12/05/2026
*आठवणींच्या शाळेत पुन्हा एकदा... सरस्वती विद्यालय, अमरावती! 🌸*
प्रिय माजी विद्यार्थी मित्रांनो/मैत्रिणींनो, सप्रेम नमस्कार.
आपल्या शाळेचे ते दिवस आठवतात का? तो छोटासा वर्ग, जुनी इमारत, तुटकी बाकं, पण त्यामध्ये दडलेला अफाट आनंद आणि स्वप्न! आपण अशा काळात शिकलो जिथे तंत्रज्ञान फारसं नव्हतं, पण एकमेकांप्रति जिव्हाळा आणि शिक्षकांबद्दल कमालीचा आदर होता. आज आपण आयुष्यात वेगवेगळ्या शिखरांवर आहोत, पण आपलं मूळ मात्र त्याच जुन्या शाळेच्या मातीत आहे.
*एक आनंदाची बातमी...*
काळ बदलला तशी आपली शाळाही बदलली आहे. परंतु जुन्या शाळेप्नरमाणेच हिरवेगार निसर्गाच्या सावलीत इको क्लब ची सुरवात करून २०१२ पासून आपली शाळा एका अतिशय सुसज्ज आणि आधुनिक नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाली आहे. आजच्या विद्यार्थ्यांना त्या सर्व सुख-सोयी मिळत आहेत ज्यांची आपण केवळ स्वप्न पाहिली होती.
*माजी विद्यार्थी... जुन्या आठवणींना उजाळा .... शाळेच्या प्रगती पथाचे मार्गदर्शक... निरंतर शाळेचा अभिमान .....*
तुमच्याशिवाय या नवीन इमारतीला ती जुनी शोभा नाही. तुम्ही कुठे आहात? काय करत आहात? तुमच्या त्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या व्हाव्यात आणि आपल्या शाळेच्या सर्वांगीण विकासात तुमचा मोलाचा वाटा असावा, हीच आमची इच्छा आहे.
चला, पुन्हा एकत्र येऊया!
शाळेच्या प्रगतीसाठी तुमचे अनुभव, तुमचे मार्गदर्शन आणि शक्य असल्यास तुमची मदत ही आपल्या पुढच्या पिढीचे भविष्य उज्ज्वल करू शकते.
*"शाळा केवळ इमारत नसते, ती संस्कारांची खाण असते. चला, आपल्या शाळेच्या या प्रवासात आपणही वाटेकरी होऊया!"*
तुमच्या प्रतिसादाची आणि भेटीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
कृपया खालील गुगल फॉर्म भरून आपली माहिती द्या:
🔗https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeKad-oI0Mpht19MRe5jRKnQJ0iPg4gpd5AhUqFJpzeex0PlA/viewform?usp=header