20/05/2023
एमएससीआयटी (MSCIT) कोर्स काय आहे? – What is MSCIT Course?
एमएससीआयटी (MSCIT) हा एक Computer Certification Course आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासन अंतर्गत चालवला जातो. एमएससीआयटी (MSCIT) हा कोर्स अश्या लोकांसाठी आहे ज्यांना माहिती तंत्रज्ञानात रुची आहे. कोर्स पूर्ण केल्यावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाते. एमएससीआयटी (MSCIT) कोर्स चा उपयोग कॉम्पुटर शिकण्यासाठी होतो. दहावी-बारावी झाल्यावर अनेकजण हा कोर्स करतात.
MSCIT कोर्स MKCL (Maharashtra Knowledge Corporation Limited) द्वारे चालवला जातो. 2001 मध्ये MKCL द्वारे या कोर्स ची सुरुवात करण्यात आलेली आहे. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना किंवा हा कोर्स करणारा प्रत्येक व्यक्तीला कंप्यूटर कसे चालवावे यापासून कंप्यूटर मध्ये असलेल्या विविध फंक्शन ची माहिती शिकवली जाते. हा बेसिक लेव्हल चा कोर्स आहे. या कोर्स चे प्रमाणपत्र भविष्यात नोकरीसाठी उपयोगी असते.
MSCIT चा फुल फॉर्म “Maharashtra State Certificate in Information Technology” असा होतो. MSCIT चा मराठी अर्थ “महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी” असा आहे.
एमएससीआयटी (MSCIT) हा एक Computer Certification Course आहे जो महाराष्ट्र शासन अंतर्गत चालवला जातो.
कोर्सचे नाव Maharashtra State Certificate in Information Technology
संस्था MKCL
कालावधी २ ते ३ महिने
MSCIT कोर्स मध्ये सुरुवातीला कॉम्पुटर चे बेसिक ज्ञान दिले जाते. कम्प्यूटर च्या विविध भागांची ओळख करून दिली जाते. तसेच कम्प्युटर कसे चालू करायचे कसे बंद करायचे याची देखील माहिती दिली जाते.
त्यानंतर MSCIT (MSCIT Course Information in Marathi) कोर्स मध्ये पुढील विषय शिकवले जातात. एम.एस.सी.आय.टी या संपूर्ण कोर्समध्ये थेर (Theory), प्रॅक्टिकल (practical) आणि ERA शिकविले जाते.
Windows 10
Internet
MS Word 2019
MS Excel 2019
MS PowerPoint 2019
MS outlook
ERA
निष्कर्ष –
कॉम्पुटर क्षेत्रात नवीन असणाऱ्यांसाठी MSCIT कोर्स MSCIT Course Information in Marathi हा एक चांगला पर्याय आहे. Computer बद्दल बेसिक ज्ञान मिळवायचं असेल तर हा कोर्स नक्की करा. याच्या प्रमाणपत्राचा फायदाही तुम्हाला होईल. MSCIT कोर्स फक्त महाराष्ट्रात चालवला जातो, हा केल्यावर महाराष्ट्र सरकारचे प्रमाणपत्र मिळत असते.
MS-CIT प्रवेश वेगाने सुरु !!
त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा !!
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
तेलाई पब्लिक रिलेशन
पत्ता : प्रतीक टॉवर शंकर नगर रोड अमरावती मो. ९९२३१०८५६९