PNP Education Society

Directions Website Contact the school

PNP Education Society PNP Education Society

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान क्रांतीकार, कुळ कायद्याचे प्रणेते आणि शेकापचे ज्...
29/08/2026

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे महान क्रांतीकार, कुळ कायद्याचे प्रणेते आणि शेकापचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाई नारायण नागू पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. !
​त्यांनी दाखवलेल्या संघर्षाच्या आणि विचारांच्या वाटेवर चालत कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरूच राहील.

 #पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुलात उत्साहात  #स्वातंत्र्य  #दिन  #साजराभारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धाप...
17/08/2026

#पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या वेश्वी संकुलात उत्साहात #स्वातंत्र्य #दिन #साजरा
भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात ध्वजारोहण समारंभ पार पडला. यानिमित्त पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या ग्रामीण भागातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या संकुलातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पीएनपी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रशासन अधिकारी गबाजी गीते, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर, पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्राचार्य रविंद्र पाटील, बी.एड. कॉलेजच्या प्रा. रुतिषा पाटील, महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, क्रीडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे, अक्षय डाकी यांच्यासह इतर मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्याविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण पीएनपी संकुलात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

पीएनपीच्या स्वरा पाटीलची अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय भरारी!अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेत उच्च शिक्षणाची ...
14/08/2026

पीएनपीच्या स्वरा पाटीलची अवकाश क्षेत्रातील उल्लेखनीय भरारी!
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेत उच्च शिक्षणाची संधी

पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी स्वरा अविनाश पाटील हिची भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIST), तिरुवनंतपुरम येथे बी.टेक. इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग – एव्हिऑनिक्स ( विमान व अंतराळ तंत्रज्ञानातील इलेक्ट्रॉनिक्स ) या पुढील शिक्षणाकरिता निवड झाली आहे.

अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील नामांकित संस्थांपैकी एक असलेल्या IIST मध्ये उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने स्वराने आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची यशस्वी छाप उमटवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतही या यशाची अभिमानास्पद नोंद झाली आहे.

अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अलिबागची स्वरा आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणार असून, भविष्यात देशाच्या अवकाश संशोधन क्षेत्रात योगदान देण्याची तिची वाटचाल सुरू झाली आहे.

स्वराच्या या उज्ज्वल यशाबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, संचालक विक्रांत वार्डे, उपप्राचार्य निशिकांत कोळसे तसेच प्राध्यापक व कर्मचारीवृंदाने तिचे अभिनंदन केले. तसेच तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि अवकाश क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

स्वराच्या या यशाने पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्तेला नवी उंची मिळाली असून, तिची ही भरारी रायगडच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.

... तुमचे विचार अन तुमची जीवनमूल्ये यामुळेच तुम्ही आदर्श व्यक्तिमत्व आहात सर्वांसाठी... !पीएनपी संस्थेचे अध्यक्ष मा. आमद...
07/07/2026

... तुमचे विचार अन तुमची जीवनमूल्ये यामुळेच तुम्ही आदर्श व्यक्तिमत्व आहात सर्वांसाठी... !
पीएनपी संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार भाई जयंत पाटील आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

27/06/2026

#पीएनपीत #आंतरराष्ट्रीय #योग #दिन #साजरा

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी वेश्वी संकुल अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारत स्वाभिमान ट्रस्ट रायगड व पतंजली योग समिती अलिबाग यांच्या वतीने दिलीप रामभाऊ गाटे भारत स्वाभिमान न्यास सह कोषाध्यक्ष महाराष्ट्र पश्चिम, दिपक दिलीप गाटे युवा भारत प्रभारी जिल्हा रायगड, ज्ञानेश्वर पाटील कोषाध्यक्ष भारत स्वाभिमान न्यास जिल्हा रायगड तसेच कांचन ज्ञानेश्वर पाटील सहयोग शिक्षीका यांनी योग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सादरीकरण केले व त्याचे महत्व पटवून दिले.

यावेळी कार्यक्रमास पी. एन. पी. कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे होली चाईल्ड सी.बी.एस.ई. स्कुलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवलेआदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील यांनी केले.

 #पीएनपीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजराप्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी वेश्वी संकुल अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ...
27/06/2026

#पीएनपीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी वेश्वी संकुल अलिबाग येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारत स्वाभिमान ट्रस्ट रायगड व पतंजली योग समिती अलिबाग यांच्या वतीने दिलीप रामभाऊ गाटे भारत स्वाभिमान न्यास सह कोषाध्यक्ष महाराष्ट्र पश्चिम, दिपक दिलीप गाटे युवा भारत प्रभारी जिल्हा रायगड, ज्ञानेश्वर पाटील कोषाध्यक्ष भारत स्वाभिमान न्यास जिल्हा रायगड तसेच कांचन ज्ञानेश्वर पाटील सहयोग शिक्षीका यांनी योग प्रशिक्षण व प्रात्यक्षिक सादरीकरण केले व त्याचे महत्व पटवून दिले.

यावेळी कार्यक्रमास पी. एन. पी. कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, प्रशासकीय सल्लागार गबाजी गीते, वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य रवींद्र पाटील, उपप्राचार्य प्रा. निशिकांत कोळसे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे होली चाईल्ड सी.बी.एस.ई. स्कुलच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, होली चाईल्ड स्टेट बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवलेआदी मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील यांनी केले.

पीएनपी संस्थेत श्रीराज मोहिते ९७.४0 % गुण मिळवून प्रथमपीएनपी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा निकाल १०० %जिल्हयातील सर्व पीएन...
27/06/2026

पीएनपी संस्थेत श्रीराज मोहिते ९७.४0 % गुण मिळवून प्रथम

पीएनपी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा निकाल १०० %

जिल्हयातील सर्व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीमध्ये होली चाईल्ड स्टेट बोर्ड स्कूल वेश्‍वीचा विद्यार्थी श्रीराज मोहिते ९७.४0 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम, माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडा मराठी माध्यम शाळेचा विद्यार्थी मयूर भानूदास खरात ९४ टक्के गुण मिळवून संस्थेत द्वितीय तर निधय सुरेश गोंधळी ९३ टक्के गुण मिळवून संस्थेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.

दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या कठोर परिश्रम, जिद्द आ...
08/05/2026

दहावी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन!

तुमच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीमुळे मिळवलेले हे यश निश्चितच अभिमानास्पद आहे. आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असून, यापुढेही तुम्ही असेच यश संपादन करत राहा, हीच शुभेच्छा.

तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार , रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , प्रसिद्ध उद्योगपती , श्रीबाग सहक...
08/05/2026

पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार , रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक , प्रसिद्ध उद्योगपती , श्रीबाग सहकारी संस्थेचे चेअरमन मा. आदरणीय श्री. नृपाल पाटील सर यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा !
आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

 #पीएनपी  #कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा  निकाल  #१०० टक्के  #अस्मी  #पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून...
02/05/2026

#पीएनपी #कॉलेज आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्सचा निकाल #१०० टक्के
#अस्मी #पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून संस्थेत #प्रथम

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व कॉम्प्युटर सायन्स वेश्वी गोंधळपाडा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून संस्थेमधून कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थिनी अस्मी हर्षल पटेल ८९.५० टक्के गुण मिळवून प्रथम, स्वरा अविनाश पाटील ८७.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सम्यक विनोद काळे ८६.१७ टक्के गुण मिळवून संस्थेत तृतीय आलेला आहे.
आर्ट्स विभागाचा निकाल १०० टक्के, कॉमर्स विभागाचा निकाल १०० टक्के, सायन्स विभागाचा निकाल १०० टक्के, तर कॉम्प्युटर सायन्स विभागाचा निकाल सुद्धा १०० टक्के लागला आणि कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य, प्राध्यापक सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन...

Address

Alibag Pen Road
Alibag
402209

Alerts

Be the first to know and let us send you an email when PNP Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to PNP Education Society:

Shortcuts

Share