08/05/2026
मणीबाई गुजराती हायस्कूलने ठेवली यशाची परंपरा कायम
विद्यालयाचा निकाल 100%
अमरावती : 08/05/2026
दी. गुजराती एज्युकेशन सोसायटी, अंबापेठ, अमरावती द्वारा संचालित विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या प्रतिष्ठित मणीबाई गुजराती हायस्कूल च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी/मार्च 202६ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाने यावर्षी देखील १००% यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा निकाल १००% लागला असून विद्यालयाची विद्यार्थिनी कु. नियती दीपक खवले हिने ९६.२०% गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. तर व्दितीय क्रमांकाची मानकरी कु. ईश्वरी विनोद भोपळे ९४.६०% गुण प्राप्त केले. तृतीय क्रमांकाचे मानकरी अनुक्रमे मा.क्रिश श्रीकृष्ण बांते ९४.४०% कु. भूमिका प्रकाश पुनसे याने ९४.४०% गुण प्राप्त करून ठरले आहे. विद्यालयातून १०७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत ११४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्यापैकी एकूण २३ विद्यार्थ्यानी 90% व त्या पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अंजली देव यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनात सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी, पालक वृंद यांच्या एकत्रित प्रयत्नातून हे उज्वल यश प्राप्त झाले असून वर्षभरात राबवलेल्या लेखी परीक्षा ,सराव परीक्षा, उजळणी वर्ग इत्यादीचा फायदा विद्यार्थ्यांना झाला आहे. तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करून मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थी आणि पालक वर्गाने देखील विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाचे श्रेय मणीबाई गुजराती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अंजली देव आणि समस्त शिक्षक वृंदास दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल दी गुजराती एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष माननीय श्री. सुरेशभाई राजा, उपाध्यक्ष मा. श्री. निलेशभाई लाठीया, सचिव मा. श्री.हितेंद्रभाई धाबलिया, कोषाध्यक्ष श्री.राजेशभाई पटेल, सहसचिव मा. श्री.तुषारभाई श्रॉफ, आय.पी.पी. मा. श्री.दिलीपभाई पोपट, सर्व कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका सौ.अंजली देव,उपमुख्याध्यापक श्री. अनिल पंजाबी,पर्यवेक्षक श्री. प्रवीण सावजी, सौ. सरिता गायकवाड,पर्यवेक्षक श्री. अरविंद हिरपरा, मुख्य लिपिक श्री. कमलेश वस्तानी यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.