PNP PPES ACS College

PNP PPES ACS College To Offer Wide Range Of Academic Programmes With Latest Trends Relevant To National Development...

15/08/2026
पी.एन.पी महाविद्यालयाकडून तिरंगा रॅलीचे आयोजन      अलिबाग. प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान ...
14/08/2026

पी.एन.पी महाविद्यालयाकडून तिरंगा रॅलीचे आयोजन

अलिबाग.
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आज शुक्रवार दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वप्रथम इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगितला,
त्यानंतर विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
"भारत माता की जय", "वंदे मातरम" अशा देशभक्तीपर घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा केला.

या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते.
सदर तिरंगा रॅलीमध्ये महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Financial literacy awareness program Prabhakar Patil Education Society's Arts, Commerce and Science College Veshvi- alib...
13/08/2026

Financial literacy awareness program

Prabhakar Patil Education Society's Arts, Commerce and Science College Veshvi- alibag, Department of commerce and sequrity and exchange board of India jointly organized the online seminar on Financial literacy through financial Wellness enhancement on 13/8/26 on zoom meeting. the programme is started at 9:30 a.m. to 10.30 am.The resource person miss guary geet talks on savings investment awareness. She explained about SEBI, primary v/s Secondary market, Trading and DMat account, due diligence, public issues rights of a shareholders, modes of placing order and contact note so on. There are 66 participants are participated in this webinar. prof. Pratiksha kage coordinator Express votes of thanks.commerce head Dr.Rasika Mhatre and prof.swarali thakur attend this session.

पी. एन. पी. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजराप्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महावि...
12/08/2026

पी. एन. पी. महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया मध्ये ग्रंथालय विभागातर्फे आज दिनांक 12/08/2016 रोजी डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती "राष्ट्रीय ग्रंथपाल दिन" म्हणून साजरा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे सर उपस्थित होते त्यांनी याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन दिले तसेच प्रा. संजना पाटील यांनी विद्यार्थ्यांशी बोध पर संवाद साधला. तसेच वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे मॅडम, विज्ञान विभाग प्रमुख पूजा म्हात्रे मॅडम या कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून "वाचाल तर वाचाल" या विषयावर निबंध स्पर्धा ग्रंथालयात आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रंथालय विभाग प्रमुख सौ. कांचन म्हात्रे मॅडम यांनी केले.

पी. पी. ई. एस. कला , वाणिज्य और विज्ञान महाविद्यालय वेश्वी-अलिबाग में मुंशी प्रेमचंद जयंती पर फिल्म प्रस्तुतिकरण का आयोज...
11/08/2026

पी. पी. ई. एस. कला , वाणिज्य और विज्ञान महाविद्यालय वेश्वी-अलिबाग में मुंशी प्रेमचंद जयंती पर फिल्म प्रस्तुतिकरण का आयोजन ।

प्रभाकर पाटिल शिक्षण संस्था के कला, वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय के हिंदी विभाग द्वारा 31 जुलाई प्रेमचंद जयंती के अवसर पर आज सोमवार 10 अगस्त, 2026 को मुंशी प्रेमचंद को नमन करते हुए उनके साहित्य पर चर्चा साथ ही उनकी कहानियों का अवलोकन किय गया।
कार्यक्रम के आरंभ में महाविद्यालय के हिंदी विभाग के प्रा.हर्षल काठे ने मुंशी प्रेमचंद को नमन करते हुए शब्द सुमनों के द्वारा विन्रम आदरांजलि अर्पित की ।
हिंदी विभाग प्रमुख डॉ. अमृता कुमारी ने कार्यक्रम में उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ. ओमकार पोटे सर का स्वागत पुष्प देकर किया साथ ही वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे , भूगोल विभाग प्रमुख प्रा. नितिन कराले और भूगोल विभाग प्रा. संजना पाटिल का स्वागत भी पुष्प के साथ किया ।
इसके बाद हिंदी विभाग प्रमुख डॉ. अमृता कुमारी मैडम ने कार्यक्रम की प्रस्तावना सबके सामने प्रस्तुत की। उन्होंने दोनों ही कहानियों के मूल में निहित मानवीय संवेदनाओं पर चर्चा की ।
तत्पश्चात विद्यार्थियों को मुंशी प्रेमचंद की चर्चित कहानी कफ़न और बूढी काकी प्रोजेक्टर के माध्यम से दिखाया गया । विद्यार्थियों ने बहुत ही शांतिपूर्वक ढंग से दोनों ही कहानियों को देखा और समझा ।
हिंदी विभाग प्रमुख डॉ. अमृता कुमारी ने कहानी के फिल्म प्रस्तुतिकरण के बाद विद्यार्थोयों से कहानी के उद्देश्य पर चर्चा की ।
अपने अध्यक्षीय भाषण में महाविद्यालय के प्राचार्य डॉ. ओमकार पोटे सर ने मुंशी प्रेमचंद के साहित्य को मानवीय संवेदना से जोड़ते हुए विद्यार्थियों को सामाजिक यथार्थ की बात बताई ।
कार्यक्रम का सूत्रसंचालन तथा आभार ज्ञापन हिंदी विभाग के प्रा.हर्षल काठे ने किया |

गुरुपौर्णिमा 2026-27
30/07/2026

गुरुपौर्णिमा 2026-27

पी. एन. पी. महाविद्यालयात वाणिज्य विभाग अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्नप्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाण...
27/07/2026

पी. एन. पी. महाविद्यालयात वाणिज्य विभाग अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वेश्वी–अलिबाग येथे दिनांक 27 जुलै 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता वाणिज्य विभागामार्फत वाणिज्य विभाग अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकल्प समन्वयक सौ. प्रीती सावंत आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अशोक शिंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य विभाग अभ्यास मंडळाच्या फलकाचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान तृतीय वर्ष बी.कॉम.च्या विद्यार्थिनी रिया बजरंग मुळीक, दर्शना सुनील वाडकर, हिमानी राजेश भगत आणि हितिका हरेश पाटील यांनी वाणिज्य विषयाशी संबंधित विविध संकल्पनांवर आकर्षक व माहितीपूर्ण चार्ट सादर करून त्यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थिनींच्या अभ्यासपूर्ण मांडणीचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

प्रमुख पाहुणे सौ. प्रीती सावंत आणि श्री. अशोक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाणिज्य शिक्षणाचे बदलते स्वरूप, पर्यावरणपूरक विकास, शाश्वत उपक्रम तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्यविकास, उद्योजकता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा समतोल साधण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानवृद्धी, संशोधनवृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करत वाणिज्य विभाग अभ्यास मंडळाच्या भावी उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सदर कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. नितीन कराळे आणि प्रा. स्वराली ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, वाणिज्य विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

Address

Near Gokuleshwar Temple, Veshvi
Alibag
402209

Alerts

Be the first to know and let us send you an email when PNP PPES ACS College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to PNP PPES ACS College:

Shortcuts

Share