13/09/2025
बिडकीन येथे उपक्रमशील आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी पुरस्कारांचे वितरण
सृजन विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात १० सप्टेंबर रोजी उपक्रमशील शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती अंबादासराव जोशी यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर सईदा फिरासत, उद्योजक सुधीर देशपांडे, सृजन शैक्षणिक प्रतिष्ठानचे सचिव नितीन
कंधारकर, कोषाध्यक्ष दत्तात्रय चडचणकर, विशाल आर्वीकर, मंजुषा दुसाने, डॉ. धरपळे, राजेंद्र कुलकर्णी, नृसिंह कुलकर्णी, राजेंद्र वैद्य आदींची उपस्थिती होती.
यावेळी रेणुका अक्षय धुमाळ (सृजन विद्यालय) यांना उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार, किशोर नावकर (स. भू, प्रशाला, जालना) यांना भा. बा. आर्वीकर पुरस्कार, अंजली नळदुर्गकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोहगाव) यांना कै. वसंतराव कुलकर्णी
स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला,
युगकल्याण पुरस्कारअंतर्गत इयत्ता आठवी, नववी व दहावीतील गुणवंत एक विद्यार्थी व एका विद्यार्थीनीचा प्रत्येकी रुपये १ हजार रुपये व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नृसिंह कुलकर्णी यांनी, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक रवींद्र ठाणगे यांनी केले. सूत्रसंचालन आचल मिसाळ व वेदिका कासुळे या विद्यार्थिनींनी केले.
20/08/2025
सृजन माध्यमिक विद्यालयात किशोरवयीन मुलिंचे समुपदेशन व आरोग्य तपासणी
बिडकीन 19 ऑगस्ट किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी मार्गदर्शन व समुपदेशन आरोग्यतपासणी छत्रपती संभाजी नगर हेडगेवार रुग्णालयांतर्गत करण्यात आली.
याप्रसंगी श्रीमती डॉक्टर प्रणिता कुलकर्णी, श्री. डॉ. के. यु. चाकूरकर, कुलकर्णी आप्पा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सुरुवातीस श्रीमती डॉक्टर प्रणिता कुलकर्णी यांनी विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थिनींना किशोरवयीन अवस्था ही मुलींच्या जीवनात एक फार महत्त्वाचा टप्पा असून या अवस्थेत कळीचे फुलात रूपांतरित होणे ही अवस्था असते, या वयात शरीरामध्ये होणारे बदल, या वयात मनात येणारे वेगवेगळे विचार, आहाराविषयी मार्गदर्शन व्यायाम, खेळ याचे जीवनातील महत्त्व तसेच पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी, शरीर स्वच्छतेच्या बाबी तसेच महिलांमधील वाढत्या आरोग्याच्या समस्या अशा प्रकारे सविस्तर समुपदेशन विद्यार्थिनींचे करण्यात आले. या नंतर डॉक्टर प्रणिती कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थिनींच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार केले, डॉक्टर के यु चाकूरकर यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्याची तपासणी करून डोळ्यासंबंधी घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक यांनी हेडगेवार रुग्णालयाच्या सर्व टीमचे मनापासून आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
16/08/2025
सृजन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तालुका पैठण येथे स्वातंत्र्य दिवस उत्सवात साजरा करण्यात आला
13/08/2025
सृजन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तालुका पैठण येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने हर घर तिरंगा या अभियानांतर्गत ध्वजारोहण करण्यात आले.
13/08/2025
सृजन प्राथमिक शाळेत भिती चित्र विद्यार्थ्यांनी रेखाटले
13/08/2025
*सृजन विद्यालयातील विद्यार्थ्यांची गणपती कार्यशाळेला भेट*
बिडकीन 13 ऑगस्ट - सृजन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज स्थानिक गणपती मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार शिकारे बंधू यांच्या कार्यशाळेला भेट देऊन एक आगळीवेगळी शैक्षणिक व सांस्कृतिक अनुभूती घेतली.
कार्यशाळेतील कलाकारांनी विद्यार्थ्यांना मातीपासून तसेच पीओपी पासून गणेश मूर्ती बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष करून दाखवली. मूर्तीच्या आकाराला जिवंत करण्यासाठी लागणारे मूर्तिकाराचे कौशल्य रंगकामाचे बारकावे तसेच पर्यावरण पूरक मूर्तीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने लहान मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला या अनुभवामुळे त्यांच्यात कला, संस्कृती, आणि पर्यावरण संवर्धनाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली. शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत सहशिक्षिका श्रीमती राऊत श्रीमती धुमाळ यांचा सहभाग होता.
28/07/2025
शिक्षकांसाठी आयोजित चर्चासत्र उत्साहात
बिडकीन (वा): सृजन विद्यालय
बिडकीन येथे शिक्षकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. 'शिक्षणापलीकडचे शिक्षत्व' या विषयावरील चर्चासत्रात विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते, आयुष्यभराच्या प्रवासात विद्यार्थी शिक्षकांना कधीही विसरता येत नाही ही गोष्ट अधोरेखित केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालकत्व घेऊन नेहमी उपक्रमशील राहिले पाहिजे, शिस्त, प्रामाणिकपणा, नियमांचे पालन स्वतःच्या आचरणातून विद्यार्थ्यांप्रती रुजवणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना अपयश पाचवून यश प्राप्त करण्यास पेरीत करणे आवश्यक आहे, शहरी व ग्रामीण अशी विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनता शिक्षकांनी दूर करावी. असे महत्वाचे विषय चर्चासत्रात शिरीष लोया यांनी विषद केले. शिक्षकांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेचे सचिव नितीन कंधारकर, दत्तात्रेय चडचनकर यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक ठाणगे यांनी आभार मानले.