08/10/2025
अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे आष्टी परिसरातील
बऱ्याचश्या गावांना पुराचा फटका बसून जमिनीची व पिकांची नुकसान झाली. हातावर पोट असलेले अनेक जण पावसाच्या पाण्याने अक्षरशः हवालदिल झाले.ही परिस्थिती पाहून हंबर्डे महाविद्यालयीन विध्यार्थी व कर्मचारी मानवतेच्या भावनेतून पुढे सरसावले त्यांनी गावात,नदीकाठी लोकांच्या भेटी घेऊन अडचणी जाणून घेतल्या शक्य तेवढी मदत करण्याचे ठरविले.
याप्रसंगी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आष्टी शहरात मदत फेरी काढून तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या खर्चातून निधी संकलित करून किराणा साहित्य, व जीवनआवश्यक वस्तूंचे परिसरातील टाकळसिंग, दैठण, हनुमान गाव, चिखली या गावात वाटप करून लोकांना मदतीचा हात दिला.
आम्ही समाजाचे एक घटक आहोत आज महाविद्यालय बाहेर पण आमचे सामाजिक दायित्व आहे या मानवतावादी भावनेतून हे मदत कार्य चालू आहे.