श्री शिवाजी हायस्कूल,छत्रपती संभाजीनगर
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री शिवाजी हायस्कूल,छत्रपती संभाजीनगर, Middle School, khokadpura, Aurangabad.
15/08/2026
श्री शिवाजी हायस्कूल खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साह आणि चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा...🇮🇳🇮🇳
आज दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी श्री शिवाजी हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय एच.एस.सी व्होकेशनल विभाग खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथे येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साह आणि चैतन्यपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला..
भारतीय स्वातंत्र्याच्या निमित्त आयोजित ८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे ध्वजारोहण
शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री.जी.के.आढाव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गुराखीपीठावर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार कार्यकारिणी सदस्य प्रा.जे.एम.खान, शालेय समिती उपाध्यक्ष श्री.सदाशिवराव जाधव पाटील,प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.नागेश्वर सर यांची प्रमुख उपस्थिती होती...
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी,मातोश्री मुक्तामाय धोंडगे,ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब या सर्व महान विभूतींना अभिवादन करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली...
ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी सामूहिक संगीत कवायत सादर केली...सामूहिक कवायती नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भाषणे सादर केली..इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आपले नृत्य सादरीकरण केले…तसेच प्राथमिक विभाग आणि हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे गायन केले.
या सादरीकरणानंतर एच.एस.सी.व्होकेशनल विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री.बी.डी. राजपूत यांचा स्मृतीचिन्ह देऊन सेवागौरव निमित्त सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
संगीत कवायत तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख नियोजन आणि विद्यार्थ्यांची तयारी करून सादरीकरणासाठी मार्गदर्शन करणारे शालेय समितीचे शिक्षक प्रतिनिधी श्री.एस.जी.दवणे यांचा सन्मान करण्यात आला..
संस्थेतर्फे कार्यकारिणी सदस्य प्रा.जे.एम.खान आणि शालेय समिती उपाध्यक्ष श्री.सदाशिवराव जाधव पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री.जी.के.आढाव यांचा सत्कार करण्यात आला..
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे संचलन शाळेचे सहशिक्षक डॉ.संदीप तुपे यांनी केले...
यावेळी गुराखीपीठावर मान्यवरांसोबत मुख्याध्यापक श्री.जी.के.आढाव,पर्यवेक्षक श्री.आर.एस.चिंचोले,उच्च माध्यमिक विभागाचे श्री.एस.डी.बेंबरे,एच.एस.सी व्होकेशनल विभागाच्या श्रीमती ए.आर.बासरकर,प्रमुख लिपिक श्री.जी.एस.भुमरे आदींची उपस्थिती होती..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तीनही विभागातील शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले....
विद्यार्थ्यांना खाऊ वाटून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला...
🇮🇳🇮🇳🌺🌺🌺🇮🇳🇮🇳🌺🌺🌺🇮🇳🇮🇳
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी संगीत कवायत…🇮🇳
30/07/2026
*श्री शिवाजी हायस्कूल, खोकडपूरा छत्रपती संभाजी नगर येथे भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांची १०५ वा जयंती सोहळा तसेच गुणवंतांचा सत्कार व शर्करातुला कार्यक्रम उत्साहात साजरा...*🌸
आज दिनांक ३० जुलै २०२६ वार गुरुवार रोजी श्री शिवाजी हायस्कूल,उच्च माध्यमिक विद्यालय, एच.एस .सी व्होकेशनल विभाग छत्रपती संभाजी नगर येथे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक माजी खासदार व आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदरणीय भाई डॉ.केशवरावजी धोंडगेसाहेब यांची १०५ वी जयंती साजरी करण्यात आली...तसेच या जयंती सोहळ्यानिमित्त गुणवंतांचा सत्कार व शर्करातुला करण्यात आली..
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी हायस्कूल शालेय समिती चे अध्यक्ष ॲड.संदीपराव गव्हाणे साहेब हे होते..प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवाजी प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.एस.ए.गांगुर्डे,प्रमुख पाहुणे प्रा.जे.एम.खान आणि शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री.जी.के.आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती...
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,मातोश्री मुक्तामाय धोंडगे,भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब या महान विभूतींना वंदन करण्यात आले..
आदरणीय भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब हे बहुजनांचे दीपस्तंभ आहेत.. त्यांचे कार्यकर्तृत्व येणाऱ्या कित्येक पिढ्यांना मार्गस्थ करणारे ठरेल असे प्रतिपादन प्रमुख वक्ते श्री.एस.ए.गांगुर्डे यांनी आपल्या मनोगतात केले...
यानंतर आदरणीय डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून श्री शिवाजी परिवारातील इयत्ता दहावी व बारावी मध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यात आले..
आदरणीय डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या पुरोगामीत्वाचा वारसा जपणं हीच साहेबांना खरी आदरांजली ठरेल असे भाष्य शाळेचे मुख्याध्यापक श्री.जी.के.आढाव यांनी मनोगतात केले...
आदरणीय भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांचे कार्यकर्तुत्व आणि बहुजनांसाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची माहिती प्रा.जे.एम खान यांनी आपल्या मनोगतातून मांडली
अध्यक्षीय समारोपानंतर इयत्ता दहावी व बारावी मध्ये सर्वप्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची मान्यवरांच्या व शिक्षकांच्या उपस्थितीत शर्करा तुला करून त्यांना गौरविण्यात आले...
कार्यक्रमाचे संचलन डॉ.संदीप तुपे यांनी तसेच प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री.आर.एस.चिंचोले यांनी केले..
या प्रसंगी गुराखीपीठावर मान्यवरांसोबत मुख्याध्यापक प्राचार्य जी.के.आढाव,पर्यवेक्षक श्री.आर.एस.चिंचोले, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ए.एस.गवळी,ग्रंथपाल ए.ए.पवार आदींची उपस्थिती होती..
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तीनही विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले...
या कार्यक्रमासाठी श्री शिवाजी परिवारातील तीनही विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती..
राष्ट्रगीताने जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला...
🌻🌻🌻🌻🌺🌺🌻🌻🌺🌺🌻🌻🌻🌻
30/07/2026
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार चे संस्थापक संचालक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी खासदार व आमदार, मन्याड खोऱ्यातील शिक्षण महर्षी, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आदरणीय भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
मानाची कोटी कोटी जय क्रांति...!
शाळेतील वारीची तयारी…लेझीम पथकाची तयारी घेताना श्री.दवणे सर..🚩
24/07/2026
*श्री शिवाजी हायस्कूल छत्रपती संभाजीनगर येथे हरित महोत्सव अंतर्गत शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण…*🪴
आज दिनांक २३ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि श्री शिवाजी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हरित महोत्सव या उपक्रमांतर्गत शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले…
छत्रपती संभाजीनगर चे महापौर मा.समीर राजूरकर, आमदार संजय केणेकर,महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे,उपायुक्त श्री नंदकिशोर भोंबे,नगरसेवक रामेश्वर भादवे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.जी.के.आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले…
वृक्षारोपण कार्यक्रमा आधी शहराचे महापौर मा.समीर राजूरकर, आमदार संजय केणेकर,महानगरपालिका आयुक्त श्री अमोल येडगे साहेब यांनी श्री शिवाजी हायस्कूल,उच्च माध्यमिक विद्यालय खोकडपूरा छत्रपती संभाजीनगर येथे शाळेला भेट दिली…शाळेतर्फे मुख्याध्यापक श्री.जी.के.आढाव यांनी मान्यवरांचे क्रांतिप्रणेता भाई डॉ.केशवराव धोंडगे हे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले…महापौर मा.समीर दादा राजूरकर तसेच आयुक्त मा.अमोल येडगे साहेब यांनी शालेय परिसराची आणि कामकाजाची माहिती घेत समाधान व्यक्त केले…
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.जी.के.आढाव,पर्यवेक्षक श्री.आर.एस.चिंचोले यांच्यासहित तीनही विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती…
☘️☘️☘️☘️🌼🌼🌼🌼☘️☘️☘️☘️
14/04/2026
श्री शिवाजी हायस्कूल,खोकडपुरा छत्रपती संभाजीनर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन…🌸
आज दिनांक १४ एप्रिल २०२६ वार मंगळवार रोजी श्री शिवाजी हायस्कूल,उच्च माध्यमिक विद्यालय एच.एस.सी व्होकेशनल विभाग छत्रपती संभाजीनगर येथे विश्ववंदनीय,दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले..
लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मातोश्री मुक्तामाय धोंडगे,भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब या सर्व महान विभूतींना सुरवातीस अभिवादन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री.जी.के.आढाव यांनी मनोगत व्यक्त करून भीमजयंती च्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचलन डॉ.संदीप तुपे यांनी केले.
यावेळी श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.डी.घारुळे,श्री.शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.जी.के.आढाव,पर्यवेक्षक श्री.आर.एस.चिंचोले यांच्या सहीत तीनही विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
🌼🌼🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌼🌼
30/03/2026
*श्री शिवाजी हायस्कूल,खोकडपुरा छत्रपती संभाजीनगर येथील सहशिक्षिका श्रीमती यू.एच.महाजन यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप..*🌸
आज दिनांक ३० मार्च २०२६ वार सोमवार रोजी श्री शिवाजी हायस्कूल,उच्च माध्यमिक विद्यालय एच.एस.सी व्होकेशनल विभाग छत्रपती संभाजीनगर येथे शाळेतील सहशिक्षिका श्रीमती यू.एच.महाजन यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री.जी.के.आढाव हे होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,मातोश्री मुक्तामाय धोंडगे,भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब या सर्व महान विभूतींना अभिवादन करण्यात आले.
सेवानिवृती निमित्त श्रीमती यू.एच.महाजन यांचा शाळेच्या तीनही विभागातर्फे स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री.आर.एस.चिंचोले यांनी केले तसेच श्रीमती एस.जी.बळी यांनी मनोगत व्यक्त केले..
कार्यक्रमाचे संचलन डॉ.संदीप तुपे यांनी केले तसेच आभार श्री.डी.के.डांगे यांनी मानले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री.जी.के.आढाव,पर्यवेक्षक श्री.आर.एस.चिंचोले, यांच्यासहीत तीनही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती..
17/09/2025
श्री शिवाजी हायस्कूल खोकडपुरा , छत्रपती संभाजी नगर येथील गणिताचे माजी शिक्षक मा.प्राचार्य कै.प्रभाकर मुरकुटे सर यांचे रात्री १०-३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आज दि.१७-९-२०२५ रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले...अत्यंत मृदू स्वभावाचे आणि सतत सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे सर आज मात्र रडवून गेलेत....सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..🌺
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Khokadpura
Aurangabad
431001