28/10/2022
नमस्कार व दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...
अमरावती जिल्ह्यात काम करणाऱ्या विविध संस्था/कार्यकर्ते यांना जोडण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.
*बैठकीचे विषय*
# एकदुसऱ्यांच्या कामाचा परिचय व्हावा.
# परस्परांना शक्य असेल ती मदत करता यावी.
# चांगले काम करणाऱ्यांना समाजापुढे आणून त्यांना समाजाचा सर्व प्रकारचा पाठिंबा मिळवून देता यावा.
# आर्थिक/वस्तुरुपात वा अन्य प्रकारची साधने याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन.
# संस्था नोंदणी, धर्मादाय कार्यालय, 12A, 80G, FCRA इत्यादी बाबत मार्गदर्शन.
आपण जरूर यावे ही आग्रहाची विनंती. बैठक वेळेवर सुरू होईल व पूर्ण वेळासाठी सहभाग अपेक्षित आहे.
आपल्या सहभागाबाबत मला व्हॉट्सॲप वर निश्चिती कळविल्यास सोयीचे राहील.
इतरही कोणी इच्छुक असल्यास त्यांना पण बैठकीमध्ये सहभागी होण्यास सांगता येईल.
*दि. २९ ऑक्टोबर, शनिवार*
वेळ : दुपारी १ ते ५
स्थळ : *प्रयास सेवांकुर भवन, विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती.*
शुभेछासह.
आपला,
डॉ. अविनाश सावजी