Raigad Talent Search - RTS

Raigad Talent Search - RTS We are searching for Talent in Raigad district.

दिनांक  #३१ऑगस्ट२०२४ रोजी झालेल्या इयत्ता चौथीच्या प्रथम    #रायगड_प्रज्ञा_शोध परिक्षेची  #जिल्हा_गुणवत्ता_यादी आज  #अनं...
16/09/2024

दिनांक #३१ऑगस्ट२०२४ रोजी झालेल्या इयत्ता चौथीच्या प्रथम #रायगड_प्रज्ञा_शोध परिक्षेची #जिल्हा_गुणवत्ता_यादी आज #अनंतचतुर्दशी या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात येत आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!

https://youtu.be/ZRVNsX2oad0?si=n41NsRp8OOALAtNH

जिल्हा गुणवत्ता यादी | रायगड प्रज्ञा शोध परीक्षा | District Merit List | Raigad Talent Search (RTS)




#रायगड_टॅलेंट_सर्च
#रायगड_प्रज्ञा_शोध_परीक्षा


#जिल्हा_गुणवत्ता_यादी


#३१ऑगस्ट२०२४

जिल्हा गुणवत्ता यादी | रायगड प्रज्ञा शोध परीक्षा | District Merit List | Raigad Talent Search (RTS)दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या इयत्ता चौथ...

दिनांक  #०३ऑगस्ट२०२४ रोजी झालेल्या इयत्ता चौथीच्या प्रथम    #रायगड_प्रज्ञा_शोध परिक्षेची  #जिल्हा_गुणवत्ता_यादी आज  #स्व...
15/08/2024

दिनांक #०३ऑगस्ट२०२४ रोजी झालेल्या इयत्ता चौथीच्या प्रथम #रायगड_प्रज्ञा_शोध परिक्षेची #जिल्हा_गुणवत्ता_यादी आज #स्वातंत्र्य_दिन या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात येत आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !!!

https://youtu.be/9uQ1jrl1lII

जिल्हा गुणवत्ता यादी | रायगड प्रज्ञा शोध परीक्षा | District Merit List | Raigad Talent Search (RTS)




#रायगड_टॅलेंट_सर्च
#रायगड_प्रज्ञा_शोध_परीक्षा


#जिल्हा_गुणवत्ता_यादी


#३ऑगस्ट२०२४

जिल्हा गुणवत्ता यादी | रायगड प्रज्ञा शोध परीक्षा | District Merit List | Raigad Talent Search (RTS)दिनांक ०३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या इयत्ता चौथ...

Raigad Talent Search - RTS Workshop News from District Raigad          #रायगडटाइम्स
06/07/2024

Raigad Talent Search - RTS Workshop News from District Raigad





#रायगडटाइम्स

Raigad Talent Search - RTS  कार्यशाळा उरण शहर Date - 06/07/2024           रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याची इयत्ता चौथी R...
06/07/2024

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा उरण शहर
Date - 06/07/2024

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक 06/07/2024 रोजी रा. जि. प. शाळा कोप्रोली येथे संपन्न झाली. सदर कार्यक्रमामध्ये श्री उमेश पाटील सर (शाळा - खोपटे) यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले तसेच कोप्राली केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बबन पाटील सर व चिर्ले केंद्राचे केंद्रप्रमुख मोकाशी सर यांनी RTS. चे प्रमुख मार्गदर्शक श्री रत्नाकर पटिल सर यांचे स्वागत करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर सौ. बगाटे मॅडम व सौ. रुपाली मॅडम यानी RTS कार्यपद्‌धती विषयी माहीती सांगितली त्यानंतर श्री. रत्नाकर पाटील सर यांनी RTS विषयी व शिष्यवृत्ती विषयी सखोल मार्गदर्शन केले. सदर शिबिरास तालुक्यातील सुमारे 40 शिक्षक, 186 विद्यार्थी व 90 पालक उपस्थित होते. शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.

याचे श्रेय माननीय शिक्षणाधिकारी गुरव मॅडम व उरण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांना जाते.

Raigad Talent Search - RTS आणि शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळा पोलादपूर येथे संपन्न संपूर्ण बातमी खालील लिंक वर पहावयास मि...
06/07/2024

Raigad Talent Search - RTS आणि शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळा पोलादपूर येथे संपन्न

संपूर्ण बातमी खालील लिंक वर पहावयास मिळेल
👇👇👇👇
https://youtu.be/8RrSPScc_yE?si=owg7BCrZVbA6Ii1q



Watch our previous videos : https://youtube.com/c/LantraniNewsLivehttps://youtube.com/ contacting us :Phone number : +91 9324406948 (Mush...

Raigad Talent Search - RTS  कार्यशाळा Poladpur Date - 05/07/2024           रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याची इयत्ता ...
06/07/2024

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा Poladpur
Date - 05/07/2024

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक 05/07/2024 रोजी रा जि प शाळा पोलादपूर नं 1 येथे संपन्न झाली. सदर कार्यक्रमामध्ये पितळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. आवरादी सर यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले. त्यानंतर RTS संस्थापक आणि प्रमुख मार्गदर्शक श्री.रत्नाकर तुकाराम पाटील सर यांचे स्वागत करण्यात आला.
त्यानंतर श्री.आवरादी सर यांनी RTS संकल्पना, कार्यपध्दती याविषयी सखोल व सविस्तर माहिती दिली.यानंतर श्री पाटील सर यांनी इ 4थी RTS व 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
सदर शिबिरास तालुक्यातील गटविकास अधिकारी सन्मा श्रीम दीप्ती गाट मॅडम सो. वरिष्ठ विस्तार अधिकारी श्री सुभाष साळुंके साहेब,50 शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण यामुळे उपस्थिती थोडी कमी होती. तरी देखील उपस्थित पालक, शिक्षकवर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याने कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. शेवटी पोलादपूर केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा श्री. शिवाजी महाडिक सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप झाला.
याचे श्रेय माननीय शिक्षणाधिकारी गुरव मॅडम व पोलादपूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांना जाते.

Raigad Talent Search - RTS  कार्यशाळा Mangaon -raigad Date - 04/07/2024        रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याची इयत्त...
05/07/2024

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा Mangaon -raigad
Date - 04/07/2024

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक 04/07/2024 रोजी खांदाड शाळा येथे संपन्न झाली. सदर कार्यक्रमामध्ये श्री.मुकेश भोस्तेकर सर यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले .त्यानंतर RTS माणगाव टीम तर्फे RTS संस्थापक आणि प्रमुख मार्गदर्शक श्री.रत्नाकर तुकाराम पाटील सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
त्यानंतर श्री. भोस्तेकर सर यांनी RTS संकल्पना, कार्यपध्दती याविषयी सखोल व सविस्तर माहिती दिली. यानंतर पाटील सर यांनी इ 4 थी RTS व 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
सदर शिबिरास तालुक्यातील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तरी देखील उपस्थित पालक, शिक्षक वर्गाने चांगला प्रतिसाद दिल्याने कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. शेवटी श्री. वैभव सूर्यवंशी सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यशाळेचा समारोप झाला.
याचे श्रेय माननीय शिक्षणाधिकारी गुरव मॅडम व माणगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांना जाते.

Raigad Talent Search - RTS  कार्यशाळा @तळा Date - 04/07/2024        रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इ...
04/07/2024

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा @तळा
Date - 04/07/2024

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक 04/07/2024 रोजी तळे मराठी शाळा येथे संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मित्तल वावेकर मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून त्यानंतर RTS तळा टीम तर्फे प्रमुख मार्गदर्शक श्री रत्नाकर तुकाराम पाटील सर यांचे सत्कार करण्यात आला. तसेच श्री सुनील गोविंद बैकर यांचा तळा मराठी शाळेतील 13 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र त्यापैकी 9 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
त्यानंतर श्री सुनील गोविंद बैकर सर यांनी RTS संकल्पना,कार्यपध्दती याविषयी सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री प्रमोद मोरे यांनी RTS विषयी परीक्षा पद्धती, नियोजन व स्वरूप याविषयी माहिती दिली. यानंतर पाटील सर यांनी इ 4 थी व 5 वी च्या विद्यार्थ्यांचे पूर्व चाचणी घेतली व त्याबाबत मार्गदर्शन तसेच काही क्लृप्त्या स्पष्ट केल्या.
या शिबिरास RTSचे संस्थापक श्री रत्नाकर तुकाराम पाटील सर यांच्या व जिल्हाप्रमुख श्री अमिष भौड, जिल्हा प्रतिनिधी श्रीमती मितल वावेकर व तळा RTS ग्रूप तसेच शिक्षण विस्तार अधिकारी श्री ठाकूर सर, तळा तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रायगड जिल्हाध्यक्ष श्री विजय येलवे सर, तळा तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी, त्याचबरोबर विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
याचे श्रेय माननीय शिक्षणाधिकारी गुरव मॅडम व तळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मॅडम यांना जाते.

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा Shrivardhan - श्रीवर्धन  Date - 03/07/2024        रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक...
03/07/2024

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा Shrivardhan - श्रीवर्धन Date - 03/07/2024

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक 03/07/2024 रोजी गोखले कॉलेज श्रीवर्धन येथील प्रशस्त सभागृहात संपन्न झाली. कार्यशाळेला श्री. जोशी सर प्राचार्य गोखले कॉलेज श्रीवर्धन, श्री. धर्मा धामणकर - विस्तार अधिकारी, सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख, 30 शिक्षक - शिक्षीका, 67 पालक व 229 विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी व पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. श्री. रत्नाकर पाटील सर यांनी सखोल मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन श्री. भिकू पांगारकर यांनी केले तर प्रास्ताविक श्री. संजय बिराजदार यांनी केले.
याचे श्रेय माननीय शिक्षणाधिकारी गुरव मॅडम व श्रीवर्धन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी साहेब यांना जाते.

भविष्यातील अधिकारी घडविण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी म्हणून Raigad Talent Search - RTS  परीक्षा यंदा...
02/07/2024

भविष्यातील अधिकारी घडविण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी म्हणून Raigad Talent Search - RTS परीक्षा यंदा इयत्ता चौथीसाठी होणार आहे. आपल्या केंद्रातील / शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्याची नोंदणी करून आपल्या विद्यार्थ्यांना RTS परीक्षेतून सक्षम करा. नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर जा.
👇👇👇
https://forms.gle/o8CRKF2PiijbJpqv9



2023-24 मध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा RTS नोंदणी अर्ज भरताना लागणारी माहिती : 1. विद्यार्थ्याचे पूर....

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा Alibag - अलिबाग  Date - 02/07/2024रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याची इयत्ता चौथी R...
02/07/2024

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा Alibag - अलिबाग Date - 02/07/2024

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक 02/07/2024 रोजी संपन्न झाली. कार्यशाळेला इयत्ता चौथीचे व पाचवीचे विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. RTS चौथी आणि इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडल्याचे दिसून आले.

याचे श्रेय माननीय शिक्षणाधिकारी गुरव मॅडम व अलिबाग तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. पिंगळा साहेब यांना जाते.
या कार्यशाळेसाठी योगदान देणाऱ्या RTS शिक्षक सदस्य
श्री. रत्नाकर पाटील आणि श्री. दिलदार थळे व त्यांच्या टीमचे हार्दिक आभार

Raigad Talent Search - RTS  कार्यशाळा Pen, Maharashtra    Date - 02/07/2024रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याची इयत्ता चौथी ...
02/07/2024

Raigad Talent Search - RTS कार्यशाळा Pen, Maharashtra Date - 02/07/2024

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याची इयत्ता चौथी RTS व इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची तालुकास्तरीय कार्यशाळा आज दिनांक 02/07/2024 रोजी संपन्न झाली. कार्यशाळेला इयत्ता चौथीचे 80 विद्यार्थी, पाचवीचे 130 विद्यार्थी असे एकूण 210 विद्यार्थी, 30 शिक्षक व 30 पालक अशी एकूण 270 उपस्थिती होती. RTS चौथी आणि इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडल्याचे दिसून आले.

याचे श्रेय माननीय शिक्षणाधिकारी गुरव मॅडम व गटशिक्षणाधिकारी मोरे मॅडम यांना जाते.
या कार्यशाळेसाठी योगदान देणाऱ्या RTS शिक्षक सदस्य
श्री. रत्नाकर पाटील आणि श्री. राकेश आहिरे व त्यांच्या टीमचे हार्दिक आभार

Address

Raigad District
Alibágh

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raigad Talent Search - RTS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category