09/01/2023
*डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे १८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत*
अमरावती (प्रतिनिधी)
आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील स्व. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपला गुणवत्तेचा दबदबा कायम ठेवला आहे. विद्यापीठाच्या वतीने नुकत्याच जाहीर झालेल्या मेरिट लिस्ट मध्ये डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या तब्बल 18 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ताची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील विद्यापीठाच्या यादीत मोठ्या प्रमाणात स्थान मिळविले आहे. एल एल बी तीन वर्षीय अभ्यासक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यामध्ये प्रतीक संजय सगणे या विद्यार्थ्याने विद्यापिठाच्या गुणवत्ता यादीत अनुक्रमे प्रथम स्थान प्राप्त करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यापीठ गुणवत्ता यादीत शुभम ईश्वरदास भुयार हा सहावा तर कृष्णा दामोदर झंवर या विद्यार्थ्याने आठवे, सय्यद ताबीज एजाज नववा क्रमांक तर अंकुश दिगंबर इंगळे याने गुणवत्ता यादीत दहावा क्रमांक प्राप्त केला आहे.
एल एल बी पाच वर्षीय अभ्यासक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आयुक्ती सुभाष किरटकर हिने गुणवत्ता यादीत प्रथम स्थान प्राप्त केले असून दुसरे स्थान याच महाविद्यालयाचा ऋषिकेश मंग आणि तृतीय स्थान अनुजा सुधीर चौधरी या विद्यार्थिनी मिळविला आहे. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत शिवानी वीरेंद्र खापरी सहाव्या क्रमांकावर आहे. एलएलएम अभ्यासक्रमात नऊ विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रणाक्षी प्रणय मालवीय हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून हेमलता गजानन आत्राम,मनीषा नामदेव राऊत यांनी संयुक्तरीत्या तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे.गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकावर गजानन गायकवाड सहावा क्रमांक, कीर्ती अशोकराव खटाळे सातव्या क्रमांकावर, मिलिंद थोरात आठव्या क्रमांकावर, देवकिशन तावणी आणि कोमल श्रावगी यांनी नवव्या क्रमांकावर गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे .दहाव्या क्रमांकावर पंकज वसंत दाभाडे यांनी गुणवत्ता यादी येण्याचा बहुमान पटकावला आहे. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळवल्याबद्दल प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी तसेच तीन वर्षीय अभ्यास क्रमाचे प्रमुख प्रा. डॉ रामटेके, पाच वर्ष अभ्यास क्रमाचे प्रमुख डॉ पाटील,एल एल.एम अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. प्रकाश दाभाडे व सर्वच शिक्षक वृंद आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच कौतुक केले आहे.विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य, शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिले आहे.गुणवत्ता प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आणि त्यांच्या नेतृत्वातील सर्व कार्यकारिणी अभिनंदन केले आहे