28/09/2022
कवी अशोक कोळी यांनी साधला प्रशाला,केंद्र शाळा सोयगांव येथिल विद्यार्थ्यांशी संवाद
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद व शिक्षण विभाग, जि. प. औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने
*विद्यार्थ्यांचा सर्जनात्मक विकास व्हावा, केवळ चारभिंतीतील पुस्तकी शिक्षणात विद्यार्थी अडकून पडू नये या उद्देशाने अनोखा उपक्रम हाती घेतलेला असून निपून भारत या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य विकसित व्हावे म्हणून दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरवून फक्त अवांतर वाचन करुन घेत आहेत. याच कार्यक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांशी सुप्रसिध्द कवी, लेखक,साहित्यिक यांचा संवाद घडवून आणला जात आहे. या परीसस्पर्श उपक्रमांतर्गत जामनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कवी डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी दि.27/09/2022 रोजी सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील व केंद्र शाळा सोयगांव येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कवी अशोक कोळी यांनी आपण सोयगाव प्रशालेचे विद्यार्थी असून याच शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर आज कवी ,लेखक म्हणूून मार्गदर्शन करणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असल्याचे प्रतिपादन केले तसेच कवी अशोक कोळी यांची प्रशाला सोयगांव येथील विद्यार्थीनी कु.पुनम नप्ते व भाग्यश्री गवळी यांनी मुलाखत घेतली.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रमाचे सुञसंंलन ते आभार हे सर्व कार्यक्रम वर्ग नववीच्या विद्यार्थीनीनी पार पाडला.कवी डाॅ.अशोक कोळी यांनी यावेळी वर्ग 4थी मराठी विषयात असणारी "धुळपेरणी" व "हिंमत द्या थोडी" या कवितांवर विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.प्रत्यक्ष कवी आपल्या भेटीला आल्याने विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण झाल्याचे दिसून आले.
23/01/2021
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन सत्रात तिसरे मार्गदर्शन दि.२४.१.२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता श्री. सनी गायकवाड, जि. प. प्रा. शा. गाजरमळा,ता.गंगापूर यांचे आहे.
२०१६ पासून प्रतिवर्षी त्यांच्या शाळेतील विद्यार्थी नवोदय विद्यालय निवड परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होत आहेत. सैनिक स्कूलसाठीही त्यांच्या पाच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
या सत्रात ते शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. सदरील सत्र खालील लिंकवर क्लिक करून पाहता येईल.
https://youtu.be/GTt87UgWqiw
तसेच या आधी झालेले दोन मार्गदर्शन सत्र खालील लिंकवर उपलब्ध आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा - 2021 पूर्वतयारी व मार्गदर्शन Playlist लिंक
https://youtube.com/playlist?list=PLpPvuqVrMf_6pB1vjOJHK-Q1KxPjl_BsC
22/01/2021
श्री. प्रभाकर काकडे हे जि.प.प्रा.शा.गाढेजळगाव,ता.जि. औरंगाबाद येथे कार्यरत अतिशय उपक्रमशील मुख्याध्यापक आहेत.विविध राज्यस्तरीय उपक्रमात सातत्याने सहभागी होणाऱ्या काकडे सरांचा गणित आणि बुद्धीमत्ता चाचणी हा विशेष आवडीचा प्रांत.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन सत्रांत दि. २३.०१.२०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता ते दुसरे पुष्प गुंफणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन खालील लिंकवर क्लिक करून ऐकता येईल.
https://youtu.be/wS_Cz0oNrcY
21/01/2021
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या वतीने इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात परीक्षेतील विविध घटकांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
दि. २२ जाने. २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता परभणी येथील माध्यमिक शिक्षक, बालभारती लेखक मंडळ सदस्य (गणित) व अभ्यास मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य एस.एस.सी.बोर्ड, पुणे श्री. श्रीपाद देशपांडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
सदरील सत्र पुढील लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/iq1rp7U5_5Y
21/01/2021
DIGITAL TOOLs for EDUCATION
21/01/2021
राज्यातील सर्व शिक्षकांकरिता "Digital Tools for Education" ऑनलाईन वेबिनार
19/01/2021
राज्यातील सर्व शिक्षकांकरिता आयोजित "Digital Tools for Education" या विषयावरील वेबिनारबाबत...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे "Digital Tools for Education" या विषयावरील दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन दिनांक २२ व २३ जानेवारी, २०२१ या कालावधीमध्ये सकाळी १०.०० ते ११:३० या वेळेमध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या YouTube चॅनेल च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले आहे.
वेबिनारकरिता उपस्थित राहणेसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असल्याने प्रथमतः सर्व शिक्षकांनी https://tinyurl.com/y5ozz209 या लिंकवर अथवा सोबतचा QR कोड स्कॅन करून नावनोंदणी करावी. सदर लिंकवर नावनोंदणी केल्यावरच संबंधित शिक्षकास वेविनारची लिंक SMS द्वारे प्राप्त होईल.
"Digital Tools for Education" वेबिनारचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करावी.
-
डॉ. कलीमोद्दीन शेख
प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,
औरंगाबाद
25/02/2020
NCERT, TATA TRUST व SCERT चे deligates (प्रत्येकी एक सदस्य) असे तीन सदस्यांची टीम औरंगाबाद जिल्ह्यातील तालुकास्तरीय निष्ठा प्रशिक्षणास भेट देणार ....
16/01/2020
तालुकास्तरीय NISHTHA प्रशिक्षण - गंगापूर
मा. प्राचार्य डॉ. कलीमोद्दीन शेख साहेब यांनी आर्किड इंग्लिश स्कूल, बजाजनगर येथे भेट दिली व प्रशिक्षणार्थी यांना संबोधित केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर श्री योगेश्वर जाधव, अधिव्याख्याता, श्री अनिलकुमार सकदेव, गटशिक्षणाधिकारी, श्री सुरडकर सर केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक श्री प्रभाकर काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काकडे मॅम आणि अंजुम मॅम.