05/10/2025
महिना हा डिसलेक्सिया जागृती महिना म्हणून ओळखला जातो. पेरिविंकल संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौकात आम्ही जनजागृती केली. यावेळी आमच्या सोबत सुहास किंडरगार्टन शाळेचे शिक्षक, आय प्रोग्रेस संस्था जागृती करण्यासाठी सहभागी झाले होते. त्यांचे मनःपूर्वक आभार. सिग्नलवर डिसलेक्सिया ची माहिती, आणि उपचारात्मक शिक्षण पद्धती सांगितली. खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. डिसलेक्सिया हा आजार नाही ही एक समस्या आहे. वाचनात, लेखनात किंवा गणितात मुलांना अडचणी येत असतील तर त्याची कारणं शोधून त्यावर उपचारात्मक शिक्षण आवश्यक आहे. तुम्हीही या महिन्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आमची मदत करू शकता.
#सत्यगौरी
#शिक्षण