Akola The Education City

Akola The Education City

Share

Akola is the centre of education and culture in Maharashtra.This city provides the best education wi

13/03/2024

सावधान!, अमीर बनने के लिये 'शॉर्टकट' ना अपनाये.

बहुत से लोग जल्दी अमीर बनने के तरीके ढूंढते रहते हैं। हालाँकि, यदि आप 'अमीरी का शॉर्टकट' ढूंढ रहे हैं, तो आप की अब खैर नही हैं। क्योंकि, केंद्र सरकार की आप पर 'नजर' है. पिछले कुछ दिन पहले संसद में बोलते हुए, प्रधानमंत्री मोदीजीने अपने तीसरे कार्यकाल में कड़े फैसले लेने की चेतावनी दी है। उन्होंने आश्वासन दिया था कि सरकार इसके लिए किये जाने वाले कार्यों में पूरा समय दे रही है. 'बोला वो किया' यह हमारे प्रधानमंत्रीजी का स्वभाव और निरंतर दृष्टिकोण है। इसलिए हमें उनकी हर चेतावनी को गंभीरता से लेना चाहिए. इसके लिए इतिहास को ध्यान में रखना चाहिए और अतीत में उनके कठोर निर्णयों की दृढ़ता को याद रखना चाहिए।

मुझे लगता है कि मोदीजी अपने तीसरे 'कार्यकाल' में काले धन पर सबसे बड़ा फैसला लेंगे. मुझे यह निर्णय लेने में न केवल आशा है बल्कि विश्वास भी है। आज बाजार में कालेधन की संपत्ति का सबसे बडा कारोबार हूंडा चिठ्ठी धड़ल्ले से चल रहा है। भविष्य की समस्याओं से बचने के लिए संबंधित पक्षों को यह सोचना चाहिए कि मोदीजी के तीसरे कार्यकाल से पहले इस तरह के अवैध लेनदेन को कैसे रोका जा सकता है। बहुत से लोगों को या तो अपना सारा कर रहित काला धन सरकार के पास जमा कर देना चाहिए या स्वयं उस पर कर चुकाकर इसे नियमित करना चाहिए।

सभी भारतीयों को अपने व्यवसाय का 'स्वयं ऑडिट' करना चाहिए। जो भी चीज़ आपको ग़ैरक़ानूनी लगती है, उसे आपको ख़ुद ही बंद कर देना चाहिए या वैध कर देना चाहिए. हम वैध कर रहे हैं या अवैध?, ये सब बातें हमारे अलावा कोई नहीं जानता। इसलिए ऐसे सभी मामलों का अध्ययन करें और इसे नियमित करें। मोदी जी की चेतावनी 'काले पत्थर पर सफेद रेखा' है. इसलिए उनकी हर चेतावनी को गंभीरता से लेना चाहिए. इसका मतलब है कि आपके पास बाद में पछताने का समय नहीं होगा। इसलिए भविष्य में 'गलती और चोरी की माफी नहीं मिलेगी' इस संबंध में यह सरल एवं सहज सूत्र याद रखें। जय हिन्द!!!...

ॲड. आशिष बाहेती,
आयकर, विक्रीकर आणि अर्थ सल्लागार,
अकोला.

03/12/2023

I heartily congratulate Modi Ji and the BJP for their well-deserved victory in the elections across three states. I also extend my gratitude to the people of these states for demonstrating maturity and rising above petty politics centered on caste and freebies.

I sincerely hope that this heightened awareness prevails across the nation in the 2024 Lok Sabha elections, where voters can make informed decisions for the betterment of our country.

Long live Bharat!

Hat's off to Modi Ji and his entire team for their dedicated efforts and leadership.

06/11/2022
27/10/2022

*...होय!, आपलं अकोलाही 'एज्यूकेशन हब' होऊ शकतं.*

*अकोला...* संपुर्ण देशात आपल्या शहराची ओळख 'कॉटन सिटी' अशी... याशिवाय आपल्या शहराला अनेक वैभवशाली ओळखी आहेत. 'राजराजेश्वर नगरी', पराक्रमी राजा अकोलसिंगनं वसवलेलं शहर... असदगड किल्ला असणारं शहर... अशा अध्यात्मिक आणि ऐतिहासिक ओळखीही आपल्या शहराला मिळाल्या आहेत... औद्योगिकदृष्ट्या 'कॉटनसिटी' ओळख असलेलं अकोला देशातील दुसऱ्या क्रमांकाचं 'दालमिल हब'ही आहे. अलिकडच्या दहा वर्षांत वैद्यकीय क्षेत्रात अकोल्यानं मोठी भरारी घेतली आहे... जवळपास सर्वच आजारांवर उपचार आपल्या अकोल्यात उपलब्ध आहेत. त्यामूळेच नागपूरनंतर विदर्भाचं 'मेडीकल हब' म्हणून आपल्या अकोल्याची ओळख आहे.

या सर्व क्षेत्रांसोबतच अकोल्याची शिक्षणक्षेत्रातही मोठी घोड-दौड सुरू आहे. उच्चशिक्षणाच्या अनेक संधी आपल्या शहरात आहेत. मेडीकल, इंजिनिअरींगचं शिक्षण देणारी कॉलेजेसही आहेत. अनेक कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मेडीकल-इंजिनिअरींगचे शेकडो विद्यार्थी दरवर्षी यशस्वी होत असतात. देशपातळीवर 'आयआयटीयन्स'ची 'फॅक्टरी' अन 'प्रयोगशाळा' म्हणून राजस्थानमधील 'कोटा' शहराला ओळख मिळाली आहे. पुणे शहराला महाराष्ट्राची 'शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखलं जातं. कधीकाळी लातूरनं आपल्या 'लातूर पॅटर्न'नं संपुर्ण महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळाला भूरळ घातली होती. एकीकडे प्रत्येक शहरानं शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चं अस्तित्व निर्माण केलेलं असतांना यात माझं अकोलाच मागे का?, हा प्रश्न माझ्यासारख्या या शहरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सतावणारा आहे.

काय नाही माझ्या अकोल्यात?... काय कमी आहे आपल्या अकोल्यात?. याच आपल्या अकोला शहरानं कधीकाळी प्रत्येक शिक्षणात स्वत:चा नावलौकीक देशपातळीवर निर्माण केला आहे. मग ते युपीएससी, एमपीएससी, बँकींगसारख्या स्पर्धा परिक्षांचं शिक्षण असो... मेडीकल-इंजिनिअरींगचं असो... की अगदी पोलीस भरती, लिपिक भरती अथवा तलाठी-पटवारी पदाचा अभ्यास... प्रत्येक ठिकाणी आपलं नावं होतं... आपल्या शिक्षणाचा अन कर्तृत्वाचा डंका होता... आजही 'चार्टड अकाऊंटंट' शिकवणीतलं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं दुसरं केंद्र आपलं अकोला आहे. या शहरानं देशाला आणि राज्याला अनेक नामवंत 'सीए' दिले आहेत. 'सीए' क्लासेसमध्ये देशभरात अकोल्याचा मोठा नावलौकीक आणि दबदबा आहे. त्यामूळे दरवर्षीच्या सीएच्या निकालात 'ऑल इंडिया रँकींग'मध्ये सर्वाधिक वाटा आपल्या अकोला शहराचा असतो. संपुर्ण शैक्षणिक वर्तुळात 'सीए क्लासेस'नी आपला दर्जा आणि सातत्य आजही राखून ठेवले आहे.

अलिकडच्या दशकभरात स्पर्धेच्या नावाखाली माझ्या शहराची ही शैक्षणिक क्षेत्रातील वैभवशाली ओळख हळूहळू धुसर व्हायला लागली आहे. अलिकडे तर ही ओळख पुसली जाते की काय?, अशी शंका मनात निर्माण होण्यासारखी परिस्थिती झाल्याचं दुर्दैवी चित्रं निर्माण झालं आहे. हे चित्रं माझ्यासारख्या या शहरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अस्वस्थ करणारं आहे. याची कारणं शोधली असता अनेक धक्कादायक वास्तव समोर आले आहेत. अन या भिषण वास्तवांच्या मुळाशी 'आम्ही अकोलेकर' आहोत ही लोप पावत असलेली भावना असल्याचं दुर्दैवी चित्रंही समोर आलं आहे.

अकोला हे सर्वार्थानं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. रेल्वे, बस आणि लवकरच नजिकच्या भविष्यात विमानसेवेची मोठी कनेक्टीव्हीटी आपल्या शहराला आहे. यासोबतच विद्यार्थी-विद्यार्थींनीसाठी अकोला शहर सर्वार्थाने सुरक्षित असं शहर आहे. विद्यार्थीनींच्या पालकांनी निश्चिंत रहावं घरगुती वातावरण असलेल्या मुलींच्या होस्टेलची मोठी आणि सुंदर सुविधा अकोल्यात आहे. यासोबतच सुसज्ज आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण असलेल्या चांगल्या अभ्यासिकाही अकोल्यात आहे. इतकं चांगलं 'एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर' या शहरात असतांनाही आपण नावलौकीकात का मागे पडतोय, याचा गांभिर्यानं विचार करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. आपण वेळीच जागे झालो नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही.

*ही कारणं टाळता येऊ शकतात 😗

अकोला शहरात सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाचे महाराष्ट्रातील सर्वोत्तम कॉलेजेस आणि कोचिंग क्लासेस आहेत. शहरातील काही कॉर्पोरेट क्लासेस सोडले तर ७५ टक्के क्लासेस यांचे ट्युशन्स क्लास सध्या 'ऑक्सिजन'वर आहेत. या परिस्थितीला अनेक कारणं आहेत. अकोल्यातील कोचिंग क्लासेस आणि सहव्यवसायाची फी खूप जास्त आहे. यामूळेच राज्यभरातील पालक अकोल्यात आपल्या मुलांना पाठवू पहात नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे समन्वयाचा. अकोल्यातील क्लासेस व सहव्यवसायांचा आपसात समन्वय नाही. हा समन्वय नसल्यानं प्रत्येकजण मनमानी पद्धतीनं कारभार सुरू आहे.

तिसरा महत्वाचा मुद्दा आहे निकोप स्पर्धेचा. कोणतीही स्पर्धा निकोप असली तर त्यातून सकारात्मतेचं बिजारोपन होऊ शकतं. मात्र, आपल्या शहरातील कोचिंग क्लासेसमधली स्पर्धा ही शत्रूत्वाची आहे. प्रत्येकजण आपली रेषा मोठी करण्याऐवजी दुसऱ्याची रेषा लहान कशी होईल?, यासाठीच अधिक प्रयत्न करीत आहेत. यातून अकोल्याचं शिक्षण क्षेत्रं बदनाम होत आहे. अकोल्यातील प्रतिष्ठित क्लासेसच्या शिक्षकांनी स्वतःचा विषय घेऊन स्वतःचे वेगवेगळे क्लासेस सुरू केले आहेत. यातून क्लासेसची संख्या वाढली. मात्र, शिक्षणाच्या दर्जाबद्दल कुणी फारसं बोलायला तयार नाही. एकंदरीत क्लासेसमधील अंतर्गत संवाद थांबल्यानं विचारांचं आदान-प्रदान थांबलं आहे. यासोबतच शिक्षण क्षेत्रातील नव्या प्रवाहांच्या संधी तशाच थांबल्या आहेत. या सर्व गोष्टी शिक्षण क्षेत्रातील 'अकोला पॅटर्न'च्या मार्गातील सर्वात मोठे गतिरोधक ठरल्या आहेत.

*आपण हे करूयात 😗

अकोल्याचा शिक्षण क्षेत्रात 'ब्रँड' स्थापित करायचा असेल तर काही गोष्टी आपल्याला जाणीवपुर्वक कराव्या लागतील. यासाठी अतिशय सोपे उपाय आपल्याला करावे लागतील. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अकोल्यातील शिक्षण सर्वसामान्य माणसालाही परवडावं. यासाठी सर्वात आधी आपल्याला आपली फी कमी करावी लागेल. यासाठी सर्व क्लासेस आणि सहव्यवसायींनी आपसात चर्चा करून यासंदर्भातलं सर्वंकष धोरण ठरवावं. नांदेड, नागपूर, लातूर, पुणे या शहरांतील क्लासेसच्या फीपेक्षा २५ टक्के फी कमी करावी. असं झालं तर राज्यभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी अकोल्याकडे वळतील. सर्व क्लासेस आणि त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनी आपसात मैत्रीपूर्ण स्पर्धा ठेवावी.

यासोबतच छोट्या क्लासेसनी एकत्र यावे म्हणजे त्यांना मार्केटिंगचा आणि इतर सर्व खर्च करता येईल. या सर्व गोष्टींचा सर्व क्लासेसनी गांभिर्यानं विचार करणं आता गरजेचं आहे. कारण, शिकणारा विद्यार्थी प्रथम अकोल्यात यायला. त्यानंतर तो आपल्याला ह क्लास निवडेल. त्यानंतर बाकीचे व्यवसाय त्यावर चालतील. कारण, विद्यार्थी आणि त्याच्या शैक्षणिक गरजांतूनच अकोल्यात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. त्यातूनच भांडवल उभं रहात बाजारपेठेला बळ मिळेल. असं झालं तरच अकोल्याचा 'शैक्षणिक हब' होऊ शकेल. शिक्षण क्षेत्रातील एका नव्या आणि आश्वासक 'अकोला पॅटर्न'ला सुरूवात होऊ शकेल. मला वाटतं माझ्या या गोष्टींवर अकोल्यातील सर्व क्लासचालक नक्कीच सकारात्मक विचार करतील.

*'जिवो जिवस्य जीवनम्'* असं म्हटलं जातं. एक एक मणी गुंफल्यानंतरच त्याचा सुंदर असा हार बनतो. अकोल्याच्या शिक्षण क्षेत्रानं आता जुनी जळमटं बाजूला फेकत आता नव्या बदलांना सामोरं जावं. कारण, यातूनच अकोल्याच्या शिक्षण क्षेत्राचा, अकोल्याचा अन पर्यायानं देशाचाही फायदा होईल. राष्ट्रनिर्मितीच्या या महत्वाच्या विषयावरील मी मांडलेल्या विचारांवर निश्चितच सकारात्मकपणे आणि गांभिर्याने विचार होईल याच अपेक्षेसह. चला!, अकोल्याला बदलवूयात... शिक्षण क्षेत्रातला *'अकोला पॅटर्न'* निर्माण करूयात.

*ॲड. डॉ. आशिष बाहेती,*
*कर सल्लागार आणि समाजसेवक,*
*अकोला.*

Want your school to be the top-listed School/college in Akola?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Sai Girls Hostel, Sai Heights, Ram Nagar
Akola
444001