Dnyanesh Vidya Mandir

Dnyanesh Vidya Mandir

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyanesh Vidya Mandir, School, Thakre nagar Cidco n-2, Aurangabad.

Photos from Dnyanesh Vidya Mandir's post 10/09/2024

आपल्या ज्ञानेशविद्यामंदिर माध्यमिक शाळेचे वरीष्ठ सह शिक्षक श्री . शिवशंकर गंदगे यांना उपमूख्याध्यापकपदी बढती देऊन त्यांचा शाल / श्रीफळ देऊन सत्कार करतांना संस्थेच्या सचिव माननीय मिनाक्षी ताई विटोरे मॅडम सोबत मुख्याध्यापिका श्रीमती पुष्पा लोखंडे , श्री . चौधरी सर व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन करतांना !

Photos from Dnyanesh Vidya Mandir's post 10/09/2024

आज इयत्ता नववीच्या वर्गाचे चर्चासत्र झाले. आजच्या काळात मुली किती सुरक्षित आहे याबद्दल विद्यार्थिनींनी चर्चा घडवून आणली.

Photos from Dnyanesh Vidya Mandir's post 10/09/2024

कुंडीतील किंवा मैदानावरील माती पासून नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक ( Eco friendly ) गणपती बप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी मातीवर प्रक्रीया करतांना वर्ग 9 वी अ चे विद्यार्थी तसेच सोबत मार्गदर्शक शिक्षक दापके आर के , सोनोने आर एस, सांगळे सर.

Photos from Dnyanesh Vidya Mandir's post 10/09/2024

ज्ञानेश विद्यामंदिर शाळे त सखी सावित्री मंच स्थापन करण्यात आला, शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनीला सध्याच्या वातावरणातील संभाव्य धोके तसेच स्वतःचे संरक्षण कसे करायचे याबद्दल विविध उदाहरणातून माहिती देण्यात आली तसेच सध्या परिस्थितीतील घटनांचे दाखले देण्यात आले. शाळेतील सर्व महिला शिक्षिकांना त्याबद्दल माहिती देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा लोखंडे यांनी विद्यार्थिनीला वरील संपूर्ण माहिती दिली. मंचच्या अध्यक्षा वळवी मॅडम, जयश्री शिवपुरे, सपना बुलबुले, वैशाली वाघ, मेघना बागुल, कल्याणी राऊत, पूजा साळवे इत्यादी महिला शिक्षकांनी या शिबिरात भाग घेतला होता.

Photos from Dnyanesh Vidya Mandir's post 10/09/2024

उन्नती शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश विद्यामंदिर माध्यमिक शाळेत रक्षाबंधन सणानिमित्त इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी स्वतः हस्ते मोठी राखी तयार करून ती राखी जुन्या झाडाला बांधली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ज्याप्रमाणे बहिण भावाला राखी बांधून स्वतःचे संरक्षण करण्याविषयी सुचवते त्याचप्रमाणे आपण सर्व मुलांनी झाडाचं राखी प्रमाणे संरक्षण करावे असे विद्यार्थ्यांना सुचवले तसेच सर्व मुलांनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून किमान एक झाडआपल्या घरासमोर लावून त्याचं संवर्धन करावे असे सागितले तसेच झाडामुळे आपल्याला फळे फुले मिळतात ऑक्सिजन मिळतो पर्यावरणाचा समतोल राखता येतो तसेच झाडामुळे आपल्याला सावली मिळते जमिनीची धूप कमी होते असे अनेक फायदे झाडामुळे होतात असे मुख्याध्यापक श्रीमती लोखंडे मॅडम यांनी सुचवले झाडाला बांधलेली राखी तयार करण्यासाठी कुमारी प्राची तायडे कार्तिकी गायकवाड प्राची कांबळे नव्या वैद्य धनश्री वानखेडे श्रावणी इंगळे इत्यादी मुलींनी सहभाग घेतला यावेळी अश्विनी सेवाभावी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष माननीय पूजाताई पऱ्हे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक शेख एस एन सहशिक्षिका श्रीमती बागुल मॅडम सहशिक्षक श्री नजन आर ए व इको क्लबचे सर्व सदस्य सहभागी विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता पसदानाने करण्यात आली

Photos from Dnyanesh Vidya Mandir's post 10/09/2024

आपल्या शाळेतील 10 वि चे विध्यार्थी यांनी गोगाबाबा टेकडी ते दौलताबाद हे 14 km अंतर ट्रेकिंग केली विद्यार्थीनी निसर्गाचा मन मुराद आनंद लुटला

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Thakre Nagar Cidco N-2
Aurangabad