Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA

Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA

Share

Educational Leadership and Guidance

06/11/2024

https://www.facebook.com/p/maharashtra-institute-of-educational-planning-and-administration-miepa-100063838964507/?mibextid=ZbWKwL

मिपा संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शालेय नेतृत्व अंतर्गत विशिष्ट विषयावर उत्तम काम करणाऱ्या तीन शाळांच्या *व्हिडिओ डॉक्युमेंटरी २०२३-२४* निपा, NCSL, नवी दिल्ली यांच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.
*1.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उंचखडक, ता.अकोले जि.अहमदनगर*
*2.जिल्हा परिषद हायस्कूल, चौसाळा, ता.जि.बीड*
*3.जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बिटरगाव, ता.उमरखेड,जि.यवतमाळ*

https://tinyurl.com/33n83u6t

मिपा संस्थेमार्फत महाराष्ट्रातील सकारात्मक बदल झालेल्या शाळांच्या यशोगाथा *शिक्षणातील दीपस्तंभ २०२३-२४* निपा, NCSL, नवी दिल्ली यांच्या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत.
https://tinyurl.com/bdf6rcpj

*संचालक, MIEPA-SLA, छत्रपती संभाजीनगर*

Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA Educational Leadership and Guidance

07/09/2022

राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे NIEPA येथे स्थापन करण्यात आले आहे शाळेचा कायापालट घडवून आणण्यासाठी, शाळा प्रमुखांना ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती यांमध्ये सक्षम करण्यासाठी या केंद्राची स्थापना झाली आहे. राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे कार्यक्रमासाठी रूपरेषा आणि शालेय नेतृत्व विकास केंद्रित असा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी कार्यरत आहे. शासन पत्र दि. 5, जानेवारी 2017 नुसार या संस्थेस राज्याची -School Leadership Academy म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज
https://www.facebook.com/Maharashtra-Institute-of-Educational-Planning-and-Administration-MIEPA-100133188184315

राष्ट्रीय शालेय नेतृत्व केंद्र (NCSL) हे NIEPA, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार दरवर्षी प्रमाणे या वर्षी सन २०२१-२२ मध्ये मिपा –SLA मार्फत खालील नेतृत्व विषयक साहित्य विकसित करण्यात आले असून निपा, नवी दिल्ली यांच्या http://ncsl.niepa.ac.in/ या राष्ट्रीय पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे.
• शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत केसलेट बुक (२५ केसलेट)– शालेय मुख्याध्यापकांसाठी संदर्भ साहित्य
http://ncsl.niepa.ac.in/case-study-2022-23.php
• PSLM या ऑनलाईन कोर्सचे संदर्भ साहित्य म्हणून शालेय समस्या सोडविण्यासाठी नेतृत्वाच्या कामगिरीचे सार्वत्रिकीकरणा अंतर्गत एकूण १३ मोड्यूलचे विकसन
http://ncsl.niepa.ac.in/sla-module-2022-23-mh.php
• शालेय / शैक्षणिक नेतृत्व संदर्भात संशोधन अहवाल
http://ncsl.niepa.ac.in/research-study-mh.php
SLA अंतर्गत विविध पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शाळांची व्हिडीओ डॉक्युमेंटरी NCSL,निपा, नवी दिल्ली यांच्या http://ncsl.niepa.ac.in/state-videos.php राष्ट्रीय पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहेत.
• १.के.व्ही.के.घाटकोपर सार्वजनिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय घाटकोपर – संगणकीय शिक्षण
https://youtu.be/CoDAmtMo89E
• २.कराड नगर परिषद शाळा क्रमांक ३,जिल्हा सातारा – वैशिष्ठ्यपूर्ण बाल शिक्षण
https://youtu.be/-_-XP9s_Fbc
• ३.आनंद निकेतन,सेवाग्राम,नई तालीम,वर्धा – जीवनाभिमुख व्यावसायिक शिक्षण
https://youtu.be/SRdXP6h2JTk

Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA Educational Leadership and Guidance

14/01/2021

आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद संस्थेच्या रौप्यमहोत्सव वर्षपूर्ती निमित्त "निपुण" स्मरणिका ई-प्रकाशन सोहळा, शिक्षणमंत्री मा. ना. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे शुभहस्ते *दि. 22 डिसेंबर 2020 रोजी संपन्न झाला.
उद्घाटनपर मार्गदर्शनात मा. ना. प्रा. वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, निपुण स्मरणकेतील सर्वच भाग वाचनीय असून यातून संस्था सर्वांपर्यंत पोहचणार आहे. तसेच रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त मिपा संस्थेच्या संचालक व मिपा टिमचे अभिनंदन केले.
👉 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज
https://www.facebook.com/Maharashtra-Institute-of-Educational-Planning-and-Administration-MIEPA-100133188184315/
📌 संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर ‘निपुण’ ई-स्मरणिका सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://www.miepa.ac.in

(डॉ. नेहा बेलसरे)
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद

Photos from Maharashtra Institute of Educational Planning and Administration - MIEPA's post 23/12/2020

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL) मार्फत तयार केलेल्या व महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) , औरंगाबाद द्वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत केलेल्या शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM) औपचारिक सुरुवात दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी झालेली होती. हा कार्यक्रम देशभरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुखांसाठी हा कार्यक्रम मोफत खुला आहे. तसेच भविष्यात शाळाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ शिक्षक या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात. त्यानुसार राज्यभरातून सदर कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याबद्दल सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींचे मनस्वी अभिनंदन.
नुकताच राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा) ,नवी दिल्ली यांचेकडून जिल्हानिहाय झालेल्या नोंदणीचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. त्यानुसार राज्यभरातून ७८६९ नोंदणी झालेली आहे. यामध्ये प्रथम क्रमांकावर नागपूर जिल्ह्याची सर्वाधिक नोंदणी झालेली आहे तर त्याखालोखाल जळगाव, सातारा, मुंबई उपनगर, पुणे अशी आघाडीवर असलेली जिल्हे आहेत. तर इतर जिल्ह्यांची नोंदणी अल्पप्रमाणात आहे. शालेय नेतृत्व आणि व्यवस्थापन यासोबतच शालेय सुधारणा आणि परिवर्तन होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणस्तरावरील शाळाप्रमुख व ज्येष्ठ शिक्षक यांना या कार्यक्रमाचा लाभ व्हावा म्हणून सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), प्राचार्य जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था तसेच सर्व संबंधितांनी आपआपल्या स्तरावरून नोंदणीसाठी आवाहन व प्रोत्साहित करावे.
👉🏻 मिपा संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज
https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315
तसेच
YouTube चॅनेल
लिंक:-https://youtu.be/g4MbLsJD5MA
नुसार आपणास बघता येईल
👉🏻 PSLM कोर्स माहिती साठी YouTube link
https://youtu.be/a6M_hLoielk
👉🏻 शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (Program on School Leadership and Management - PSLM) ऑनलाइन स्वरूपातील व राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था (निपा), नवी दिल्ली अधिकृत प्रमाणपत्र देणारा कोर्स मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. त्यासाठी पुढील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे आणि आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा.
Program for School Leadership and Management – PSLM नोंदणीसाठी करण्यासाठी वेबपोर्टल लिंक
http://pslm.niepa.ac.in/
फेसबुक पेज व YouTube channel ला आपण Like व Subscribe केल्यामुळे आगामी व उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात नोटिफिकेशन मिळून अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.
👉🏻 रजिस्ट्रेशन, लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत खालील तज्ञ व्यक्तींची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल.
श्री. धनंजय क्षिरसागर :- 98 6044 3300
श्री. ओमप्रकाश शेळके :- 98 2229 063
विशाल सोळंकी (भा.प्र.से.),
मा. शिक्षण आयुक्त,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, पुणे
तसेच
डॉ. नेहा बेलसरे
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद

20/12/2020

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद
Maharashtra Institute of Educational Planning and Administration (MIEPA), Aurangabad
मिपा (MIEPA) औरंगाबाद द्वारे रौप्य वर्षपूर्ती महोत्सव सोहळा
दिनांक 22 डिसेंबर 2020
वेळ सकाळी 11:00 वाजता
सर्व सन्माननीय अधिकारी ,कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक , मिपा या राज्यस्तरीय संस्थेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त विकसित
रौप्य महोत्सव स्मरणिका निपुण प्रकाशन मा.ना.वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री कॅबिनेट महाराष्ट्र राज्य. यांचे हस्ते होणार आहे. तसेच अधिकारी ऑनलाईन नेतृत्व संवर्धन व शैक्षणिक विकास , प्रशिक्षण कार्यक्रम { Leadership Enhancement & Academic Development } ची सुरुवात मा.ना. बच्चुभाऊ (ओमप्रकाश) कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री यांच्या हस्ते होत आहे.
सदर प्रसंगी
💐मार्गदर्शक व प्रेरणा💐
मा.श्रीमती वंदना कृष्णा,(भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन.
💐अध्यक्ष 💐
मा.श्री. विशाल सोळंकी (भा.प्र.से.) आयुक्त शिक्षण तसेच महासंचालक मिपा.
💐प्रमुख उपस्थिती💐
मा. श्री.राहुल द्विवेदी(भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, मुंबई तथा संचालक- SCERT.
आणि
मा. श्री हरिश कृष्णन
(MD) पब्लिक अफेअर्स अंड
स्टॅटजीक मॅट्रिक एंगेजमेंट सिस्को सिस्टम इंडिया व सार्क.
उपरोक्त मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे.
📌📌📌📌📌📌
मिपा संस्थेच्या अधिकृत page ला like करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315
तसेच उदघाटन सोहळ्यास ऑनलाईन जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.
YouTube Link:-
https://youtu.be/D_kaPjq0WqA
टीप: 3 डिसेंबर - 15 डिसेंबर या दरम्यान ज्या अधिकाऱ्यांनी लीड-LEAD कार्यक्रमासाठी नोंदणी केलेली आहे त्यापैकी Programme Monitoring and Evaluation आपण सुरू करीत आहोत.
डॉ.नेहा बेलसरे
संचालक.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद.

PSLM and LEAD Registration New Link 03/12/2020

MIEPA औरंगाबाद या संस्थेच्या वतीने दि. ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत मुख्याध्यापकांसाठी शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (program for school leadership and management -PSLM ) कार्यक्रम मराठी माध्यमातून NIEPA नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पोर्टल वर सुरु करण्यात येत आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी यापूर्वी दिलेल्या youtube link वर तांत्रिक अडचणीमुळे जॉईन होता येणार नाही. तरी नवीन YouTube खाली देत आहोत.

तसेच त्याच वेळेत MIEPA औरंगाबाद व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. LEAD - Leadership Enhancement and Academic Development हा कोर्स विस्तार अधिकारी ते राज्यस्तर अधिकारी यांच्यासाठी असून याची नोंदणी देखील सदर कार्यक्रमापासून सुरु करण्यात येणार आहे. तरी, सर्व अधिकाऱ्यांनी https://youtu.be/a6M_hLoielk या लिंक वर ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत उपस्थित राहावे.

- डॉ. नेहा बेलसरे
संचालक,
MIEPA औरंगाबाद

PSLM and LEAD Registration New Link Announcement about 2 Courses a. School Leadership and Management Course for all HMs b. Leadership Enhancement and Academic Development for all officers

02/12/2020

MIEPA औरंगाबाद या संस्थेच्या वतीने दि. ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत मुख्याध्यापकांसाठी शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (program for school leadership and management -PSLM ) कार्यक्रम मराठी माध्यमातून NIEPA नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पोर्टल वर सुरु करण्यात येत आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी खालील youtube link वर जॉईन व्हावे

तसेच त्याच वेळेत MIEPA औरंगाबाद व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक विकासासाठी ऑनलाईन कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. LEAD - Leadership Enhancement and Academic Development हा कोर्स विस्तार अधिकारी ते राज्यस्तर अधिकारी यांच्यासाठी असून याची नोंदणी देखील सदर कार्यक्रमापासून सुरु करण्यात येणार आहे. तरी, सर्व अधिकाऱ्यांनी https://youtu.be/g4MbLsJD5MA या लिंक वर ३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत उपस्थित राहावे.

- डॉ. नेहा बेलसरे
संचालक,
MIEPA औरंगाबाद

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Aurangabad
431001