूर्ण कार्यक्रम:
"एसआयपी अबॅकस आणि ब्रेन जिम" हा एक अत्यंत महत्त्वकांक्षी कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे ,हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विशेषतः विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या क्षमता विकसित करण्यासाठी जगातील एक अद्वितीय कार्यक्रम असल्याचे गेल्या पंधरा वर्षातील अनुभवावरून सिद्ध झाले आहे.
बहुतेक पालकांची अशी धारणा असते की अबॅकस मुळे गणित चांगले होत असते किंबहुना अबॅकस हा केवळ गणितीय कार्यक्रम आहे ,असे त्यांना वाटते आणि ते स्वाभाविक आहे कारण अबॅकस या या साधनांमध्ये माध्यम म्हणून अंकांचा किंवा आकडेमोडीचा विचार करण्यात आला आहे ; त्यामुळे मुलांचे गणित चांगले होणे ही एक स्वभाविक प्रक्रिया आहे परंतु एसआयपी अबॅकस हा केवळ गणितीय कार्यक्रम नसून मुलांच्या अध्ययन क्षमतांच्या विकास करण्यासाठी निर्माण केलेला जगातील एकमेवाद्वितीय कार्यक्रम आहे आणि त्या अनुषंगाने मुलांची एकाग्रता, ऐकण्याची क्षमता,आत्मविश्वास, स्मरणशक्ती ,निरीक्षण क्षमता आकलन क्षमता विकसित करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे•
स्वयंपूर्ण आणि शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम:
या कार्यक्रमाचे तीन प्रमुख घटक आहेत: 1. अॅबॅकस 2. ब्रेन जिम आणि 3. स्पीड राइटिंग /गतिशील लेखन
1• अबॅकसच्या माध्यमातून गणिताची भीती असलेल्या मुलांची भीती कायमची नाहीशी होऊन ते अतिशय आश्चर्यकारकपणे आणि सहजतेने तीन चार आकडी बेरजा, वजाबाक्या ,गुणाकार ,भागाकार तर करतातच त्याच बरोबर कोणत्याही संख्येचे पाढे म्हणू लागतात आणि एकांश- दशांश, वर्ग मुळे, घनमुळे यासारखी गुंतागुंतीची समीकरणेही सोडवू लागतात; ही किमया मात्र मुलांना एसआयपी अभ्यासकेंद्रावर शिकवलेल्या कौशल्यामुळे आणि संकल्पनांमुळेच साध्य होत असते, अर्थात यामध्ये एकाग्रता आणि श्रवण कौशल्ये आणि आणि इतर कौशल्यांची भूमिका अनन्यसाधारण असते•
2• याव्यतिरिक्त, ब्रेन जिम् अर्थात मेंदूचे व्यायाम हा एक एक अतिशय महत्त्वाचा घटक या कार्यक्रमाचा आहे, ह्या अतिशयसुंदर कसरती आहेत, या कसरती कॅलिफोर्निया विद्यापीठातील बाल मानसशास्त्रज्ञ श्री पॉल डेनिसन यांनी खास संशोधनाच्या आधारावर विकसित केल्या आहेत , या कसरती केल्यामुळे मुलांचे तान तणाव दूर होऊन, मेंदूला ऊर्जा आणि ऑक्सिजन प्राप्त होतो त्याच प्रमाणे मेंदूला सक्रिय करण्यास मदत होते. एसआयपी अबॅकस प्रशिक्षण केंद्रात प्रत्येक स्तरावर ब्रेनजिम च्या कसरती शिकविल्या जातात; आणि त्यांचा सातत्याने सरावही केला जातो मुख्य म्हणजे आपला दैनंदिन शालेय अभ्यास करण्यापूर्वी किंवा परीक्षेपूर्वी ब्रेन जिम् च्या कसरती केल्या तर आपली स्मरणशक्ती वाढत जाते आणि आपण केलेला अभ्यास व्यवस्थित लक्षात राहतो हे सिद्ध झाले आहे•
3• एसआयपी अबॅकस कार्यक्रमाचा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्पीड रायटिंग अर्थात गतिशील लेखन तंत्र: अलीकडे चांगल्या हस्ताक्षरात गतीने लिहिणे हे एक एक मोठे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे; त्यांना सर्व अभ्यास किंवा पेपर पूर्णपणे येत असतो परंतु वेळेच्या अभावामुळे एक दोन प्रश्न परीक्षेमध्ये राहून जातात, ही एक सार्वत्रिक समस्या झालेली आहे• त्यामुळे गतीने लिहिणे आणि व्यवस्थित लिहिणे या दृष्टिकोनातून गतिशील लेखन हा उपक्रम एसआयपी अबॅकस कार्यक्रमा महत्वपूर्ण भाग आहे, अशा ह्या तीन घटकांचा अंतर्भाव असलेला महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय कार्यक्रम म्हणजे एसआयपी अबॅकस होय!
आंतरराष्ट्रीय मानके:
विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करता यावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून दरवर्षी विभागीय राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एसआयपी अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात येते; यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी होत असतात त्यांना अवघ्या पाच ते आठ मिनिटांमध्ये 125 ते दोनशे पेक्षाही अधिक अधिक समीकरणे सोडविण्याचे लक्ष्य या स्पर्धेत दिलेली असतात, आणि हा एक चित्तथरारक अनुभव असतो•अशा प्रकारच्या भव्यदिव्य स्पर्धांच्या आयोजना बद्दल पाच वेळा लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एस आय पी अकॅडमीची नोंद झालेली आहे,त्याचप्रमाणें एशियन एज्युकेशन समिटमध्ये एसआयपी आदमीला The best Coaching Institute in skills Development for Children in India पुरस्कारही मिळालेला आहे(2015) एसआयपी ऍकॅडमीने कायम गुणवत्तेला प्राधान्य दिलेले आहे विशेषता प्रशिक्षक आणि आणि शिक्षकांचे प्रशिक्षण अतिशय उच्च कोटीतील असते यासाठी शास्त्रशुद्ध प्रणाली विकसित करण्यात आली आहे, या प्रशिक्षणाच्या गुणवत्तेमुळे एसपी एकेडमी ला आय एस ओ प्रणालीचे मानांकन प्राप्त झाले आहे(Quality Management System is accordance with in accordance with I SO 9001:2008). एस आय पी ऍकॅडमीने स्वतःचा संशोधन, विकास आणि प्रशिक्षण विभाग कार्यान्वित केला आहे त्याचप्रमाणेत्याचप्रमाणे Asia Abacus and Mental Arithmetic Research and Development Affililiation (AAMARDA) आणि World Association of Abacuse and Mental Arithmetic (WAAMA) या या दोन आंतरराष्ट्रीय संघटनांची सलग्नता एसआयपी अकादमीला मिळाली आहे,
विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम:
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम 15 देशां पेक्षाही अधिक ठिकाणी 900 पेक्षा अधिक अध्ययन केंद्रांमध्ये प्रभावीपणे कार्यान्वित करण्यातआला आहे आणि आज- तागायत 8,00,000 पेक्षा अधिक मुलांना प्रशिक्षित करण्यात आले आहे •भारतात, दिनेश विक्टर यांनी यांनी ऑगस्ट 2003 मध्ये हा कार्यक्रम प्रारंभ केला, ते स्वतः आयआयटी मुंबई आणि आय आय एम अहमदाबाद चे उच्च पदवीधारक आहेत त्यांनी व्यापक संशोधन आणि कठोर परिश्रम करून देशभरामध्ये एसआयपी अबॅकस केंद्रांचे जाळे अतिशय प्रभावीपणे निर्माण केले आहे ,या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास तर केला जातोच आणि 10000 पेक्षाही अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे• अनेक महिला उद्योजक आणि शिक्षक शिक्षिका निर्माण झाले आहेत ही एक मोठी उपलब्धी एसआयपी अकादमीची आहे •भारतातील सर्व राज्यांमध्ये 800 पेक्षा अधिक केंद्रांच्या माध्यमातून 7 लाखापेक्षाअधिक मुलांना प्रशिक्षित करण्यात आले आहे•
एसआयपी अबॅकस चा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे आणि जागतिक स्तरावरील शैक्षणिक तज्ज्ञांच्या सहकार्याने संशोधनाच्या आधारावर विकसित करण्यात आला आहे . सर्व शैक्षणिक साधने, सामग्री, धोरणे आणि अभ्यासक्रम विद्यार्थीकेंद्रित आहे, अर्थात सामान्यातील सामान्य विद्यार्थी सहजतेने सर्व कौशल्य आत्मसात करू शकतील या पद्धतीने विकसित करण्यात आला आहे आहे.
Brand Promise (गुणवत्ता
पाच पटीने विकसित करण्याची हमी) :
एसआयपी अकादमी ही जगातील अबॅकस क्षेत्रात कार्य करणारी अशी एकमेवाद्वितीय संस्था आहे की ,जी मुलांची क्षमता/ गुणवत्ता
पाच पटीने विकसित करण्याची लेखी हमी मी देत असते• या साठी एक विशिष्ट कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे, ज्यावेळी मुलं प्रवेश घेण्यासाठी येतात त्यावेळी त्यांची त्यांच्या अंकगणितीय ज्ञानाच्या आधारावर एक चाचणी घेण्यात येते ;या चाचणीमध्ये जर त्यांनी 15 समीकरणे सोडवली आणि एसपी अबॅकस चे चार स्तर पूर्ण केल्यानंतर पुन्हा चाचणी घेण्यात येते यामध्ये मुलांनी पहिल्या चाचणीत सोडविलेल्या समीकरणांच्या पाचपट म्हणजे साठ समीकरणे सोडविणे आवश्यक असते ,जर विद्यार्थी साठ समीकरणे सोडविण्यात यशस्वी झाला तर पालकांना दहा हजार रुपये (Brand Promise) दिले जातात, विशेष म्हणजे हे आश्वासन लिखित स्वरूपात दिलेले असते• प्रवेश घेताना सोडवलेल्या पेपर वर पालकांची स्वाक्षरी घेण्यात येते आणि चौथ्या स्तरा नंतर चा पेपर पालकांसमोरच केला जातो ही एक पारदर्शी पद्धत आहे आणि अतिशय गांभीर्याने पूर्ण केली जाते आणि म्हणूनच एसआयपी अबॅकस लोगो वर Success Assured हे ब्रीदवाक्य अधोरेखित करण्यात आले आहे•
स्पर्धात्मक परीक्षां मधील यश:
एस आय पी अकादमी मधून प्रशिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आहे यशाची शिखरे गाठताना दिसून येतात विशेषतः Maths ऑलिम्पियाड ,NEET, JEE, यासारख्या अनेक परीक्षांमध्ये एसआयपी अबॅकस चे विद्यार्थी सातत्याने यश संपादन करीत आहेत, आपल्या या यशाचे श्रेय ते आपल्या अबॅकस शिक्षिकेला देतात ही एक मोठी उपलब्धी आहे •
अद्वितीय आणि अलौकिक संस्था:SIP
निखळ गुणवत्तेची कास धरणारी आणि देशाच्या उभारणीसाठी प्रज्ञावान पिढी समर्पित करण्यासाठी अविरत परिश्रम करणारी आणि शाश्वत मूल्यांच्या आधारावर कार्य करणारी अशी ही संस्था आहे• संस्थेच्या ध्येय विधानांमध्ये शाश्वत विकासाचा सिद्धांत प्रतिपादित करण्यात आला आहे, त्याचप्रमाणे कार्यसंस्कृती आणि कार्य मूल्यांच्या आधारावर सतत गेल्या पंधरा वर्षांपासून कार्य करणारी एसआयपी अकादमी अद्वितीय आणि अलौकिक संस्था आहे••••••••
राजेन्द्र नन्नवरे
वरिष्ठ विभागीय प्रमुख खानदेश मराठवाडा आणि विदर्भ
एसआयपी अकादमी
9823106663
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Website
Address
Aurangabad
431001