16/08/2026
#किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा #
किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय वडधा येथे दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोज शनिवारला 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आजच्या ध्वजारोहनाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष सतिश पाटील खेवले यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी उपाध्यक्ष मारोतरावजी दुरबुळे साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेवनाथजी गंडाटे, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष दुर्वेशजी खेवले, जं. का. चे अध्यक्ष शीडाम साहेब माजी पंचायत समिती सदस्य विवेक पा. खेवले ,प्राचार्य अमोल बोबाटे सर, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक रुंद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगान, राष्ट्रगीत, झेंडा गीत, राज्य गीत यांचे गायन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी काढण्यासाठी आली. प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून देशभक्तीपर नारे च्या माध्यमातून राष्ट्रवादाची भावना जागृत केली. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिक देशभक्तीपर गीतावर कवायत सादर केली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत आणि मनोगत व्यक्त केले.तसेच तंबाखू व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा सुद्धा घेतली. यावेळी कवायतीचे दिग्दर्शन खानोलकर सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.व्ही.डी. म्हशाखेत्री सर यांनी केले.तर आभार श्री.एच.यू.सुकारे सर यांनी मानले.