Shri Shivaji College of Physical Education, Amravati.

Shri Shivaji College of Physical Education, Amravati. Shri Shivaji College of Physical Education is one of the leading academic and dynamic institution of

21/04/2024
Students Induction Programme
14/04/2024

Students Induction Programme

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे शिक्षण महर्षी डॉ .पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख यांची  59 व्या पु...
13/04/2024

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे शिक्षण महर्षी डॉ .पंजाबराव उपाख्या भाऊसाहेब देशमुख यांची 59 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने  भव्य दिव्य महिला बाईक रॅली चे  यशस्वी आयोजन  स्थानिक :-आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ...
10/03/2022

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भव्य दिव्य महिला बाईक रॅली चे यशस्वी आयोजन

स्थानिक :-आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती, रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरी व रोटरॅक्ट क्लब व बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावती च्या संयुक्त विद्यमानाने व अमरावती शहर पोलीस आयुक्तलय यांच्या सहकार्याने मंगळवार 8 मार्च २०२२ रोजी भव्य दिव्य बाईक रॅलीचे ,झुम्मा डान्स इव्हेन्ट व विशेष कार्यक्रमाचे आयोजन अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय समोरील पोलीस ग्राउंड वर करण्यात आले
त्यानुसार जागतिक महिला दिनानिमित्त सर्वप्रथम झुम्मा डान्स इव्हेन्ट चे आयोजन ट्रेनर श्री आशिष लुल्ला व टीम द्वारे आयोजन करण्यात आले त्यानंतर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह , तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती चे प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे , रोटरी क्लबचे अध्यक्ष संकेत मोहता व सेक्रेटरी गौरव वानखडे व प्रोजेक्ट डायरेक्टर मोनाली ढोले ,श्री अतुल कोल्हे उपस्थित होते
सदर कार्यक्रमांमध्ये सन्माननीय मान्यवरांचे फुलगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह , यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जागतिक महिला दिन साजरा करणे हे काळाची गरज आहे
तसेच अमरावती शहरांमध्ये महिला सुरक्षित आहे महिलांची सुरक्षिता साठी संपूर्ण पोलीस दल सज्ज आहे त्यामध्ये दामिनी पथक ,सायबर सेल, महिला सेल विभाग इत्यादींचा समावेश आहे असे प्रतिपादन केले व आजच्या कार्यक्रमाचे आयोजन संबंधित ज्यांनी नियोजन केले त्यांचे त्यांनी आभार मानले व अभिनंदन मॅडम नी केले
त्यानंतर सौ नंदा सोनवणे यांना लॉंग जम्प या इव्हेंटमध्ये मध्ये गोल्ड मेडल मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार सन्माननीय पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांच्या हस्ते करण्यात आला
वरील कार्यक्रमाचे संचालन डॉ. मोनाली ढोले , कु वैष्णवी इंगळे यांनी केले
त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्विता करता पोलीस निरीक्षक सीमा दातारकर पोलीस उपअधीक्षक पुनम पाटील पोलीस निरीक्षक नीलेकर मॅडम यांचे आभार कार्यक्रमस्थळी मानले. त्यानंतर कु. मनाली जावेरी यांनी बाईक रॅलीच्या रूट बद्दलची माहिती दिली व पोलीस उपअधीक्षक पुनम पाटील यांनी बाईक रॅली संबंधीची विशेष सूचना दिली.
त्यानंतर सन्माननीय पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह यांनी सदर बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात झाली सदर रॅली ही पोलीस ग्राउंड वरून 2 किमी च्या मार्गावर आयोजित करण्यात आली
वरील कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थिनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, विविध संघटनेच्या पक्षाच्या पदाधिकारी ,रोटरी क्लबचे सदस्य व श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

स्थानिक:- दिनांक 1 जानेवारी रोजी नवीन वर्षानिमित्त श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती नी ऑक्सीजन पार्क ला भे...
03/01/2022

स्थानिक:- दिनांक 1 जानेवारी रोजी नवीन वर्षानिमित्त श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती नी ऑक्सीजन पार्क ला भेट दिली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे , महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ.पी.एस , डॉ. पुष्पलता देशमुख व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बी.पी.एड, डी.वाय.एड , बी.पी.एस कोर्स चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते
सर्वप्रथम ऑक्सीजन पार्क च्या भेटीदरम्यान ज्यांच्या संकल्पनेतुन ऑक्सीजन पार्क ची निर्मिती झाली असे पर्यावरण जणजागृती उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले माननीय श्री अशोक कविटकर सेवानिवृत्त सहाय्यक वनरक्षक यांचे प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे यांनी फुलगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे यांनी श्री माननीय अशोक कविटकर यांचा परिचय दिला व त्यांनी ऑक्सीजन पार्क संदर्भात च्या केलेल्या कार्याबद्दल व दिलेल्या योगदानाबद्दल बद्दल विस्तृत माहिती दिली
त्यानंतर माननीय अशोक कविटकर यांनी आपले मार्गदर्शन करतांना ऑक्सीजन पार्क च्या पूर्वीच्या जागेविषयी माहिती दिली त्यामध्ये त्यांनी ही जागा शहरातील पाच एकराचे वनक्षेत्र आहे व पूर्वी या जागेचा डम्पिंग ग्राऊंडकरिता त्याचा वापर श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती यांची नवीन वर्षानिमित्त ऑक्सीजन पार्क ला भेट

होत होता त्यानंतर वनविभागाच्या माध्यमातून या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर झाले आहे. शहर सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षणस्थळ निर्माण झाले आहे असे प्रतिपादन व उल्लेख आपल्या मार्गदर्शनात केला व नंतर कविटकर सरांनी महाविद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तथा विद्यार्थिनीं ना संपूर्ण ऑक्सिजन पार्क फिरून पार्कमधील वड, पिंपळ, निम व बिहाडा व बांबू वृक्षाची विस्तृत माहीती दिली व त्यांचे महत्त्व विशद केले ऑक्सीजन पार्क च्या भेटीच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने माननीय श्री अशोक कविटकर यांनी आपल्या दैनंदिन कार्यक्रमातून महत्त्वपूर्ण वेळ देऊन दिलेल्या सहकार्याबद्दल यांचे आभार डॉ. पुष्पलता देशमुख यांनी व्यक्त केले

Student- Teacher Integration on 2020-21 review (Online -Offline classes, Exam etc)
31/12/2021

Student- Teacher Integration on 2020-21 review (Online -Offline classes, Exam etc)

स्थानिक श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे  27 व 28 डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख  य...
31/12/2021

स्थानिक श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे 27 व 28 डिसेंबर रोजी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची 123 वी जयंती महोत्सव निमित्य ग्रंथप्रदर्शनी उद्घाटन कार्यक्रमाचे व करियर कट्टा फलकाचे अनावरण करण्यात आले
यानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचे व आयोजन महाविद्यालय येथे करण्यात आले होते उपरोक्त कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे , डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख, श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. राऊत, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.रामेश्वर भिसे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन कोरपे श्री शिवाजी शिक्षण संस्था चे आजिवन सदस्य डॉ.बी.एच बंड यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचप्रमाणे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून डॉ. महेंद्र मेटे, श्री नरेंद्र येते सह संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती, सौ मनाली तायडे उपस्थित होते सोबतच श्री शिवाजी शारीरिक , शिक्षण व आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयात तील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पी.एस .सायर डॉ. उल्हास देशमुख डॉ. पुष्पलता देशमुख डॉ. संजय खडसे ,
डॉ. छत्रिय, डॉ. सुभाष गावंडे डॉ. वंदना खाकरे, डॉ. अमित गावडे यांनी विज्ञानवादी, विचारवंत, शिक्षणमहर्षी ,भारताचे प्रथम कृषी मंत्री ,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन हारार्पण व दीपप्रज्वलन करून पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले व सोबतच ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन व करियर कट्टा फलकाचे अनावरण केले

Address

Near Panchwati Chowk,Amravati,Maharastra
Amravati
444603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Shivaji College of Physical Education, Amravati. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share