04/09/2025
मराठी पाऊल पडते पुढे...
वेगवेगळ्या व्यवसायांसह आता मराठी माणूस उद्योगांमध्ये सुद्धा आपले कौशल्य जोखून पाहत आहे..
नोकरी म्हणजे जीवन नाही,नोकरी म्हणजे सामर्थ्य पूर्ण उपयोगात आणलेच जाईल याची शाश्वती नाही, नोकरी ही कौशल्य वाढवणे, शिकणे यासाठी आणि एवढ्या पुरतीच असावी किंवा ती टाटा सारख्या उद्योग समूहाचा हिस्सा होण्याचे भाग्य देणारी असावी...
अन्यथा आपला उद्योग कधीही श्रेष्ठ!
माणसाचा जन्म काही नवनिर्माण करण्यासाठी किंवा जे उदात्त आणि उन्नत आहे त्यात भर घालण्यासाठी आहे..दोन वेळचे जेवण कमावण्यासाठी नाही असा माझा ठाम विश्वास आहे!
: Adv Rahul Navandar
Life Balancing Coach,Mentor,Career Counsellor,Competitive Exam Guide,Speaker and Writer
26/08/2025
🌸🙏 गणेश उत्सव 2025 – पिनॅकल इन्स्टिट्यूटचा अनोखा सामाजिक उपक्रम 🙏🌸
गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर नवीन आशा, नवी दिशा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असतो. या मंगलमय प्रसंगी पिनॅकल इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे विद्यार्थी आणि तरुणांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम – मोफत मार्गदर्शन कार्यशाळा, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्यांच्या स्वप्नांना पंख देणारे तज्ज्ञ मार्गदर्शन.
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा, योग्य नियोजन आणि सक्षम मार्गदर्शनाची गरज असते. अनेक वेळा, मार्गदर्शनाचा अभाव विद्यार्थ्यांच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरतो. पिनॅकल इन्स्टिट्यूटच्या या कार्यशाळेत, विद्यार्थ्यांना आणि इच्छुक तरुणांना मिळणार आहे व्यक्तिगत मार्गदर्शन, स्पर्धात्मक तयारीसाठी यशस्वी तंत्रे, आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची संधी.
कार्यक्रमातील अभ्यासक्रम:
UPSC / MPSC नागरी सेवा परीक्षा: योग्य अभ्यासपद्धती, योजना आणि तयारीसाठी मार्गदर्शन.
NDA / CDS / SSB संरक्षण सेवा परीक्षा: शारीरिक व मानसिक तयारी, इंटरव्ह्यू कौशल्य आणि संपूर्ण मार्गदर्शन.
Law – CLAT आणि CET: कायद्याच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन.
Banking आणि MBA – CAT, CET: स्पर्धात्मक परीक्षा तयारीसाठी पूर्ण धोरणे आणि तंत्रे.
Agniveer आणि Talathi भरती: सरकारी भरतीसाठी संपूर्ण तयारी आणि मार्गदर्शन.
Spoken English आणि Personality Development: आत्मविश्वास, संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्व विकास.
परदेशी शिक्षणाच्या संधी: उच्च शिक्षणासाठी जागतिक स्तरावर मार्गदर्शन आणि संधी.
मार्गदर्शक:
ॲड. राहुल नावंदर – विद्यार्थी आणि करिअर मार्गदर्शनात तज्ज्ञ.
श्री गोविंद खराड – परदेशी शिक्षणाच्या संधीसाठी विशेष मार्गदर्शक.
सामाजिक सहभाग:
हा उपक्रम समाजसेवेच्या भावनाने भरलेला आहे. गणेश मंडळांनी संपर्क साधून विद्यार्थ्यांना आणि तरुणांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे.
✨ गणेशोत्सवाच्या आनंदात, सामाजिक बांधिलकीच्या संवेदनशीलतेसह, पिनॅकल इन्स्टिट्यूटचा हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांच्या यशासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ✨
20/08/2025
शिक्षकांचा दृष्टिकोन म्हणजे समाजाचा दृष्टिकोन
शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. विद्यार्थ्यांचे विचार, चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याचे मोठे कार्य शिक्षकांमार्फत घडते. म्हणूनच शिक्षकांचा दृष्टिकोन जितका सकारात्मक आणि विधायक असेल, तितका समाजाचा विचारप्रवाहही प्रगल्भ घडतो.
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांना आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक जाण देणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकांनी स्वतःची कौशल्ये वृद्धिंगत करणे, आधुनिक साधनसंपत्तीचा उपयोग करणे आणि समाजाभिमुख भूमिका पार पाडणे गरजेचे आहे.
याच उद्देशाने ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या वतीने आयोजित शिक्षक ओरिएंटेशन कार्यक्रमाचे मार्गदर्शन *ॲड. राहुल नावंदर* करणार आहेत. शिक्षण क्षेत्रात आतापर्यंत 450 पेक्षा अधिक कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी सेवा दिली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या मातृरक्षा मासिकातर्फे ‘मातृरक्षा सन्मान 2022’ ने गौरविण्यात आले आहे.
अशा उपक्रमांमुळे शिक्षकांचा दृष्टीकोन व्यापक होऊन त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर आणि समाजाच्या उन्नतीवर होतो. त्यामुळे हा कार्यक्रम शिक्षकांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक जीवनदायी पाऊल ठरणार आहे.
17/08/2025
Let's meet at the National Abacus Championship Award Ceremony
Chief Guest : Hon Pradeepji Jaiswal,MLA,Chh Sambhajinagar
*Speaker : Adv Rahul G Navandar* ,
Competitive Exam Guide, Career Counsellor and *Senior Coordinator at Ignite Academy*, Member of *Vivek Vichar Manch*,Chhatrapati Sambhajinagar
07/08/2025
भेटूयात उद्या, सकाळीच 7:30 वाजता