♟️ शिवछत्रपती महाविद्यालयात बुद्धिबळ निवड चाचणी उत्साहात संपन्न
शिवछत्रपती महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे शालेय क्रीडा स्पर्धेसाठी बुद्धिबळ खेळाची निवड चाचणी आयोजित करण्यात आली.
या निवड चाचणीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धात्मक वातावरणात पार पडलेल्या या चाचणीच्या माध्यमातून शालेय स्पर्धेसाठी गुणवंत बुद्धिबळपटूंची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा..! ♟️🏆
Shivchhatrapati College Aurangabad
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivchhatrapati College Aurangabad, Campus Building, N-3, Cidco, Aurangabad.
31/07/2026
♟️ शिवछत्रपती महाविद्यालयात बुद्धिबळ निवड चाचणी उत्साहात संपन्न
शिवछत्रपती महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातर्फे शालेय क्रीडा स्पर्धेसाठी बुद्धिबळ खेळाची निवड चाचणी आयोजित करण्यात आली.
या निवड चाचणीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धात्मक वातावरणात पार पडलेल्या या चाचणीच्या माध्यमातून शालेय स्पर्धेसाठी गुणवंत बुद्धिबळपटूंची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा...! ♟️🏆
22/07/2026
महाराष्ट्राचं कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
18/07/2026
कष्ट, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर बारामतीची सुपुत्री कु. श्रावणी कृष्णकांत कुदळे हिने NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवून महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवून तिने महाराष्ट्राचा मान उंचावला आहे.
श्रावणीचे हे यश असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या तेजोमय कामगिरीबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि वैद्यकीय क्षेत्रातील तिची भावी वाटचाल यशस्वी, उज्ज्वल व समाजोपयोगी ठरो, ही सदिच्छा.
16/07/2026
🏛️Shivchhatrapati College
📍N3 Cidco Chh.SambhajiNagar
📚 Admission Open 2026-2027
B.sc Biotechnology
M.sc Biotechnology
14/04/2026
शिवछत्रपती महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. भरत वहाटुळे सर, पर्यवेक्षक डॉ. अश्रुबा गवळी सर तसेच प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
13/04/2026
अमृतवेल ते अल केमिस्ट : रील्सच्या जमान्यात १८ तास पुस्तकांत रमले तरुण
04/04/2026
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालयाची खेळाडू कु. निलम रगडे हीची दि.3 ते 7 एप्रिल 2026 सिन्नर (नाशिक) येथे होणाऱ्या 73 वी प्रौढ गट महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत निवड झाली आहे तसेच प्रतीक्षा पवार हिची महिला संघ व्यवस्थापक म्हणून निवड झाली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. पाटील, उपप्राचार्य भरत वहाठूळे व क्रीडा विभाग प्रमुख डॉ.अर्चना कोल्हे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना प्रा.किशोरी हिवर्डे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
04/03/2026
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवछत्रपती महाविद्यालयाची खेळाडू अजित चव्हाण याची HSNC मुंबई युनिव्हर्सिटी येथे होणाऱ्या वेस्ट झोन आंतर विद्यापीठ चेस स्पर्धेत निवड झाली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सी.एस.पाटील क्रीडा विभाग प्रमुख डॉ.अर्चना कोल्हे प्रा.किशोरी हिवर्डे यांनी खेळाडूचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
01/03/2026
आंतर महाविद्यालयीन वूशु स्पर्धेत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शिवछत्रपती महाविद्यालयातील अजित चव्हाण 58 वजन गट व सुनील शिंदे 62 या वजन गटातून दोघांनी सिल्वर मेडल प्राप्त केले या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी . एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. संगीता राजमाने, श्री ठेंगडे सर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अर्चना कोल्हे, प्रा.किशोरी हिवर्डे यांनी अभिनंदन केले.
या खेळाडूंना प्रा.अविनाश वाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
N-3, Cidco
Aurangabad
431003