Gujrati Vidya Mandir, Aurangabad 1971 10 th batch Reunion

Gujrati Vidya Mandir, Aurangabad 1971 10 th batch Reunion

Share

Golden Jubilee Reunion of students of 1971 batch of class XI

GVM 13/11/2021

Click the link below n see all photographs.

GVM 136 new photos added to shared album

GVM2 13/11/2021

Click the link below n see all photographs.

GVM2 204 new photos added to shared album

29/10/2021
24/10/2021

गुजराती विद्या मंदिर माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सम्पन्न

1971 साली मॅट्रिक उत्तीर्ण झालेल्या श्री गुजराती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 50 वर्षानंतर एकत्र येऊन आपला सुवर्ण मोहोत्सवी मेळावा शनिवार दि 23 ऑक्टो रोजी अत्यन्त उत्साहात याच शाळेत साजरा केला.

किमान पासष्टी ओलांडलेल्या या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपली जुनी 50 वर्षांपूर्वीच्या वर्गमित्र व वर्गमैत्रिणींना भेटून उत्साहाचे भरते आले होते, गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना सम्पर्क करून एकूण 50 पैकी 35 जण एकत्र आले, जुन्या सहध्यायापैकी 11 जण परलोकी गेले, काही मोजकेच संपर्क होऊ शकले नाहीत. कोपरगाव, मुंबई, दिल्ली, पुणे येथून काही विद्यार्थी आले तर अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका विद्यार्थिनीने आपले शुभ संदेश पाठवून सहभाग घेतला.

अतिशय नियोजनबद्ध आयोजन केलेल्या या मेळाव्याची सुरुवात या विद्यार्थ्यांनी शाळेच्या जुन्या प्रथेप्रमाणे शाळेच्या मैदानावर सकाळी ठीक 10 वाजता प्रार्थना आणि राष्ट्रगीताने केली, तदनंतर शाळेच्या शिस्तीत आपल्या जुन्या मॅट्रिकच्या वर्गात जाऊन प्रत्येकाने आपल्या त्याच जागेवर बसून भूतकाळातील ते दिवस अनुभवले, या वर्गास विशेष पद्धतीने सजविण्यात आले होते, काळ्या फळ्यावर दिवंगत गुरुवर्य आणि वर्गमित्रांची नावे लिहिलेले पोस्टर लावलेले होते, त्या सर्वांचे स्मरण करून, मेणबत्या पेटवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

त्याच शिस्तीत कार्यक्रमाच्या सभागृहात सर्व माजी विद्यार्थी आले , एकमेकांचा परिचय, गेल्या 50 वर्षात कोणी काय काय केले, कोणाची मुले आता काय करतात वगैरे बाबतीत प्रत्येकाने आपली माहिती दिली आणि मध्यनतरीच्या काळातील दुरावा लांब सारून सर्व जण जुन्या विश्वात हरवत गेली. सर्वांच्या संपूर्ण माहितीची पुस्तिका देखील या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. काही छोट्या छोट्या खेळाचे मुद्दाम आयोजन करण्यात आले होते जेणेकरून सर्वांना सद्य वयाचा विसर पडून आपले बालपणाच्या शालेय जीवनात जात यावे आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला, आपली वये विसरून सर्वांनी खिलाडू वृत्तीने सहभाग घेतला.

भोजनांनंतरच्या सत्रात त्यांना शिकविलेल्या शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते, सर्वश्री बी एस देशपांडे, एस टी उर्फ आबासाहेब देशपांडे आणि ऍड सुखदेव शेळके आवर्जून उपस्थित राहिले, सोबतच गुजराती समाज विकास मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश मेहता आणि पदाधिकारी रत्नदीप पटेल व अनिल पारीख देखील उपस्थित होते. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना नावासह ओळखत सुखद धक्का दिला आणि त्यांनाही या पन्नास वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांना भेटून किती आनन्द झाला हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते. या सर्वांचा शाल, श्रीफळ आणि भेट देऊन विद्यार्थ्यांतर्फे हृद सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक बी एस देशपांडे यांनी ते गुजराती विद्या मंदिर या शाळेत 1968 पासून कार्यरत होते आणि जवळपास सर्व माजी विद्यार्थी अजूनही त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले, ते माजी विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी यात खूप मोठे अंतर आहे, पूर्वीची शिक्षकावरील आस्था, विश्वास आता दिसून येत नाही अशी खन्त त्यांनी व्यक्त केली. अनेक माजी विद्यार्थी मेळावे बघितले पण असा सुनियोजित आणि आपुलकीने भरलेला मेळावा प्रथमच अनुभवत असल्याचे सांगून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.

एस टी उर्फ बाबासाहेब देशपांडे यांनी या शाळेच्या पूर्व वैभव प्राप्त करण्यासाठी माजी विद्यार्थी आणि संस्थेने पुढे येऊन प्रयत्न करावेत, वेळ पडल्यास आपणही मदत करू असे प्रतिपादन केले.

ऍड सुखदेव शेळके यांनी गुजराती शाळेमुळे आपण या शहरात स्थिरावलो आणि विधिद्न्य होऊ शकलो असे सांगितले.

विद्यार्थ्यापैकी अभय एकबोटे यांनी शाळेच्या इमारतीची दुर्दशा बघून खूप वाईट वाटल्याचे आणि तिच्या पुनर्जीवनासाठी आम्हा विद्यार्थ्यांना हाक द्या आम्ही सर्वोतोपरी मदत करू असे वचन दिले.

संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश मेहता म्हणाले की मी याच शाळेचा विद्यार्थी असून शाळेला शिक्षण क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणे माझे कर्तव्यच आहे, मी कसून प्रयत्न करीन आणि शाळेला गतवैभव मिळवून देईन.

माजी विद्यार्थ्या तर्फे शाळेला 50 खुर्च्या भेट म्हणून देण्यात आल्या. मेळावा यशस्वी करण्यासाठी राजन हौजवाला, नरेंद्र तोडेवाले, अभय एकबोटे, अंकुश औटी, कुमुदिनी एकबोटे, स्नेहलता सप्तर्षी, यशोधरा टांक, नारायण निमकर, राशीनकर, शिवाजी चांदगुडे, आत्माराम काथार, संजीवनी दीक्षित, बिना कापडिया, शिवाजी जोजारे, रवींद्र आनंदगावकर आणि सर्वच माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे संचलन राजन हौजवाला यांनी केले तर अंकुश औटी यांनी आभार मानले.

10/10/2021

*आज मी, नरेंद्र व अंकुश आपल्या लाडक्या सरांना भेटायला गेलो होतो, त्यांच्या चिरंजीवांनी छान स्वागत केले, सर आत घरात होते, चिरंजीव देखील वकील आहेत, गप्पा झाल्या आणि तितक्यात पांढऱ्या स्वच्छ परिधानात, तेच हसू चेहऱ्यावर, तीच अंगकाठी पण थोडेसे थकलेले सर अर्थात ऍड सुखदेव शेळके येते जाहले, आम्ही सर्वांनी उठून त्यांना नमस्कार केला, सरांनी सर्वांना ओळखून मोठा धक्का दिला, मग येण्याचे प्रयोजन सांगितले, आपण नक्की या असे सांगितले, कोणतेही आढे बिढे न घेता त्यांनी येण्याचे मान्य केले, जुन्या आठवणी उकरून काढल्या, सर देखील बोलते झाले, बरोबरीचे अनेक सर व बाई आता हयात नसल्याचे सांगितले व खन्त व्यक्त केली, मग म्हणाले जरा थांबा, मी माझे आत्मचरित्र लिहिले आहे ते पुस्तक तुम्हाला देतो म्हणत दुसऱ्या खोलीतून आम्हा तिघांसाठी तीन गलेलठ्ठ पुस्तके घेऊन आले, प्रत्येकाचे नाव विचारून स्वतःच्या हाताने सप्रेम भेट असे लिहून पुस्तके आमच्या हातात ठेवली, आम्ही धन्य धन्य जाहलो, पुस्तकातील एका प्रकरणात शाळे विषयी लिहिले आहे ते अवश्य वाचा म्हणाले, आम्ही अर्थात हो हो म्हणून दुजोरा दिला, त्यांच्या सूनबाईंनी आणलेला बिन साखरेचा चहा बशीत ओतून ढोसला, त्यांनी ओळख करून दिली, त्या एम पी लॉ कॉलेज ला प्राध्यापिका आहेत, आम्ही आदरयुक्त व कौतुकाच्या चेहऱ्याने डोळ्यानेच नमस्कार केला, अवांतर गप्पा चालूच होत्या, निरोपाची वेळ आली पण पाय निघत नव्हता पण त्यांनी आता या म्हणायच्या आत आम्ही उठलो व जाता जाता नक्की येण्याची त्यांना आठवण करून दिली आणि बाहेर पडलो, गुरू ची अलभ्य भेट याचे समाधान मनात तयार झाले होते.*

01/10/2021

आम्ही सगळे तब्बल 50 वर्षांनंतर भेटतोय, तेथेच जेथून आम्ही विखुरलो होतो.
२३ ऑक्टोबर 2021 रोजी, दिवसभर आम्ही एकत्र जुन्या स्मृतीची उजळणी करणार आहोत

Photos from Gujrati Vidya Mandir, Aurangabad 1971 10 th batch Reunion's post 09/03/2021
Photos from Gujrati Vidya Mandir, Aurangabad 1971 10 th batch Reunion's post 09/03/2021

Following is the lists of ex-students of 1971 batch of Matric of Shri Gujrati Vidya Mandir, Aurangabad. We are going to celebrate this GOLDEN JUBILEE YEAR with reunion of all ex students of above mentioned batch. The names of those students are not appearing in this lis and are from mentioned batch of Gujrati Highschool are earnestly requested to join this group by calling 9890970251 Rajan Houzwala. We want that max no. Of students should participate in this event and recollect those golden days of School. The tentative date of celebration is 6th June 2021 and venue will be same our old Shri Gujrati Vidya Mandir, Kharakuwa, Aurangabad Maharashtra, India.

24/12/2020

Dear Friends

Minutes of the first meeting.

This video conference meeting was held on 23-12-2021 at 20-00 Hrs,

Following persons were present.

1. Rajan Houzwala
2. Narendra Todewale
3. Mohaniraj Rashinkar
4. Lahu Aute
5. Kumidini Ekbote
6. Abhay Ekbote

Following agenda points were discussed.

Point No.1. Communication with our non traceable friends:

Rajan and Narendra agreed to enquire locally for our classmates, Secondly news will be given in local news papers so the friends will come to know about our activity.

Point No, 2. Fixing tentative date 2 to 3 dates:

June 6 ,13 & 20 these Sundays can be considered for celebrations, preferably it will be fixed on 6 th June 2021, depend upon Covid 19 situation.

Point No. 3. Chalk out programme :

On that day Programme will be
A. from 10. AM to 17.00 PM get together will be planned.

B. Morning snacks / Tea

C. Introduction about individuals/ his activites / remarkable contributions / family within 3 minutes per person.

D. At about 16-30 PM Teachers will be called and felicitated.

E. Programme will be concluded with high tea and vote of thanks.

Point No.4. Venue of the programme:

Hall located at Shri Gujrati Vidya Mandir can be requested, Hon'ble Anilji Patel former MLA Paithan will be approached for this permission.

Point No 5. Tentative financial requirement.:

This can be decided on the basis of No of persons likely to be gathered.

Point No, 6. Collection / contribution of fund:

Approximately Rs 1000 per person can be collected.

Point No.7. Can we Call our teachers to function also?

Shri B S Deshpande Sir and Shri Sudhir Deshpande Sir along with Head Master can be invited.

Point No 8. Can we have temporary website / email for us ?

Yes it can be prepared Dr Abhay Ekbote will be arranging for website and emails.

Point No.9. We require to request our school and get permission for our programme:

Narendra and Rajan will be approaching school for such person,

Finally it was decided to have one VC meeting per month will conducted besides regular whatsapp messaging.

Meeting was concluded with expressing vote of thanks to all persons who attended meeting.

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Khara Kuwa
Aurangabad
431001