Sane Guruji School Amalner Silver Jubilee Year

Sane Guruji School Amalner Silver Jubilee Year Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sane Guruji School Amalner Silver Jubilee Year, School, Dhule Road Amalner, Amalner.

सेवा निवृत्ती ? छे छे !! ही तर क्षणभर विश्रांती !मनासारखे जगणे आता, आनंदाची अनुभूती !जीवनातला वसंत हा, अनुभवांचा प्राजक्...
30/12/2020

सेवा निवृत्ती ? छे छे !! ही तर क्षणभर विश्रांती !
मनासारखे जगणे आता, आनंदाची अनुभूती !
जीवनातला वसंत हा, अनुभवांचा प्राजक्त सडा,
सवे घेउनी प्रियजनांना, आठवणींचा भरा घडा !
'उशीर होतो', 'गाडी जाईल, 'डबा न मी नेणार',
या साऱ्याला बगल देऊनी रम्य विश्व फुलणार !
या वाटेवर साथ म्हणुनी, शब्दरुपी या भावना,
आरोग्य - धन अक्षय मिळो, मनापासुनी शुभकामना !

*आदरणीय श्री. देशमुख सर, आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा!!!*

आज साने गुरुजींची जयंती! जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!खरा तो एकची धर्म - साने गुरुजीखरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे...
24/12/2018

आज साने गुरुजींची जयंती!
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

खरा तो एकची धर्म - साने गुरुजी

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

20/10/2018

*माझं अंमळनेर*

सुमारे ३५/४० वर्षा पूर्वी साधारण ८० चे दशक.. माझ्या लहानपणीचं *अंमळनेर* त्यावेळी *अंमळनेर* फार मोठं नव्हतं वाडी चौक ते दगडी दरवाजा ते एसटी स्टँड,कचेरी ते स्टेशन त्यापुढे वस्ती कमी दिवसा ठीक आहे पण संध्याकाळ नंतर त्यापुढे कामा शिवाय यायला लोकं नको म्हणायचे मला आठवतंय माझ्या अगदी लहानपणी अंमळनेरला टांगे होते अंमळनेरला मी टांग्यात बसलो आहे स्टँड ते आमच्या घरा पर्यंत बहुतेक एक किंवा दीड रुपया घ्यायचे बस स्थानक अगदी मध्यवर्ती भागात होते त्यामुळे नेहेमीच वर्दळ असायची
रस्ते सुद्धा लहान होते फुटपाथ नव्हते दगडी दरवाजा समोर आठवडे बाजार भरायचा,भाजी मंडई भरायची विशेषतःसोमवारी तो भाग गर्दीने फुलून जात असायचा या ठिकाणी काही लोकांची मातीची तर काहींची पत्रेवजा घरं होती व त्या ठिकाणी मोठा आडवा बोर्ड होता त्यावर
अंमळनेरातील तीनही चित्रपट
गृहात लागलेल्या चित्रपटांची,वर मॅटीनी आणि खाली रेग्युलर अशी पोस्टर चिकटवलेली असायची बाजारात बाहेरून आलेली मंडळींची करमणूक म्हणजे चित्रपट व कधी तरी आलाच तर एखादा तमाशाचा फड केबलंच काय टीव्ही देखील नव्हते नंतर टीव्ही आले तेही B/W त्यामुळे पिक्चरना तुफान गर्दी अमिताभ बच्चनचे चित्रपट म्हणजे तर काही वेळा मारामारी व्हायची प्रामाणिक लोकं लाईननं तिकीट घ्यायला जायचे तर ब्लॅक करणारे पुढनंच घुसून तिकिटं घ्यायचे काही टॉकीजना तर प्रत्येकी दोनच तिकिटे मिळतील असा नियम केला होता न्यू लक्ष्मीत नाही मिळाले तर समोरच्याच अजंता टॉकीजला तर नक्कीच पण पिक्चर बघूनच घरी जात असू तंबोली टॉकीज त्यातल्या त्यात जरा पॉश होती,वैशाख महिन्यात यात्रेची मजा तर काही औरच आहे शब्दात व्यक्त करणे अशक्यच मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर सराफबाजार,वाडी चौक,मंदिर परिसर बोरीचं पात्र त्यात पावसाळ्यात मी व काही नेहमीची सराईत पोरं वरनं उड्या मारायची व पोहायची जाम मजा यायची माझी शाळा म्हणजे जी एस हायस्कूल संध्याकाळच्या वेळेस तिथनं प्रचंड संख्येने उडणारी वटवाघळं बघायचो संध्याकाळी हमखास फिरायला जायचो कोणीही भेटलं तरी सांगायचो गावात गेलो होतो अमका मित्र भेटला आमचा एक मित्र गमतीनं म्हणायचा,गावात काय,दोनच रस्ते,सराफ बाजार आणि कचेरीचा संध्याकाळी कोणालाही भेटायचं असलं तर फक्त वाडीपुढं जायचं,तो भेटणारच तिथं देवदर्शन,गप्पा टप्पा करायला संध्याकाळी माणसे थांबायचीच वाडी चौक,सुभाष चौक गजबजलेला असायचा एकजण मुलांना खेळ दाखवणारा यायचा त्याच्या भोवती मुलं गोळा व्हायची मग तो मुलांना त्याच्या जवळच्या नळकांड्यातनं बघायला सांगायचा“ गेट वे ऑफ इंडिया देखो,आग्रा का ताजमहाल देखो”,असं काय काय म्हणायचा. ३/४ मुलं गोल उभं रहायची प्रत्येकाच्या डोळ्याला ते नळकांडं मग तो विचारायचा ताज महाल दिसला का?, कुतुबमिनार दिसला का?मग मुलं जोरानं होsssss असं ओरडायची ब्रह्मे गल्ली,पाठक गल्लीतून रॉकेलवाले ‘पौss, पौss’, असा भोपू वाजवत रॉकेल विकायला येत तीन चाकी सायकलला मागं रॉकेलची टाकी असे कल्हईवाले ओरडत गल्लीत यायचे त्यांना पितळेची भांडी, पातेली वगैरे देऊन कल्हई करताना बघायला मुलं गर्दी करायची बोहारणी दारात यायच्या घरातील कपडे,साड्यांवर त्या त्यांच्या कडील डबे,भांडी द्यायच्या पण त्यांना नेहमी अजून एक साडी हवी असे. त्यांना कधी समाधानाने कपडे घेतलेले आणि त्यांच्या कडून हवी ती वस्तू मिळवलेली बाई मी पाहिली नाही एक ना अनेक गोष्टी अस्वलवाले यायचे,डोंबारी यायचे,पाठीवर आसूड ओढत कडकलक्ष्मी यायची अनेक प्रकारची माणसे पण माणसांच्यात ओढ होती गाव लहान असले तरी मन मोठे होते. माणसं शेजा-याच्या घरचं कार्य म्हणजे आपल्याच घरचं कार्य समजून मदतीला जायचे
गणपती बघायला लहान असताना आई घेऊन जायची तेव्हा एसटी स्टँड वरून जायचो तिथनं चालत मीलचा गणपती नंतर पांचपावली वरून माळीवाडा गणपती, करून परत वरच्या रोडनं वाडी चौक,काही गणपती व आरास बघून रात्री ११ ३०-१२.०० वाजायचे आता इथल्या इथे जायला बुडाखाली गाडी लागते त्या काळी गणेशोत्सवात नवरात्रात फुलवाले पहाटे यायचे अगदी पहाटे ५ च्या दरम्यान त्यांची “फुलेss घ्या फुलेss “अशी हाळी ऐकू यायची आणि मग झोपेतनं उठून डोळे चोळत त्या दिशेला जायचं आणि मग ७५/९० पैशाची फुलं छोट्या कुंड्यात,पातेल्यात घ्यायची
किती आठवणी आहेत. काळ बदलला सुधारणा होत गेल्या. दुभाजक येऊन रस्ता रुंद झाला, फुटपाथ आले बस स्थानक मोठे झाले टॉकीज पॉश झाल्यात असे अनेक बदल झाले अशा अनेक वास्तूंचा आठवणींचा काळा प्रमाणे बदल होत गेला बोट घालून नंबर फिरवायच्या फोनची जागा मोबाईलनं कधी घेतली कळलंच नाही सगळंच बदललं माणसं बदलली राहणीमान बदललं पुण्या मुंबईची माणसं त्या काळी म्हणत साने गुरुजींची कर्मभूमी,विप्रो आणि प्रताप मिल चे गाव म्हणायची आता बदल झाला आताही मंडळी पुण्या मुंबईकडं पळायला बघताहेत काही तिकडं रमतायत,काही परत गावची वाट धरतायत पण काहीही म्हणा माझ अंमळनेर निसर्ग संपन्न विविधतेने नटलेलं, किती किती म्हणून सांगू इथं माणसांच्यात अजूनही आपुलकी,जिव्हाळा,ओढ आहे थोडेसे काळा प्रमाणे झालेले बदल सोडले तर अजूनही माणुसकी टिकून आहे. म्हणूनच *माझ्या अंमळनेराबद्दल* मला सार्थ अभिमान आहे.

19/04/2018

प्रार्थना

19/04/2018

शाळेची प्रार्थना

19/04/2018

*माझं अमळनेर*
संत सखाराम महाराज यांचे पदस्पर्श ने पुनीत
सानें गुरुजीची कर्म भुमी
श्रीमंत प्रतापशेठ व हशीमजी यांची उद्योग भुमी
सुमारे ३५/४० वर्षा पूर्वी साधारण ८० चे दशक.. माझ्या लहानपणीचं *अंमळनेर* त्यावेळी *अंमळनेर* फार मोठं नव्हतं वाडी चौक ते दगडी दरवाजा ते एसटी स्टँड,कचेरी ते स्टेशन त्यापुढे वस्ती कमी दिवसा ठीक आहे पण संध्याकाळ नंतर त्यापुढे कामा शिवाय यायला लोकं नको म्हणायचे मला आठवतंय माझ्या अगदी लहानपणी अंमळनेरला टांगे होते अंमळनेरला मी टांग्यात बसलो आहे स्टँड ते आमच्या घरा पर्यंत बहुतेक एक किंवा दीड रुपया घ्यायचे बस स्थानक अगदी मध्यवर्ती भागात होते त्यामुळे नेहेमीच वर्दळ असायची
रस्ते सुद्धा लहान होते फुटपाथ नव्हते दगडी दरवाजा समोर आठवडे बाजार भरायचा,भाजी मंडई भरायची विशेषतःसोमवारी तो भाग गर्दीने फुलून जात असायचा या ठिकाणी काही लोकांची मातीची तर काहींची पत्रेवजा घरं होती व त्या ठिकाणी मोठा आडवा बोर्ड होता त्यावर
अंमळनेरातील तीनही चित्रपट
गृहात लागलेल्या चित्रपटांची,वर मॅटीनी आणि खाली रेग्युलर अशी पोस्टर चिकटवलेली असायची बाजारात बाहेरून आलेली मंडळींची करमणूक म्हणजे चित्रपट व कधी तरी आलाच तर एखादा तमाशाचा फड केबलंच काय टीव्ही देखील नव्हते नंतर टीव्ही आले तेही B/W त्यामुळे पिक्चरना तुफान गर्दी अमिताभ बच्चनचे चित्रपट म्हणजे तर काही वेळा मारामारी व्हायची प्रामाणिक लोकं लाईननं तिकीट घ्यायला जायचे तर ब्लॅक करणारे पुढनंच घुसून तिकिटं घ्यायचे काही टॉकीजना तर प्रत्येकी दोनच तिकिटे मिळतील असा नियम केला होता न्यू लक्ष्मीत नाही मिळाले तर समोरच्याच अजंता टॉकीजला तर नक्कीच पण पिक्चर बघूनच घरी जात असू तंबोली टॉकीज त्यातल्या त्यात जरा पॉश होती,वैशाख महिन्यात यात्रेची मजा तर काही औरच आहे शब्दात व्यक्त करणे अशक्यच मोठ्या दरवाजातून आत गेल्यावर सराफबाजार,वाडी चौक,मंदिर परिसर बोरीचं पात्र त्यात पावसाळ्यात मी व काही नेहमीची सराईत पोरं वरनं उड्या मारायची व पोहायची जाम मजा यायची माझी शाळा म्हणजे जी एस हायस्कूल संध्याकाळच्या वेळेस तिथनं प्रचंड संख्येने उडणारी वटवाघळं बघायचो संध्याकाळी हमखास फिरायला जायचो कोणीही भेटलं तरी सांगायचो गावात गेलो होतो अमका मित्र भेटला आमचा एक मित्र गमतीनं म्हणायचा,गावात काय,दोनच रस्ते,सराफ बाजार आणि कचेरीचा संध्याकाळी कोणालाही भेटायचं असलं तर फक्त वाडीपुढं जायचं,तो भेटणारच तिथं देवदर्शन,गप्पा टप्पा करायला संध्याकाळी माणसे थांबायचीच वाडी चौक,सुभाष चौक गजबजलेला असायचा एकजण मुलांना खेळ दाखवणारा यायचा त्याच्या भोवती मुलं गोळा व्हायची मग तो मुलांना त्याच्या जवळच्या नळकांड्यातनं बघायला सांगायचा“ गेट वे ऑफ इंडिया देखो,आग्रा का ताजमहाल देखो”,असं काय काय म्हणायचा. ३/४ मुलं गोल उभं रहायची प्रत्येकाच्या डोळ्याला ते नळकांडं मग तो विचारायचा ताज महाल दिसला का?, कुतुबमिनार दिसला का?मग मुलं जोरानं होsssss असं ओरडायची ब्रह्मे गल्ली,पाठक गल्लीतून रॉकेलवाले ‘पौss, पौss’, असा भोपू वाजवत रॉकेल विकायला येत तीन चाकी सायकलला मागं रॉकेलची टाकी असे कल्हईवाले ओरडत गल्लीत यायचे त्यांना पितळेची भांडी, पातेली वगैरे देऊन कल्हई करताना बघायला मुलं गर्दी करायची बोहारणी दारात यायच्या घरातील कपडे,साड्यांवर त्या त्यांच्या कडील डबे,भांडी द्यायच्या पण त्यांना नेहमी अजून एक साडी हवी असे. त्यांना कधी समाधानाने कपडे घेतलेले आणि त्यांच्या कडून हवी ती वस्तू मिळवलेली बाई मी पाहिली नाही एक ना अनेक गोष्टी अस्वलवाले यायचे,डोंबारी यायचे,पाठीवर आसूड ओढत कडकलक्ष्मी यायची अनेक प्रकारची माणसे पण माणसांच्यात ओढ होती गाव लहान असले तरी मन मोठे होते. माणसं शेजा-याच्या घरचं कार्य म्हणजे आपल्याच घरचं कार्य समजून मदतीला जायचे
गणपती बघायला लहान असताना आई घेऊन जायची तेव्हा एसटी स्टँड वरून जायचो तिथनं चालत मीलचा गणपती नंतर पांचपावली वरून माळीवाडा गणपती, करून परत वरच्या रोडनं वाडी चौक,काही गणपती व आरास बघून रात्री ११.३०ते१२.०० वाजायचे आता इथल्या इथे जायला बुडाखाली गाडी लागते त्या काळी गणेशोत्सवात नवरात्रात फुलवाले पहाटे यायचे अगदी पहाटे ५ च्या दरम्यान त्यांची “फुलेss घ्या फुलेss “अशी हाळी ऐकू यायची आणि मग झोपेतनं उठून डोळे चोळत त्या दिशेला जायचं आणि मग ७५/९० पैशाची फुलं छोट्या कुंड्यात,पातेल्यात घ्यायची
किती आठवणी आहेत. काळ बदलला सुधारणा होत गेल्या. दुभाजक येऊन रस्ता रुंद झाला, फुटपाथ आले बस स्थानक मोठे झाले टॉकीज पॉश झाल्यात असे अनेक बदल झाले अशा अनेक वास्तूंचा आठवणींचा काळा प्रमाणे बदल होत गेला बोट घालून नंबर फिरवायच्या फोनची जागा मोबाईलनं कधी घेतली कळलंच नाही सगळंच बदललं माणसं बदलली राहणीमान बदललं पुण्या मुंबईची माणसं त्या काळी म्हणत साने गुरुजींची कर्मभूमी,विप्रो आणि प्रताप मिल चे गाव म्हणायची आता बदल झाला आताही मंडळी पुण्या मुंबईकडं पळायला बघताहेत काही तिकडं रमतायत,काही परत गावची वाट धरतायत पण काहीही म्हणा माझ अंमळनेर निसर्ग संपन्न विविधतेने नटलेलं, किती किती म्हणून सांगू इथं माणसांच्यात अजूनही आपुलकी,जिव्हाळा,ओढ आहे थोडेसे काळा प्रमाणे झालेले बदल सोडले तर अजूनही माणुसकी टिकून आहे. म्हणूनच *माझ्या अंमळनेराबद्दल* मला सार्थ अभिमान आहे.
🌹🙏🌹🙏🌹

19/04/2018

*श्री संत सखाराम महाराज संस्थान*
-------------------------
*यात्रा उत्सव दि.१८ एप्रिल ते ३०एप्रिल २०१८*
--------------------------
सखाराम महाराज या नावाने एक प्रसिध्द साधू
होऊन गेले. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली आहे. वैशाख महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला एक क्षेत्र म्हणून त्यावेळी मिळालेली प्रसिध्दी आज कायम असुन ते खानदेशचे
प्रतिपंढरपुर समजले जाते.
महाराष्ट्रात थोर संतपरंपरेचा पाया रचणार्या संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सव म्हणजे सर्वधर्मसमभाव व एकतेचे प्रतीक आहे. यायात्रोत्सवात सर्व जातींचा समावेश असतो.गेल्या २५० वर्षांपासून अखंडपणे सार्जया होणार्या या यात्रोत्सवात एकतेचे दर्शन घडत असते.गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश यात्रोत्सवानिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांना दिला जातो.
यात्रोत्सवातील प्रत्येक सोहळा पार पाडणे ही एक
कसोटी असते. मात्र येथील सर्व जातीधर्माचे लोक
एकत्र येतात. वर्षानुवर्षे परंपरेप्रमाणे प्रत्येक समाजातील व्यक्ती आपापली जबाबदारी खांद्यावर घेतो. त्यामुळे हा यात्रोत्सव लिलया पार पाडला जातो, हे या यात्रोत्सवाचे वैशिष्ट्य आहे
" प्रतिपंढरपूर " च्या नदीपात्रातील समाधी मंदिरे
बोरी नदीपात्रात मूळ गादी पुरुष संत सखाराम महाराज, बाळकृष्ण महाराज व प्रल्हाद महाराज
यांच्या समाधींचे बांधकाम झालेले आहे. ही समाधी
दुरून एकसारखी दिसत असली तरी त्यांच्या बांधकामाची शैली वैविध्यपूर्ण आहे. मूळ गादी पुरुष संत सखाराम महाराजांनी वैशाख शुद्ध १४ म्हणजे१८१८ मध्ये समाधी घेतली. त्यांनी समाधी घेतल्यानंतर काही महिन्यांनी नदीपात्रात समाधीचे बांधकाम सुरू झाले. या समाधीचे बांधकाम दगड,चुनखडीत झाले. हे काम करण्यासाठी दहा वर्षे लागली. समाधीचे बांधकाम तुळजापुरी पद्धतीचे आहे. समाधी मंदिराच्या वर पूर्व दिशेला राम पंचायतन ,दक्षिणेला शिव पंचायतन, पश्चिमेला दत्त पंचायतन व उत्तरेला विष्णू पंचायतन आहे. समाधीच्या कमानीच्या दरवाजावर प्रल्हाद आणि नारद यांच्यामूर्ती आहेत. संत सखाराम महाराजांच्या समाधी शेजारीच बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे.
बाळकृष्ण महाराजांनी १८७६ मध्ये समाधी घेतल्यानंतर समाधीच्या बांधकामाला सुरुवात
झाली. या समाधीचे बांधकामही दगडचुनखडीत
आहे. समाधीची रचना कमळाकार व श्री यंत्राच्या
पद्धतीची आहे. संतसखाराम महाराज गादी
परंपरेतील प्रल्हाद महाराज हे चौथे गादी पुरुष.त्यांनी समाधी घेतल्यानंतर भक्तांतर्फे त्यांचीही समाधी नदीपात्रात बांधण्यात आली. या समाधीचे बांधकाम राजस्थानी पद्धतीचे आहे.दोन समाधी मंदिरे पंढरपुरात : संतसखाराम महाराज परंपरेतील गोविंद महाराज व तुकाराम महाराज यांची समाधी पंढरपूर येथील चंद्रभागानदीपात्रात बांधण्यात आलेली आहे. प्रत्येकावर
*जबाबदारी* - हा सोहळा पार पाडण्यासाठी शहरातील प्रत्येक समाजावर वेगवेगळी जबाबदारीसोपविण्यात आलेलीआहे.अक्षय्यतृतीयेला स्तंभ व ध्वजारोहण आणि सभामंडप उभारण्यासाठी लाकडी
खांबाची आवश्यकता असते. ते वाडीतून वाहूनआणून, बोरीच्या वाळवंटातील संत सखाराम
महाराजयांच्यासमाधीसमोर आणूनटाकण्याची
जबाबदारी महाजन-माळी समाजावर आहे.
हे साहित्य आणल्यावर मांडव उभारण्याचे काम
पाटील समाजाकडे आहे.
मांडव उभारल्यावर त्यावर
गोणपाट टाकण्याचे काम
लाडशाखीय वाणी समाजाकडे,
तरकनात लावण्याचे काम शिंपी समाजाकडे आहे.
रथ सजावट - रथ सजावटीचे काम धनगर बांधव,तसेच भालदार-चोपदार करीत असतात.
रथावर देवठेवण्याची जबाबदारी देव घराण्याकडे आहे. रथावर दक्षिणा घेण्याची जबाबदारी ब्राह्मण बंगाली समाजाकडे आहे,
तर देव पूजनाची जबाबदारी देवघराण्याकडे आहे.
बेलदार समाजाकडेही जबाबदारीरथाला पहिली मोगरी लावण्याचा
मान मुस्लीमसमाजाला दिला जातो.
त्यानंतर शहरातून मार्गस्थ
होत असलेल्या रथाला ठिकठिकाणी दिशा देण्याचे
काम धनगर समाज बांधव करीत असतात. वाटेतच
रथाला आक लागला, रस्त्यात रथाचे चाक अडकले तर ते घणाद्वारे यशस्वीपणे काढण्याची जबाबदारीबेलदार समाज पार पाडतो. रथोत्सवाचा मार्ग या वर्षी नविन पुलावरूनच रथ धावेल
मशालीद्वारे प्रकाशमान करण्याची जबाबदारी न्हावीबांधवांची असते. लहान रथाची सेवा भोई समाजाकडे आहे. अशा रीतीने सर्व जातीधर्माचा सहभागअसलेला हा सोहळा मोठय़ा हर्षोल्हासात पारपाडला जातो. प्रत्येक समाजाचा सहभाग असल्याने सर्वधर्मसमभाव, सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. महाराष्ट्रातील शेवटचायात्रोत्सवअमळनेरात साजरा होत असतो.
यात बारा बुलतेदारांचा सक्रियसहभाग असतो. या उत्सवाला २५० वर्षांची परंपरा आहे. हा उत्सव सर्वसमावेशक असल्याने दरवर्षीमोठय़ा उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. यंदा बोरी नदीच्या उत्सवाची पूर्वतयारी झालेली आहे. नदीपात्रात विविध पाळणे, खेळण्यांची दुकाने,खाद्यपदार्थांची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकानेथाटली जात आहेत. यात्रोत्सवाच्या काळात डोळ्यांचे शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. शहरातील सर्व डॉक्टरमोफत सेवा देतात. औषधीही मोफत देत असतात,पांडुरंग देवाच्या स्थापनेचा वर्धापन दिन आणि संतसखाराम महाराजांची पुण्यतिथी यांचा संयोग साधून वैशाख शुद्ध एकादशी ते पौर्णिमेदरम्यान सर्व
जातीधर्म समावेशक रथोत्सव व पालखी मिरवणूक काढली जाते. सर्व धर्म मिळून रथोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करतात. वाडीची रचना पंढरपुरासारखीच मूळ मंदिर १८१५ मध्ये बांधले..संत सखाराम महाराजांच्या वाडीची रचना ही पंढरपुरातील विठ्ठल-रूख्मिणीमंदिरासारखीचआहे. म्हणून हे प्रतिपंढरपूर म्हटले जाते. तर विठ्ठल मंदिरात पंचायतन असून, ते खान्देशात क्वचितच ठिकाणी पाहावयास मिळते. त्यामुळे वाडी
संस्थानातील विठ्ठल मंदिराला विशेष महत्त्व आहे.या ठिकाणी १८०६ मध्ये मूळ सखाराम महाराजांनीआपले गुरू लक्ष्मीकांत महाराज यांची समाधी बांधली आहे.
तर १८१५ मध्ये विठ्ठल-रूख्मिणीचे छोटे मंदिर बांधण्यात आले. ते आजही त्याच स्वरूपाच आहे.
मंदिरात पंचायतन :
या मंदिरात
पंचायतन आहे. विठ्ठलाच्या उजव्या हाताला राधिका माता, डाव्या हाताला रूख्मिणी माता आहे.
राधिका मातेच्या उजव्या बाजूला गरुड, रूख्मिणी मातेच्या बाजूला हनुमान आहे. खान्देशापासून पंढरपूर दूर आहे. पांडुरंगाने पंढरपूरचा आनंद वैशाखात खान्देशातील भाविकांना द्यावा म्हणून, संतसखाराम महाराजांनी पंचायतनची स्थापना केलेलीआहे.
वाडी संस्थानच्या बांधकामाचा लाकडी टप्पा हाआनंदराव देशमुख व रावबहादूर मालेगावकर यांनीकेलेआहे.
वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणीही १६ खांब
आहेत. हे खांब विष्णूच्या सेवकांचे प्रतीक मानले जातात. मंदिराच्या वरच्या बाजूस दशावतार कोरलेले असून, ते वासुदेव महाराजांच्या कार्यकाळातकोरण्यात आलेले आहेत.दोन्ही वाऱ्या र्होतात साजऱ्या :या संस्थानात शुद्ध एकादशी वारी व वैद्य एकादशी वारी साजरी केली जाते. दोन्ही वाऱ्या राज्यात देहूनंतर अमळनेरातच साजऱ्या केल्या जात असतात.
मलबार सागापासून बनवला अमळनेरचा रथ परंपरा :
रथाच्या मार्गात आतापर्यंत बदल नाही
संत सखाराम महाराजांच्या रथोत्सवाला शेकडो
वर्षांची परंपरा आहे. हा रथ अतिशय उंच असून, तो मलबार सागाच्या लाकडापासून बनविलेला आहे.
अमळनेरच्या रथोत्सवाला जवळपास दोनशे वर्षांची परंपरा आहे. वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष गोविंद महाराज यांनी १८१९ मध्ये रथोत्सवाची
परंपरा सुरू केली. त्यावेळी पहिला रथ तयारकरण्यात आला होता. त्यानंतर वाडी संस्थानचे दुसरे गादी पुरुष बाळकृष्ण महाराज यांनी नवीन रथ तयार केला. हा रथ मलबार सागाच्या लाकडापासून तयार केलेला आहे. दोन चाकांच्या मधील आख अंजनाच्या
लाकडापासून बनविलेले आहे. हा रथ बाळकृष्ण महाराजांनी तयार केलेला असल्याने, त्यावर बाळकृष्ण महाराज, गुरुकृष्ण असे लिहिलेले आहे.
रथावर श्री गणेश, मारुती आदी देवतांच्या मूर्ती आहेत. हा रथ अतिशय उंच असला तरी त्याची नेमकी उंची कोणीही मोजलेली नाही. रथ निघण्याच्या काही दिवस अगोदरच रथाची दुरुस्ती केली जाते. हे काम दरवर्षी होत असते.
रथाला नाड्याने ओढण्याची परंपरा : या रथाला पूर्वीपासूनच नाड्याने ओढण्याची परंपरा आहे.
सर्व जातीधर्माचे लोक या उत्सवात सहभागी होत असतात.
सायंकाळी निघतो रथ : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचे रथ निघत असतात.
मात्र बहुतांश रथ हे सकाळीच निघत असतात.
परंतुअमळनेरातील रथ हा सायंकाळी मुहूर्त बघूनच काढण्यात येत असतो. प्रथम रथ पश्चिम दिशेला वळविला जातो. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे हा
रथ जात असतो. रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती स्थापन केली जाते. या रथाला पहिली मोगरी लावण्याचा मान हा मुस्लीम समाजाकडे परंपरेने आहे. मार्गात बदल नाही : रथोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र त्याच्या मार्गात एकदाही बदल झालेला नाही.
वाडी संस्थानातून निघणारा रथ सराफ बाजार,दगडी दरवाजा, फरशीपूल पैलाडमार्गे वाडीत येतो.
पूर्वी पहाटे अडीच-तीन वाजताच रथ वाडीत यायचा. मात्र आता आरत्या वाढल्याने, रथ संस्थानात
पोहचण्यास सकाळ उजाडत असते.
गुरू-शिष्याची परंपरा आजही कायम
बेलापूरकर महाराज : गुरूकडून होते स्वागत पांडुरंगाचे नामस्मरण करून, संपूर्ण राज्यभर वारकरी संप्रदायाची पताका फडकविण्याचे कार्य
ज्या पद्धतीने गुरुवर्य संत सखाराम महाराज व त्यांच्यानंतर गादीवर बसलेल्या संत परुषांद्वारे सुरूआहे, त्याच पद्धतीने त्यांचे शिष्य बेलापूरकर
महाराज व त्यांच्या गादीवरील पुरुषांद्वारे ही परंपराअखंडपणे सुरू आहे. ही गुरू-शिष्याची आदर्श परंपरा आजही कायम आहे. त्यात कोणताही बदल
आतापर्यंत झालेला नाही. वैशाख वारीसाठी दरवर्षी बेलापूरकर महाराजांचे अमळनेर येथे दशमीला
आगमन होत असते. त्यांचे आगमन म्हणजे पंढरीचा
पांडुरंग शहरात दाखल झाला, अशी भाविकांची श्रद्धा असते. त्यामुळे बेलापूरकर महाराजांच्या दिंडीलाअनन्यसाधारण महत्त्व आहे.बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरुष मोहन महाराज यांचे नवमीच्या दिवशीच शहरातआगमन होत असते. दुसर्या दिवशी वाडी संस्थानचे गादी पुरुष प्रसाद महाराज शहराच्या वेशीवर जाऊन बेलापूरकर महाराजांचे स्वागत करतात. वारकरी संप्रदायातील ही श्रेष्ठ परंपरा समजली जाते.
यात्रोत्सवाच्या काळात बोरी नदीच्या वाळवंटातील संत सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर ते दररोज टाळ-मृदुंगाच्या गजरात सकाळी नऊ तेदुपारी १२ वाजेपर्यंत पहारा (कीर्तन-भजने) देतात.संत सखाराम महाराजांप्रमाणेच शाहू महाराज हे
पांडुरंगाचे निस्सीम भक्त. वर्षभरातील३६५दिवसां
पैकी दर महिन्याला ते पांडुरंगाची शुद्धवारीकरीत असतात. ते नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथीलमूळ रहिवासी.
त्यामुळेच ते बेलापूरकर महाराज म्हणून प्रसिद्ध आहे. संत सखाराम महाराज हे त्यांचे गुरू.
त्यामुळे त्यांनी पंढरपूर येथे त्यांच्याकडून अनुग्रह घेतला. आजही ही गुरू-शिष्याची आगळीवेगळी
परंपरा अखंडपणे सुरू आहे. या परंपरेत गुरूकडून शिष्याला मान-सन्मान दिला जातो.बेलापूरकर महाराजांना मान लालजी महाराजांचा रथोत्सव, पालखी मिरवणुकीच्या पुढे दिंडीकाढण्याचा मान बेलापूरकर महाराजांना दिला जातो.पौर्णिमेला गुलालाचा पहिला मानही दिला जातो.काल्याचे कीर्तनही बेलापूरकर महाराजांचेच होते.
यात्रोत्सवाची सांगता होते. त्यानंतरबेलापूरकरमहाराजांची दिंडी रवाना होत असते. बेलापुरकर महाराजांचे आगमन व त्यानंतरयात्रेस सुरवात होते.जय हरी रामकृष्ण हरी
शब्दाकन-
पं. दिनेश उपासनी गुरूजी
साईं उपासनी ज्योतिष एवं धार्मिक विधि केंद्र नेरुळ नवी मुंबई

या वर्षी १८रोजी आक्षय तृतीये पासून यात्रेस
प्रारंभ सकाळी ९वाजेस होईल १८ ते २५ दरम्यान तुकाराम गाथा भजन कार्यक्रम
दि २५रोजी सकाळी सांगता सायं ७.३०
वाजता मोहन महाराज बेलापूरकर यांच्या दिंडीचे
आगमन
दि.२६ रोजी एकादशिरोजी
सायंकाळी *रथयात्रा*
दि.२९ रोजी सखाराम
महाराज पुण्यतीथी कार्यक्रम
दि. ३०रोजी पालखी
माहीती संकलन-
*श्री.गिरीष वाणी,सर*
*पारोळा*

03/10/2015

आनंदाची बातमी
नुकतेच शाळेकडुन आलेल्या दुरध्वनी संदेशानुसार दि २४ ते २६ ऑक्टोंबर २०१५ या कालावधीत शाळेने रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त सर्व आजी माजी विदयार्थ्यांचे स्नेहसंमेलन आयोजित केलेले आहे.
प्रस्तुत कार्यक्रमात सर्व आजी व माजी विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शाळा प्रशासनाने केलेले आहे.
तरी सर्वांनी अवश्य कार्यक्रमांस यावे व आपल्या सहभागाबाबत दुरध्वनी क्रं 02587224972 वर शाळेस कळवावे, जेणेकरुन शाळेला पुढील नियोजन करणे सोयीचे होईल.

14/04/2015
14/04/2015

साने गुरुजी नुतन माध्‍यमिक विदयालय व साने गुरुजी कन्‍या माध्‍यमिक विदयालय अमळनेर जि. जळगाव हे रौप्‍य महोत्‍सवी वर्षात दि 18 जुन 2015 रोजी प्रवेश करीत आहे. आपली शाळेची स्‍थापना होवुन 25 वर्षे पुर्ण होत आहेत व या शाळेतुन शिक्षण घेवुन समाजात पडलेल्‍या विद्यार्थ्‍यांची विविध क्षेत्रातील प्रगती व उन्‍नती पाहुन शाळेत प्रवेश करणा-या विदयार्थ्‍यांची संख्‍याही वाढत आहे. शाळेत शिकलेले विदयार्थी हे समाजाच्‍या वेगवेगळया स्‍तरात काम करीत आहेत वेगवेगळया ठिकाणी काम करीत आहेत त्‍यांची अनुभवाची शिदोरीतही बरेच काही साठले असेल, याच दृष्‍टीकोनातुन नेमके रौप्‍य महोत्‍सवी वर्ष कसे साजरे करायचे याचा विचार विनिमय करणेकरीता दि 13 एप्रिल 2015 रोजी सर्व विदयार्थ्‍यांची सभा संपन्‍न झाली. त्‍यात बरेच मुद्ये ही समोर आले व त्‍यानुसार वर्षभरात 04 मोठे कार्यक्रम व इतर बरेच लहान लहान कार्यक्रम करण्‍याचे ठरले जसे की, पर्यावरण संतुलनाबाबत कार्य करणे, महिला सक्षमीकरण, सांस्‍कृतिक कार्यक्रम, खेळांच्‍या स्‍पर्धा चित्रांचे प्रदर्शन इ. व अनेक गोष्‍टी करण्‍याचे ठरवले. या सर्वांत शाळेच्‍या सर्वच माजी विदयार्थ्‍यांनी सहभाग घ्‍यावा, त्‍यांच्‍या क्षेत्रातील काही नवीन कल्‍पना घेवुन मांडाव्‍यात असे ठरले,सर्वांनी त्‍यांच्‍या सोईनुसार कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहण्‍याचे आवाहनही करण्‍यात आले.
तरी आपण सर्व विदयार्थ्‍यांनी या उपक्रमात सहभाग घ्‍यावा, ही विनंती.

Address

Dhule Road Amalner
Amalner
425401

Telephone

02587224972

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sane Guruji School Amalner Silver Jubilee Year posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category