E- Ganesha

E- Ganesha या पेज वर ई गणेश च्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात येईल

सोनेरी भारताचे स्वप्न पाहत असणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणाईच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला कि, सरकारी शाळांमध्ये दिवसेंदिवस प्रवेश कमी होताना दिसत आहेत व शिक्षणाचा दर्जाही घसरत असल्याचे जाणवले त्यामुळे जिल्हा परिषद शाळा ओस पडण्याच्या मार्गावर असल्याचे जाणवले .परंतु उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी सरकारी शाळांना जिवंत ठेवणे आवश्क आहे त्याकरिता जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा उं

चावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील पालकांचा कल पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळावा या करिता आधुनीक शिक्षणपद्धतीचा वापर करण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करून त्यांना ई लर्निंग संदर्भातील साहित्य लोकसहभागातून पुरवण्याचे अभियान या ई गणेशा ग्रुप च्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे.

. Anil BondeDevendra Fadanvis - Fc
24/03/2024

. Anil BondeDevendra Fadanvis - Fc

ई-गणेशा फाउंडेशनच्या (येवदा, ता.दर्यापुर) वतीने आज (६ ऑगस्ट) कोविड महामारिता काम करणाऱ्या गावातील सर्व कोरोना योद्धांचा ...
07/09/2022

ई-गणेशा फाउंडेशनच्या (येवदा, ता.दर्यापुर) वतीने आज (६ ऑगस्ट) कोविड महामारिता काम करणाऱ्या गावातील सर्व कोरोना योद्धांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पुढील पिढ्या घडवायच्या असतील, राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रनिर्माणची भावना त्यांच्यामध्ये जागवायची असेल तर अशा कर्तव्यकठोर व्यक्तींच्या आदर्शाची गाथा त्यांना सांगायला हवी. जेणेकरून आयुष्यात येणाऱ्या अनंत अडचणीवर यशस्वीपणे त्यांना मात करता येईल. ज्यातून देशाचा पाया असणारा युवक हा मजबूत होईल. राष्ट्र स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करेल, असे प्रतिपादन याप्रसंगी केले. कार्यक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या संपूर्ण गावकऱ्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो. आपल्या अमूल्य योगदानामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.
#ई-गणेशाफाउंडेशन #अमरावती
#कोविडयोद्धासन्मान

Look what I shared: तुम्ही ध्येयाने पछाडलेले आहात? आम्ही शोधतोय तुम्हाला, जुळा आमच्याशी..युवक नोंदणी अभियानात सहभागी व्ह...
14/05/2020

Look what I shared: तुम्ही ध्येयाने पछाडलेले आहात? आम्ही शोधतोय तुम्हाला, जुळा आमच्याशी..युवक नोंदणी अभियानात सहभागी व्हा आणि आमच्या उपक्रमाची माहिती मिळवा खालील फॉर्म भरुन |

स्वयम् बहुउद्देशीय संस्था, अकोला लवकरच आपल्या सेवेत काही लोकहितार्थोपयोगी उपक्रम घेऊन येणार आहे. ज्यामाध्यमातू...

23/09/2018

सिटी न्यूज अमरावती

21/09/2018
वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता साय.७ वा. गांधी चौक येवदा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.😢😢
07/04/2018

वीर जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता साय.७ वा. गांधी चौक येवदा
आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
😢😢

कर्मयोगी गाडगे बाबांना विनम्र अभिवादन
20/12/2017

कर्मयोगी गाडगे बाबांना विनम्र अभिवादन

मला त्या कुठल्याही देवांची गरज नाही,जो मनुष्याला जिवंतपणी उपाशी व मेल्यावर स्वर्गाची सुख दाखवतो.व मला अशा धर्माचीही गरज ...
06/12/2017

मला त्या कुठल्याही देवांची गरज नाही,जो मनुष्याला जिवंतपणी उपाशी व मेल्यावर स्वर्गाची सुख दाखवतो.व मला अशा धर्माचीही गरज नाही जो एका भारतीयास दुसऱ्या भारतीयासोबत लढावयास लावतो."
*___बाबासाहेब आंबेडकर*
*मंदिर* बांधल्याने *भिखारी* तयार होतात..!
*ग्रंथालय* उभारल्याने *अधिकारी* तयार होतात..!

आजच्या गतिमान युगात वाढती स्पर्धा जीवघेणी ठरत आहे , त्यामुळे मानवी जीवन झपाट्याने बदलत आहे, याचाच परिणाम असा होत आहे कि ...
27/11/2017

आजच्या गतिमान युगात वाढती स्पर्धा जीवघेणी ठरत आहे , त्यामुळे मानवी जीवन झपाट्याने बदलत आहे, याचाच परिणाम असा होत आहे कि कळत न कळत आपण पर्यावरणाशी खेळतो आहे , आपल्या काही सवयीमुळे निसर्गाची आपण किती हानी करतो आहे, पर्यायाने आपण आपल्याही जीवाशी खेळतो आहे याचा साधा विचारही करायला आज लोकांकडे वेळ नाही . प्लास्टिक पिशव्यांचा वापर हा त्याचाच एक भाग आहे , आज शहरी व ग्रामीण भागात ह्या कॅरीबग डोकेदुखी ठरत आहेत , जाळल्यास त्याचा धूर अत्यंत विषारी निघतो ,व तश्याच ठेवल्यास त्या नष्ट होत नाहीत , अनेक जनावरे ह्या पिशव्या खावून दगावल्याची अनेक उदाहरणे आहेत या सर्वांचा मानवी जीवनावर गंभीर परिणाम होत आहे . या बाबतची जनजागृती येवदा येथील ई गणेशा फाउंडेशन करीत आहे , शाळांतील विध्यार्थ्यांना या प्रदुषणाचा संभाव्य धोका समजावून सांगणे तसेच त्यांना प्लास्टिक वापरा पासून होणारे दुष्परिणामा बद्दल अवगत करणे असे उपक्रम ई गणेशा फाउंडेशन तर्फे यंदा राबविण्यात येत आहेत , याच संदर्भात शाळांतील विध्यर्थ्यांना फाउंडेशन तर्फे नुकतेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले , या पिशव्यांवरील संदेश आपल्या पाल्यांना वाचून दाखविण्याचे व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह करण्याचे आवाहन विद्यार्थाना या प्रसंगी करण्यात आले .

ई गणेशा फाऊडेशन येवदा ची पारंपारिक पद्धतीची मिरवणूक
05/09/2017

ई गणेशा फाऊडेशन येवदा ची पारंपारिक पद्धतीची मिरवणूक

Address

गांधी चौक येवदा
Amravati
४४४७०६

Telephone

07224-237229

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when E- Ganesha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to E- Ganesha:

Shortcuts

Share