01/11/2022
माजी विद्यार्थी यशोगाथा-
“शिस्त, समर्पण व निर्धार” यशस्वी जीवनाचा आधार- डॉ. सखाराम पवळ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीशी सलग्नित महात्मा गांधी मिशन संचलीत एमजीएम कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय गांधेली ची स्थापना सन २००४ मध्ये झाली. महाविद्यालयाला विद्यापीठ नामांकन समितीचा “अ” दर्जा प्राप्त असून जैवतंत्रज्ञान या विषयात पदवी अभ्यासक्रमाच्या आजतागायत एकूण १५ तुकड्या बाहेर पडल्या आहेत. येथून बाहेर पडलेले विद्यार्थी भारतातील तसेच परदेशी विद्यापीठांमधून पदव्यूत्तर तसेच आचार्य पदवी घेऊन विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तुत्वाने नावलौकिक मिळवत आहेत.
अशाच यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव भावी पिढीसाठी उपयोगी ठरावेत व सध्याच्या कॉविड पश्चातच्या निराशजनक परीस्थतीमध्ये आजच्या महाविद्यालयीन तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून महाविद्यालयामध्ये शिकत असलेले विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांचा संवाद सुरु करण्याची संकल्पना मांडली गेली. त्याद्वारे महाविद्यालयामध्ये “माजी विद्यार्थी - यशोगाथा” या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाची संकल्पना महाविद्यालयाचे डॉ. अशोक खर्डे, प्र. विजयकुमार देशमुख व प्रा. क्षमा देशपांडे यांनी प्राचार्यांकडे मांडली व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्रसिंग चव्हाण यांनी त्यासाठी सहमती दर्शवित परवानगी व हा उपक्रम यापुढे अविरतपणे सुरु राहील याचा सर्वांनी संकल्प केला.
या उपक्रमाद्वारे दि. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. सखाराम पवळ, तालुका कृषी अधिकारी, परतूर, जि. परभणी यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी डॉ. पवळ यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाविषयी बोलताना विद्यार्थ्यांनी नेहमी जीवनात यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट करण्याचा तसेच “शिस्त, समर्पण व निर्धार” या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमजीएम हिल्सचे संचालक डॉ. सुदाम पवार हे होते. त्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महाविद्यालयाच्या शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृश्रारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. प्रभाकर हिवाळे हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये सूत्रसंचालन स्वप्नील टेमकर, पाहुण्यांचा परिचय ऋषिकेश खोंडले, आभार प्रदर्शन अभिमान गायकवाड याने केले, तर मितेश हिंगणेकर याने कार्यक्रमाचा इ फलक बनवला. तसेच सभागृह सुशोभीकरण, बैठक व्यवस्था, छायाचित्रीकरण, दृक्श्राव्य, इ. साठी नेहा वर्थी, ममता राठोड, सुप्रिया जगदाळे, वैष्णवी मुंडे, ऋतुजा मांगले, निर्जरा बुरसे, श्रुती कापकर, ढवळे युवराज, ज्योतिरादित्य देशमुख, ऋषिकेश हजारे, मंगेश ठोकळ, सुरज पाटील, शिवंम कोल्हे, मंदार उगले, अभिजित शेजवळ, करण मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.
02/10/2022
28/09/2022
20/09/2022
15/09/2022
23/08/2022