09/08/2026
*आनंदाची अभिमानास्पद बातमी!*
प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी, हितचिंतक व अकोला जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सप्रेम नमस्कार...!
आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे शिवम बहुउद्देशीय संस्था, अकोला संचालित आनंदी गुरुकुल द ग्रूप ऑफ एज्युकेशन, अकोला या संस्थेस संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत सन २०२६–२०२७ या शैक्षणिक वर्षासाठी कौशल्य विकास शिक्षणावर आधारित तब्बल १६ अभ्यासक्रमांना अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.
ही मान्यता म्हणजे केवळ आमच्या संस्थेचा सन्मान नसून विद्यार्थी, युवक-युवती आणि करिअर घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी सुवर्णसंधी आहे.
मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
१. Certificate Course in Acting
(अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
२. Advance Diploma in Film and Television Production
(चित्रपट व दूरदर्शन निर्मितीमधील उच्च पदविका)
३. Diploma in Naturopathy and Yoga Therapy
(निसर्गोपचार व योगचिकित्सा पदविका)
४. Advance Diploma in Modelling
(मॉडेलिंगमधील उच्च पदविका)
५. Diploma in Wildlife Photography
(वन्यजीव छायाचित्रण पदविका)
६. Certificate Course in Teaching Learning Process
(अध्यापन व अध्ययन प्रक्रियेवरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
७. Certificate Course in Power of Mind
(मनशक्तीच्या सामर्थ्यावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
८. Certificate Course in Yoga and Meditation
(योग व ध्यान प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
९. Certificate Course in Proof Reading
(मुद्रितशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
१०. Certificate Course in Wildlife Photography
(वन्यजीव छायाचित्रण प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
११. Certificate Course in Yoga Teacher Training
(योग शिक्षक प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
१२. Certificate Course in English Communication for Workplace and Business
(कामाच्या ठिकाणी व व्यवसायासाठी इंग्रजी संज्ञापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
१३. Certificate Course in Management of Child Care Centre
(बाल संगोपन केंद्र व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
१४. Certificate Course in Event Hosting and Comparing
(कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
१५. Certificate Course in Politics and Communication Skill
(राजकारण व संवाद कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
१६. Certificate Course in Professional Communication Skills and Employability
(व्यावसायिक संवाद कौशल्य व रोजगारक्षमता प्रमाणपत्र अभ्यासक्रम)
या सर्व अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, कौशल्याधारित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वावलंबी भविष्य घडविण्यासाठी आनंदी गुरुकुल सदैव कटिबद्ध राहील.
या यशामागे कुलदैवत आई निंबादेवी,संतश्रेष्ठ गजानन माऊली,श्री पलसिद्ध मठ गुरुमाऊली यांची कृपा व शुभाशीर्वाद,मा.एस. एस. सोसे,सौ.शोभाआई सोसे यांचे मार्गदर्शन, मा. प्रा. डॉ. दीपाली आतिश सोसे यांचे नेतृत्व, प्रा. आतिश सोसे यांचे प्रशासन, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक यांचे सहकार्य मोलाचे आहे.
तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक मा. डॉ. श्रीकांतजी पाटील सर यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.
प्रवेश सुरू आहेत:
✅ प्रवेश संख्या मर्यादित
✅ कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम
✅ अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन
✅ उज्ज्वल करिअरसाठी सुवर्णसंधी
संपर्क :
*प्राचार्य डॉ. दीपाली आतिश सोसे*
📞 ९७६६६४०९५५ / ९८५०४५५९९१
घोषवाक्य
"ज्ञान • कौशल्य • संस्कार — उज्ज्वल भविष्याचा विश्वास."