Sunrise English School And Atharva Education Of Group,Ambelohal

Sunrise English School And Atharva Education Of Group,Ambelohal

Share

Self -Finance
CBSE/ STATE BOARD School

18/01/2025

हळदी कुंकू ❤️💛
सनराइज् इंग्लिश स्कूल, आंबेलोहळ येथे मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी विविध खेळांचे व हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले होते.

महिलांनी आपल्या रोजच्या धावपळीच्या रुटीन मधून स्वतःसाठी वेळ देऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

Photos from Sunrise English School And Atharva Education Of Group,Ambelohal's post 09/07/2022

आषाढी एकादशी निमित्त सनराईज इंग्लिश स्कूल आणि अथर्व एज्युकेशन ऑफ ग्रुप ,आंबेलोहळ या शाळेच्या वतीने गावातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापर्यंत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम, नृत्य ,पावल्या करून गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. तसेच पथ नाट्यातून अध्यात्माचे महत्त्व पटवून दिले. शाळेतील आवारामध्ये आषाढी एकादशी निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शाळेतील प्रांगणात विद्यार्थ्यांनी विविध भक्ती गीते ,महाराष्ट्रीयन नृत्य, तसेच विठ्ठलाच्या महिमा कथा ने कार्यक्रमांमध्ये रंगत आणली .विद्यार्थ्यांच्या उत्साहाला पालक कौतुकाने बघत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थाचालक शेखर हिरेमठ मुख्याध्यापक पौर्णिमा हिरेमठ उपस्थित होते.तसेच तुकाराम गवळी, रौफ सय्यद , गणेश शिंदे,अतुल पवार, सीमा अंकुश ,आशा बत्तीशे, सुषमा गायकवाड, संगीता शिनगारे , कोमल भालेराव, रेखा गेडाम, नंदा कांबळे, कोमल वैद्य, अरुण फाळके व शैलेश आदमाने या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीे पार पाडला.

17/06/2022

सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना सांगण्यास आम्हाला आनंद होतो की आज इयत्ता दहावीचा निकाल लागला असून आपल्या विद्यार्थ्यानी 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे..

Sunrise English School, Ambelohal -
1) स्नेहल संतोष कासलीवाल -91.80%(प्रथम क्रमांक)
2) उज्ज्वला विलास गिरबोने -90.40%(द्वितीय क्रमांक)
3) पायल कैलास बनकर - 90.20%(तृतीय क्रमांक)

Atharva Education of group, Ambelohal
1) मयुरी कैलास बोराडे- 86.80%(प्रथम क्रमांक)
2) वैष्णवी रामदास नीचीत- 86.60%(द्वितीय क्रमांक)
3) आदित्य गणपत साध्ये -85.40%(तृतीय क्रमांक)

Photos from Sunrise English School And Atharva Education Of Group,Ambelohal's post 11/06/2022

सनराइज् इंग्लिश स्कूल व अथर्व एज्युकेशन ऑफ ग्रुप कनिष्ठ महाविद्यालय ,आंबेलोहळ येथे
इयत्ता बारावी मध्ये शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखीत विद्यार्थ्यांनी यश संपादित केलेले आहे.
विज्ञान शाखेतून वैष्णवी संजय प्रधान -78.87% हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांकावर ऋतुजा प्रधान 74% व तृतीय क्रमांकावर अपेक्षा प्रधान 73.87% यांनी बाजी मारलेली आहे.

09/06/2022
Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Ambelohal
Aurangabad

Opening Hours

9am - 5pm