ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय

ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, Education, Aurangabad.

16/01/2026

श्रृंगार होता संस्काराचा,
अंगार होता स्वराज्याचा,
शत्रुही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र आपल्या शिवबाचा.!

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार वंदन !

पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठेचे तेजस्वी प्रतीक असलेले संभाजी महाराज यांनी अत्यंत कठीण काळात स्वराज्याची धुरा समर्थपणे सांभाळली. धर्म आणि मातृभूमीसाठी अखेरपर्यंत अढळ राहणाऱ्या या महान योद्ध्यास कोटी-कोटी नमन !

जय भवानी ! जय शिवाजी !

#छत्रपती #संभाजी_महाराज #राज्याभिषेकदिन #स्वराज्यरक्षक #धर्मवीर मराठा_शौर्य

Photos from ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय's post 14/06/2025

कु. जान्हवी रुपाली अजय देवघरे
विद्यार्थिनी : वर्ग १२ वी ( विज्ञान ) : सन २०२४-२५

मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन ...!

नुकत्याच जाहीर झालेल्या NEET – 2025 ( वैद्यकीय पात्रता परीक्षा : २०२५ ) साठी ७२० गुणापैकी ५११ गुण प्राप्त करून विद्य्कीय सेवेसाठी अर्थात MBBS प्रवेशासाठी पात्र ठरत आहे. आई-वडिलांनी बघितलेले स्वप्न त्या सोबतच त्यांचे असलेले शुभ-आशीर्वाद आणि तुझी प्रामाणिक कष्ट करण्याची जिद्द यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे .

तुझ्या मुळेच आज आपल्या ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ट महाविद्यालयाची पहिली MBBS विद्यार्थिनी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. या साठी तुझे पुनश्य एकदा हार्दिक अभिनंदन ....!

पुढील शैक्षणिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...!

Photos from ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय's post 08/06/2025

शिक्षण संचालनालय ( माध्यमिक व उच्च माध्यमिक ) महाराष्ट्र राज्य, पुणे
११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ संबंधित विद्यार्थी व पालकांनसाठी महत्वपूर्ण जाहिर प्रगटण

Photos from ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय's post 19/05/2025

📍 महत्वपूर्ण सूचना

शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ साठी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेकरिता नोंदणी करणे अनिवार्य आहे.

ऑनलाइन प्रवेश नोंदणी प्रक्रिया दिनांक : १९ मे २०२५ पासून सुरु झाली आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी खालील शासकीय प्रवेश वेबसाइटला भेट देऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे:
https://mahafyjcadmissions.in

11/03/2025

रणांगण जीवनाचे करूनी वाहिले स्वराज्यास सर्वस्व,
निष्ठेपुढे शिवशंभुंच्या गनीम काय मृत्यूही हरला वर्चस्व..!!

मृत्यूचे आव्हान पेलूनी, जाज्ज्वल्य वारसा आम्हा दिला ।
शिवरायांचा शंभू छावा, धर्मवीर म्हणूनी अमर जाहला ॥

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या त्याग, समर्पण, संघर्ष, निष्ठा या मूल्यांच्या जोपासणीसाठी सर्वस्व त्यागणारे आणि छत्रपती शिवाजी महाराज एक व्यक्तीच नसून तर एक विचार आहेत, याचा वस्तुपाठ घालून देणारे वंदनीय छत्रपती संभाजी महाराज हे अनेक पिढ्यांचे आदर्श राहतील.

स्वराज्यरक्षक, धर्मवीर, छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिमित्त कोटी-कोटी प्रणाम!

Photos from ज्ञानेश्वरी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय's post 10/08/2024

राष्ट्र अभिमान जागवूया, आपल्या घरावर तिरंगा फडकवूया !

आपण ही ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान घर परिसर येथे भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकून ह्या मोहिमेत सहभागी होऊयात आणि राष्ट्राभिमान जागृत करूयात...
हर घर तिरंगा, घर-घर तिरंगा!

िरंगा

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Aurangabad