20/06/2024
श्रीमती. कृष्णाबाई सारडा इंग्लिश हायस्कूल ची १००% निकालाची परंपरा कायम
स्थानिक श्रीमती. कृष्णाबाई सारडा इंग्लिश हायस्कूल, अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती चा शैक्षणिक सत्र २०२३-२४ चा इयत्ता १० वी चा निकाल १००% लागला असुन यशाची उज्ज्वल परंपरा कायम राहिली. परिक्षेला एकुण ५६ विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ४४ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी मध्ये पास झालेले आहेत. तसेच कु.सिद्धी गोपालराव सिनकर ९४.४०% गुण घेवुन शाळेमधून प्रथम आली आहे. व ९०% च्या वर १४ विद्यार्थी, ८०% च्या वर २६ विद्यार्थी गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. कु. सिद्धी गोपालराव सिनकर ९४.४०%, वेदांत गजानन कोकाटे ९४.२०% कु. संस्कृती गजानन भावे ९४.००% कु. वेदिका नरेंद्र कांडलकर ९२.८०%, कु. सई संदिप काळे ९२.६०%, रूद्र योगेश गुहे ९२. ४०%, अथर्व शैलेशकुमार सरदार ९२.४०%, कु. माही प्रयत्नशील चौरपगार ९२.००%, कु. रिद्धी सुरज मिश्रा ९१.८०% कु. अनघा एकनाथ तुळे ९१.४०% कु. शिवाणी रविंद्र येऊल ९१.४०%, स्वयम प्रदिप भगत ९१.२०%, हम्मद अलयान मो. हिफझूर रहमान ९०.६०%, किष्णा नंदकिशोर सावरकर ९०.६०%, सार्थक अविनाश रोकडे ८९.६०% कु. भुमी रविंद्र बेदरकर ८८.८०% कु. अदिती तुळशीराम पखान ८८.६०%, कु प्रसिद्धी गोपाल जावरकर ८८.००%, कु. माही नाजुकराव पवार ८८.००% कु. अक्षता विशाल बोबडे ८७.८०%, अर्पित श्रीकृष्ण वानखडे ८७.४०% स्वयम शरद सरोदे ८७.४०%, सोहम दिनेश येवले ८५.४०%, कु. सोनल जितेंद्र रामटेके ८५.४०% घेउन उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव डॉ. श्री. अमरजी सारडा सर, शाळेच्या सी. इ. ओ. डॉ. सौ. माधुरी सारडा मॅडम, हायस्कूल मुख्याध्यापक श्री. हरीश पाचकवडे सर, प्री प्रायमरी मुख्याध्यापिका सौ. कुंदा नायडकर मॅडम तसेच शिक्षकवर्ग वरूण वर्मा सर, आशिष शिंदीजामेकर सर, दिपक फुसे सर, व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.