Vinayak Vidyamandir Jr. College, Amravati

Vinayak Vidyamandir Jr. College, Amravati "Good qualities put their footprints everywhere"

Our college is dedicated to instiling good qualities and intellectual vision into the students.

We are committed to provide education to one who is needy.Our success lies in the growth of students.

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे दिनांक 5 जून 2026 रोजी H.S.C बोर्ड मध्ये गुणवत्ता प्राप्त विद...
16/06/2026

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे दिनांक 5 जून 2026 रोजी H.S.C बोर्ड मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ पद्माकर टाले आणि अध्यक्ष म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना ठाकरे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रम मधे सर्व गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.दरम्यान विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

स्थानिक प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट संचालित विनायक विद्यामंदिर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्...
16/06/2026

स्थानिक प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट संचालित विनायक विद्यामंदिर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रभारी प्राचार्य कल्पना ठाकरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून केली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे हा होता. प्रा ठाकरे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकरांचा "शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश अधोरेखित केला. केवळ त्यांची जयंती साजरी करणे पुरेसे नाही, तर त्यांचे विचार आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे यावर त्यांनी भर दिला. डॉ. आंबेडकरांच्या वाचनाच्या आवडीचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करण्यास प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य ठाकरे मॅडम यांच्यासह विविध प्राध्यापक सदस्य: प्रा.चौधरी मॅडम, प्रा. बावने मॅडम, प्रा. सोनरकर सर, प्रा.खेडकर मॅडम, प्रा.नेवारे सर, प्रा.इंगळे सर आणि ११ वीचे सर्व विद्यार्थी तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र पोलीस अंमली पदार्थ विरोधी पथक, अमरावती आणि विनायक विद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यम...
16/06/2026

महाराष्ट्र पोलीस अंमली पदार्थ विरोधी पथक, अमरावती आणि विनायक विद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात वक्त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम तसेच फॅटी लिव्हर, अल्कोहोलिक हेपेटायटीस, लिव्हर सिरोसिस, अल्सर, हृदयविकार, कर्करोग आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांबद्दल माहिती दिली.

एपीआय मचाले सर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद भगत, अधिराज इंदूरकर आणि शिवराज पवार या वक्त्यांनी तरुणांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन केले आणि व्यसनाधीन असलेल्यांना पोलीस पथकाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. टाले सर यांनी पोलीस पथकाचे आभार मानून केला. यावेळी विविध प्राध्यापक आणि कर्मचारीही उपस्थित होते.

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत संचालित विनायक विद्यामंदिर सायन्स ज्युनिअर कॉलेज, अमरावती येथे माजी विद्यार्थी मेळा...
16/06/2026

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत संचालित विनायक विद्यामंदिर सायन्स ज्युनिअर कॉलेज, अमरावती येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. 23/03/26 रोजी झालेल्या या मेळाव्यात 2003-2025 या बॅचमधील मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली.माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री. अनिकेत माथने सर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य डॉ. टाले सर, प्रा. माधुरी चौधरी (माजी विद्यार्थी संघटनेच्या समन्वयक), प्रा कल्पना ठाकरे आणि प्रा. सुखदेवे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आले. अनेक वर्षांनंतर माजी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटून भावूक झाले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पद्माकर टाले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कल्पना ठाकरे, माजी विद्यार्थी समन्वयक प्रा. माधुरी चौधरी, प्रा. अजय सोनरकर, प्रा. पल्लवी बावने, प्रा. हर्षल इंगळे, प्रा. केतकी खेडकर आणि धीरज नेवारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्री. अनिकेत माथने, उपाध्यक्ष - शुभम केवतकर, कोषाध्यक्ष - गौरव खाडे, सचिव - गौरी अनसिंगकर, सहसचिव - समृध्दी विधळे आणि सदस्य कनक अग्रवाल व संस्कृती कसले यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.

यावेळी महाविद्यालयचि प्राचार्य टाले सर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या ठाकर मॅडम, समस्त शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक...
16/06/2026

स्थानिक प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28/02/2026, शनिवार रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय पहिले नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन यांच्या ऐतिहासिक शोधातील 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन इफेक्ट या संशोधनाच्या आठवणीत हा दिवस भारतात "राष्ट्रीय विज्ञान दिन" म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र वानखेडे तसेच प्रमुख अतिथी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, काटोल येथील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विवेक नरखेडकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानिमित्ताने महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना कल्पना देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी डॉ. नरखेडकर यांनी विज्ञान विषयावर मार्गदर्शन केले. विज्ञानामुळे मानव जीवनात झालेले बदल, तंत्रज्ञानाचे फायदे आणि विद्यार्थ्यांनी विज्ञानाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी विज्ञान प्रदर्शन आणि मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनामध्ये जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व संगणक विभागातील विद्यार्थ्यांनी आपले उत्कृष्ट प्रकल्प सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय सोनरकर यांनी केले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कल्पना ठाकरे व इतर सर्व शिक्षक, वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे दिनांक 16/02/2026 ते 18/02/2026 या कालावधीत वार्षिक स्नेहसंमे...
18/03/2026

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे दिनांक 16/02/2026 ते 18/02/2026 या कालावधीत वार्षिक स्नेहसंमेलन "उमंग 2026" पार पडले गेले. ह्या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम घेण्यात आले. ज्यामध्ये चेस, क्रिकेट, धावणे, गोळा फेक, rassi खेच, संगीत खुर्ची, रांगोळी, मेहंदी, डिश डेकोरेशन, क्राफ्ट स्पर्धा, पुष्परचना, पोस्टर स्पर्धा, विज्ञान मॉडेल , नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, मिमिक्री, फॅशन शो इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे शनिवार दिनांक 24/01/2026 रोजी वर्ग 12 वी च्या विद्यार्थ्यांचा...
18/03/2026

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अमरावती येथे शनिवार दिनांक 24/01/2026 रोजी वर्ग 12 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.कार्यक्रमारीता विनायका गुरुकुल च्या संचालिका सुर्वे मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आली.विविध विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कल्पना ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्या करिता मार्गदर्शन केले.

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजा...
12/02/2026

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली.हा दिवस युवक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.कार्यक्रमा निमित्त स्वामी विवेकानंद यांचे जीवन चरित्र या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.कार्यक्रमारीता सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथे शनिवार दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची ज...
12/02/2026

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथे शनिवार दिनांक 03 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमा करिता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कल्पना ठाकरे मॅडम व इतर शिक्षक उपस्थित होते.त्यांनी फोटो चे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी कर्मयोगी संत गाडगेबाबा या...
12/02/2026

विनायक विद्यामंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, अमरावती येथे शनिवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी प्रतिमा पूजन व हारर्पण करून साजरी करण्यात आली.त्यानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या कल्पना ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांनी केलेली समाज जागृती व मानवसेवेचे कार्य यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.

Address

Near Chhatri Talao, Behind NH6, Dastur Nagar Road
Amravati
444606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinayak Vidyamandir Jr. College, Amravati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category