IMA Chhhatrapati Sambhajinagar office
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from IMA Chhhatrapati Sambhajinagar office, Tutor/Teacher, IMA Hall, Near Shani Mandir, Samarthnagar, Chhhatrapati Sambhajinagar, Aurangabad.
पहिले अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलन छत्रपती संभाजीनगर. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि साहित्यिक श्री दासू वैद्य यांचे विशेष आभार
आजचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी १०.०० वाजता आपण सर्वांनी आयएमए नगरी, मंथन हॉल, एमआयटी, बीड बायपास येथे उपस्थित राहावे.
*१०.०० ते ११.३० या वेळेत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत “ग्रंथ दिंडी” आयोजित करण्यात आली आहे.* 📚🚩
सर्व सदस्य, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी यांनी वेळेत उपस्थित राहावे ही विनंती.
यानंतर आयएमए ध्वजारोहण होईल. 🇮🇳
त्यानंतर आयएमए तर्फे छत्रपती संभाजीनगरमधील विविध शाळांमध्ये घेतलेल्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. 🏆
या विद्यार्थ्यांनी निबंध, कविता, वक्तृत्व, आरोग्य जनजागृती अशा विविध उपक्रमांत सहभाग घेतला आहे. 👏
दुपारी १२.३० वाजेपासून साहित्यिक सत्रांची सुरुवात होईल. ✍️
*मराठी गझल सत्र होईल*. 🎶
*त्यानंतर मराठी ललित लेखन सत्र होईल*. 📖
*पुढे मराठी कवी संमेलन रंगेल*. 🎤
आपल्या शहरातील तसेच बाहेरून आलेले कवी आपल्या रचनांनी सभागृह भारावून टाकतील.
*रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध नाट्यप्रयोग “किर्तावणी” सादर केला जाईल*. 🎭
हा कार्यक्रम दिवसाची प्रभावी सांगता करेल.
सर्व मान्यवर, डॉक्टर, साहित्यिक, विद्यार्थी आणि नागरिक यांनी वेळेचे काटेकोर पालन करावे.
आपला सक्रिय सहभागच या संमेलनाची खरी ताकद आहे. 🙏
सकाळी १० वाजता भेटूया. धन्यवाद.
13/02/2026
🚩 ऐतिहासिक क्षण! वैद्यकीय आणि साहित्य संस्कृतीचा अभूतपूर्व संगम! 🚩
छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! आपल्या शहरात रंगणार आहे...
पहिले अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलन! 🩺✍️🎨
वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांची साहित्यिक आणि सांस्कृतिक प्रतिभा अनुभवण्याची ही एक सुवर्णसंधी.
📅 दिनांक: १४ आणि १५
फेब्रुवारी २०२६
📍 स्थळ: "मंथन हॉल",
एम.आय.टी.
इंजिनिअरिंग
कॉलेज,
बीड बायपास रोड,
छ. संभाजीनगर.
✨ संमेलनाची खास
आकर्षणे:
शनिवार, १४ फेब्रुवारी
(पहिले पुष्प) :
✅ सकाळी:
चित्रकला, निबंध,
वक्तृत्व स्पर्धा ,
IMA ध्वजारोहण.
✅ दुपारी:
'शब्द पल्लवी' ललित
लेख आणि
'गझल ए इश्क'
मराठी गझल संमेलन.
✅ संध्याकाळी:
भव्य 'काव्यशाला'
कवी संमेलन आणि '.
नाट्य संगीत -
कीर्तवणी'चा विशेष
कार्यक्रम.
रविवार, १५ फेब्रुवारी
(दुसरे पुष्प):
✅ सकाळी:
संमेलनाचे भव्य उद्घाटन -
श्री. विश्वास पाटील
सुप्रसिद्ध कादंबरीकार
यांच्या हस्ते.
✅ विशेष आकर्षण :
पद्मश्री डॉ. जब्बार पटेल
यांची प्रकट मुलाखत
आणि 'आय.एम.ए.
नवरत्न' पुरस्कार
वितरण.
✅ संध्याकाळी:
प्रकाशकांच्या दुनियेतील गप्पा आणि संमेलनाचा समारोप.
या संमेलनात सहभागी असणाऱ्या मान्यवरांमध्ये
दासू वैद्य
सुप्रसिद्ध कवी
नरेंद्र पाठक
प्राचार्य व साहित्यिक
म. भा. चव्हाण,
प्रसिद्ध गझलकार
मंगेश हाडवळे
जागतिक कीर्तीच्या
टिंग्या चित्रपटाचे
दिग्दर्शक
अरविंद जगताप
गीतकार
यांच्यासह सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणास्थान असलेले-
• डॉ. भागवतजी कराड,
माजी केंद्रीय मंत्री व
खासदार
छ. संभाजीनगर
• डॉ. दिलीप पुंड,
सर्पदंश विषयातील
कार्य, मुखेड
• डॉ. अशोक बेलखोडे,
बाबा आमटेंचे
मानसपुत्र, आदिवासी
कार्य, किनवट
• डॉ. राजेंद्र मलोसे,
सुप्रसिद्ध कादंबरीकार
चांदवड
• पद्मश्री डॉ. हिम्मतराव
बाविस्कर, महाड
• पद्मश्री डॉ. विकास
महात्मे, नागपूर
• पद्मभूषण डॉ. अशोक
कुकडे, लातूर
अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा, अनुभवांचा आणि साहित्यिक अभिव्यक्तीचा लाभ घेण्याची ही एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय संधी आहे.
या दोन दिवसांत कवी संमेलन, मराठी गझल, ललित वाचन, मराठी नाटक, ग्रंथदिंडी, कलादालन, स्टॉल्स, विविध परिसंवाद
आणि अनेक दिग्गज साहित्यिक व समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांशी
थेट संवाद साधण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
आपण सर्वांनी कुटुंबासह या संमेलनास उपस्थित राहावे आणि या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग व्हावे, ही मनःपूर्वक विनंती.
आपल्या आगमनाच्या
प्रतीक्षेत 🙏
आपले विनीत,
डॉ. अनुपम टाकळकर
संमेलन स्वागताध्यक्ष,
अध्यक्ष IMA
छ. संभाजीनगर
डॉ. योगेश लक्कस
सचिव
IMA छ. संभाजीनगर
डॉ. शहाजी तौर
संमेलन कार्याध्यक्ष.
12/02/2026
अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलन. (प्रवेश सर्वांसाठी खुला)
मित्रहो, मान्यवर डॉक्टर, साहित्यप्रेमी आणि संस्कृतीरसिकांनो 🙏
आपणा सर्वांना अत्यंत आपुलकीने आणि सन्मानाने
अखिल भारतीय वैद्यकीय साहित्य संस्कृती संमेलन
या ऐतिहासिक आणि बहुआयामी उपक्रमासाठी आम्ही आमंत्रित करीत आहोत.
📍 स्थळ
MIT - मंथन हॉल, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर
📅 दिनांक
१४ आणि १५ फेब्रुवारी २०२६
हे संमेलन म्हणजे केवळ कार्यक्रमांची मालिका नसून
वैद्यकीय सेवा, मराठी साहित्य, संस्कृती आणि सामाजिक भान
यांचा एक समृद्ध राष्ट्रीय स्तरावरील संगम आहे.
या संमेलनाचे
उद्घाटक
पानिपतकार, ज्येष्ठ कादंबरीकार
श्री विश्वास पाटील
संमेलनाध्यक्ष
पद्मश्री, प्रसिद्ध दिग्दर्शक
डॉ. जब्बार पटेल
यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत हे संमेलन संपन्न होणार आहे.
या संमेलनात सहभागी असणाऱ्या मान्यवरांमध्ये
सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य,
प्राचार्य व साहित्यिक नरेंद्र पाठक,
प्रसिद्ध गझलकार म. भा. चव्हाण,
जागतिक कीर्तीच्या टिंग्या चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश हाडवळे,
गीतकार अरविंद जगताप
यांच्यासह सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणास्थान असलेले-
• माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉ. भागवतजी कराड, छत्रपती संभाजीनगर
• डॉ. दिलीप पुंड, सर्पदंश विषयातील कार्य, मुखेड
• डॉ. अशोक बेलखोडे, बाबा आमटेंचे मानसपुत्र, आदिवासी कार्य, किनवट
• डॉ. राजेंद्र मलोसे, सुप्रसिद्ध कादंबरीकार, चांदवड
• डॉ. बालाजी गलधर, गलधर फूड्स, छत्रपती संभाजीनगर
• पद्मश्री डॉ. हिम्मतराव बाविस्कर, महाड
• पद्मश्री डॉ. विकास महात्मे, नागपूर
• पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, लातूर
अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा, अनुभवांचा
आणि साहित्यिक अभिव्यक्तीचा लाभ घेण्याची
ही एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय संधी आहे.
या दोन दिवसांत कवी संमेलन, मराठी गझल, ललित वाचन, मराठी नाटक,
ग्रंथदिंडी, कलादालन, स्टॉल्स, विविध परिसंवाद
आणि अनेक दिग्गज साहित्यिक व समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टरांशी
थेट संवाद साधण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
आपण सर्वांनी कुटुंबासह या संमेलनास उपस्थित राहावे
आणि या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग व्हावे, ही मनःपूर्वक विनंती.
आपल्या आगमनाच्या प्रतीक्षेत 🙏
आपले विनीत,
डॉ. अनुपम टाकळकर
संमेलन स्वागताध्यक्ष
आणि आध्यक्ष IMA छत्रपती संभाजीनगर
डॉ. योगेश लक्कस
सचिव
IMA छत्रपती संभाजीनगर
डॉ. शहाजी तौर
संमेलन कार्याध्यक्ष
02/02/2026
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या आणि स्वागतार्ह घोषणा करण्यात आल्या आहेत. बायोफार्मा शक्ती योजनेअंतर्गत 10 हजार कोटी रुपयांची तरतूद, कर्करोग आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांवरील कस्टम ड्युटीत सवलत, मानसिक आरोग्य संस्थांचा विस्तार, मेडिकल व्हॅल्यू टुरिझमला चालना आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आपत्कालीन व ट्रॉमा केअर क्षमतेत वाढ करण्याची दिशा हे सकारात्मक पाऊल आहे.
पुढील पाच वर्षांत एक लाख एप्लाइड हेल्थ प्रोफेशनल्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे नर्सिंग, तंत्रज्ञ आणि सहाय्यक आरोग्य सेवांमधील मनुष्यबळ अधिक सक्षम होईल. देशात पाच प्रादेशिक मेडिकल हब स्थापन करण्यात येणार आहेत. यामुळे विशेष उपचार आणि प्रगत वैद्यकीय सेवा प्रादेशिक पातळीवर अधिक सुलभ होतील.
कर्करोगावरील 17 औषधे तसेच 7 गंभीर आणि दुर्मिळ आजारांच्या औषधांवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. यामुळे उपचार खर्च कमी होईल आणि रुग्णांना थेट दिलासा मिळेल.
या घोषणांनंतरही वैद्यकीय क्षेत्राची मुख्य अपेक्षा सार्वजनिक आरोग्य बजेट अधिक मजबूत करण्याची होती. सध्या सार्वजनिक आरोग्यावर होणारा खर्च एकूण बजेटच्या सुमारे 1 ते 2 टक्क्यांपुरताच मर्यादित आहे. भारतासारख्या देशात हा खर्च किमान 5 टक्क्यांपर्यंत नेणे आवश्यक आहे, जेणेकरून प्राथमिक, दुय्यम, आपत्कालीन आणि ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम होतील.
जिल्हा रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी आणि ट्रॉमा केअर सुविधा 50 टक्क्यांनी वाढवण्याचा प्रस्ताव स्वागतार्ह आहे. मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ तेव्हाच मिळेल, जेव्हा पुरेसे प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस, क्रिटिकल केअर टीम्स, आधुनिक उपकरणे आणि निश्चित आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली जाईल.
मानसिक आरोग्य क्षेत्रात निम्हान्ससारख्या संस्थांचा विस्तार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात, विशेषतः छत्रपती संभाजीनगर येथे, निम्हान्स दर्जाची एक राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था स्थापन करण्यात यावी.
या घोषणांचा खरा परिणाम तेव्हाच दिसेल, जेव्हा विद्यमान सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये पूर्ण क्षमतेने कर्मचारी नियुक्ती करून कार्यरत होतील, वेळेवर निधी आणि देयके मिळतील आणि गुणवत्ताधारित शिक्षण व रुग्णसेवेला प्राधान्य दिले जाईल. केवळ नवीन महाविद्यालये सुरू करणे पुरेसे नाही. गुणवत्ता अधिक महत्त्वाची आहे.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर वाढणारा मानसिक ताण, हिंसा, कायदेशीर धोके आणि सुरक्षिततेचा अभाव ही गंभीर चिंता आहे. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील विश्वास टिकवण्यासाठी प्रभावी कायदेशीर संरक्षण आणि जलद तक्रार निवारण यंत्रणा आवश्यक आहे.
मेडिकल व्हॅल्यू टुरिझमसाठी विशेष हब विकसित करण्याची घोषणा स्वागतार्ह आहे. या क्षेत्रात महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात यावे, कारण आरोग्य पर्यटनामध्ये राज्याचे योगदान आणि क्षमता दोन्ही मोठ्या प्रमाणात आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन या अर्थसंकल्पातील नवीन उपक्रमांचे आणि आपत्कालीन आरोग्य सेवांवरील भराचे स्वागत करते. आता गरज आहे की या घोषणांची वेळेत अंमलबजावणी व्हावी, स्पष्ट उत्तरदायित्व ठेवले जावे आणि पुरेशा निधीसह त्या राबवण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रत्यक्षात मिळू शकतील.
डॉ. अनुपम टाकळकर
अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन
छत्रपती संभाजीनगर शाखा

29/01/2026
https://forms.gle/hWwwQCNLuF4vpWje8
Registration link👆🏼👆🏼
- IMA Marathon
- Open for all, IMA members, non members, non medico
- Registration link 👆🏻
- Registration closing tomorrow 30/1/26
- separate form for separate entry (kids also welcome)
1-2-2026
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
IMA Hall, Near Shani Mandir, Samarthnagar, Chhhatrapati Sambhajinagar
Aurangabad
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |