Balshivaji high school,akola

Balshivaji high school,akola best school in akola.

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात वर्ग १० वी ची संस्कृती विनायक पाठक जिल्ह्यातून व्दितीय तसेच विभागीय स्तरासाठी न...
28/08/2023

अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात वर्ग १० वी ची संस्कृती विनायक पाठक जिल्ह्यातून व्दितीय तसेच विभागीय स्तरासाठी निवड झाल्याबद्दल तिचे संस्थेकडून व शाळेकडून खूप खूप कौतुक व हार्दीक अभिनंदन 💐

बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत
13/01/2022

बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत

बाल  शिवाजी माध्यमिक शाळेत शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन....
01/01/2022

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन....

Teacher's Day celebration ...
11/09/2020

Teacher's Day celebration ...

राज्य स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन !क्रीडा व युवा सेना संचालनालय,पुणे व अकोला क्रीडा अधिकारी कार्यालयाच...
04/11/2017

राज्य स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन !
क्रीडा व युवा सेना संचालनालय,पुणे व अकोला क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय व विभागीयस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
टेबल टेनिस स्पर्धेकरीता मानसी महेश डाबरे वर्ग ७ वा,कराटे स्पर्धेकरीता आदित्य सतीश शास्त्री वर्ग ६वा,कॅरम स्पर्धेकरीता अमिता सुबाहू ठोसर वर्ग १० वा तर आदित्य प्रकाश चतरकर वर्ग ८ वा याची रायफल शुटींग स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
राज्य स्तरावर निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव,सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल,सौ.संगीता जळमकर,सौ.कीर्ती चोपडे,सौ.भारती कुळकर्णी,क्रीडा शिक्षक श्री.खुशाल डोंगरे व शाळासमिती सदस्य या सर्वांनी भरभरून कौतुक केले.

अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धादर वर्षी स्व.अण्णासाहेब देव यांच्या स्मृती प्रित्यर्थ माझी बाल शाळा...
12/10/2017

अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आयोजित विविध स्पर्धा
दर वर्षी स्व.अण्णासाहेब देव यांच्या स्मृती प्रित्यर्थ माझी बाल शाळा विविध स्पर्धांचे आयोजन करते.या स्पर्धा अ,ब आणि क या तीन गटात घेण्यात येतात यात अनुक्रमे K.G.1व K.G.2,वर्ग १ व २ आणि वर्ग ३ व ४ चे विद्यार्थी सहभागी होतात.अ गटासाठी ब गटासाठी पाठांतर स्पर्धा,स्मरणशक्ती स्पर्धा,चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात तर क गटासाठी बुद्धिबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा,सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केल्या जातात. अ आणि ब गटाच्या पाठांतर स्पर्धेकरिता कोठारी कॉन्व्हेंटच्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ.ममता शर्मा या प्रमुख पाहुण्या व परीक्षक म्हणून लाभल्या होत्या. तर क गटाचे पाठांतर स्पर्धेचे परीक्षण सौ.माया देशमुख यांनी केले.
अ गट पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक स्वराली वानखडे (विवेकानंद संस्कार केंद्र),व्दितीय क्रमांक अखिलेश वैद्य(माझी बाल शाळा),तर उत्तेजनार्थ सृष्टी असोलकर(ज्युबिली इंग्लिशस्कूल),सारांश जाजू(कोठारी कॉन्व्हेंट),जाई पाटील(फुलपाखरू मराठी प्रा.शाळा).स्मरणशक्ती स्पर्धा प्रथम शांभवी सुदामे (माझी बाल शाळा),व्दितीय क्रमांक मानस जयस्वाल (विवेकानंद प्रा. स्कूल),तर उत्तेजनार्थ स्वरूप जाधव (विवेकानंद संस्कार केंद्र),विधी गोळे (कोठारी कॉन्व्हेंट),नुपूर खाडे (माझी बाल शाळा).चित्रकला स्पर्धा प्रथम शर्वरी म्हैसने (माझी बाल शाळा),व्दितीय क्रमांक प्रणाली गुजर (विवेकानंद संस्कार क्रेंद्र),तर उत्तेजनार्थ तनिशा गुट्टे(विवेकानंद संस्कार केंद्र),दिलशान इंगळे (फुलपाखरू म.प्रा.शाळा),समृद्धी भगत (माझी बाल शाळा). ब गट पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक तनू कुळकर्णी (SOS बिर्ला शाखा ),व्दितीय क्रमांक संस्कृती हलवणे (विवेकानंद प्रा.स्कूल),तर उत्तेजनार्थ आदिती रत्नाळीकर (SOS),कस्तुरी देशपांडे ,अनुष्का राऊत (बाल शिवाजी प्रा.शा.),स्मरणशक्ती स्पर्धा प्रथम क्रमांक ईशिका ठाकूर ( SOS कौलखेड शाखा),व्दितीय क्रमांक अंश यादव (SOS बिर्ला),तर उत्तेजनार्थ भक्ती घाटोळे (म्हाळसा नारायणी प्रा.शाळा ),आनंदी सरप (बाल शिवाजी प्रा.शाळा.) , श्रीश गणोजे (विवेकानंद प्रा.इं स्कूल).चित्रकला स्पर्धा प्रथम क्रमांक कनिश शिरसाट(जी.डी.प्लॅटिनम स्कूल),व्दितीय क्रमांक सिया बजाज (ज्युबिली इंग्लिश स्कूल),तर उत्तेजनार्थ प्राची बढे (SOSबिर्ला ),वेदश्री बकाल(बाल शिवाजी प्रा.शाळा),ईश्वरी गौंणकर (खंडेलवाल इं.प्रा.स्कूल ). या सर्व विजयी स्पर्धकांना सौ .ममता शर्मा व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चोपडे व सौ.अग्रवाल टीचर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
क गट पाठांतर स्पर्धा प्रथम क्रमांक गार्गी गाडगीळ (बाल शिवाजी प्रा.शाळा),व्दितीय क्रमांक स्वरश्री नागपूरकर (खंडेलवाल इं.प्रा.स्कूल),तर उत्तेजनार्थ अथर्व ठाकरे (ज्युबिली इंग्लिश स्कूल), अर्णवी महाशब्दे (बाल शिवाजी प्रा.शाळा),गौरी जोशी (उत्तमचंद राजेश्वर कॉन्व्हेन्ट ).सामान्य ज्ञान स्पर्धा प्रथम गार्गी भावसार (बाल शिवाजी प्रा.शाळा),व्दितीय क्रमांक स्मित देवहाते (कोठारी कॉन्व्हेंट),तर उत्तेजनार्थ समृद्धी काळंके (बाल शिवाजी प्रा.शाळा),प्रियांशा रुंगटा (कोठारी कॉन्व्हेंट), सक्षम बेदरकर (बाल शिवाजी प्रा.शाळा), बुद्धिबळ स्पर्धा विजेता देवांशी गावंडे (कोठारी कॉन्व्हेंट), उपविजेता मिष्टी अग्रवाल (माउंट कार्मेल), उत्तेजनार्थ अखिलेश कुकडे (ज्युबिली इंग्लिश स्कूल), अनुराग शेगोकार (खंडेलवाल म.प्रा.स्कूल ) या स्पर्धेकरीता श्री. जितेंद्र अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. निबंध स्पर्धा (मराठी) प्रथम क्रमांक गायत्री लांडे (SOSबिर्ला ),व्दितीय क्रमांक समृद्धी मोकळकर (बाल शिवाजी प्रा.शाळा),तर उत्तेजनार्थ अनुराग शेगोकार (खंडेलवाल म.प्रा.स्कूल ), निबंध स्पर्धा (इंग्रजी) प्रथम क्रमांक सारंग काळे (ज्युबिली इंग्लिश स्कूल),व्दितीय क्रमांक जान्हवी चौधरी (कोठारी कॉन्व्हेंट).उत्तेजनार्थ अबीर गंगाखेडकर (बाल शिवाजी प्रा.शाळा), अथर्व पवार (विवेकानंद प्रा.इं स्कूल), जिया भरतीया (कोठारी कॉन्व्हेंट), क गटाच्या या सर्व विजयी स्पर्धकांना ३ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष श्री. दादासाहेब देव व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. विनायकजी क्षीरसागर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.चोपडे व सौ.अग्रवाल टिचर व इन्चार्ज सौ.उपासने व सहशिक्षिका या सर्वांचे सहकार्य लाभले.

बाल शिवाजी शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन्ही महामानवां...
05/10/2017

बाल शिवाजी शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन्ही महामानवांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. महात्मा गांधीचे बालपण या विषयी माहिती शरयू चतरकर हिने दिली,तर लालबहादूर शास्त्री यांची राजकीय कारकीर्द याविषयी पार्थ धोत्रे याने माहिती सांगितली. तसेच गांधीजींच्या जीवनातील एक प्रसंग नचिकेत सहस्त्रबुध्दे व भक्ती मेन यांनी सांगितला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न्यू इंग्लिश हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक मा. श्री. विनायकजी क्षीरसागर हे लाभले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाद्वारे विचारांची प्रगल्भता वाढवावी व पुस्तकांची मैत्री सोडू नका तसेच सतत कार्यरत रहाण्याचे आवाहन केले. स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमुख अतिथी मा. श्री. विनायकजी क्षीरसागर, संस्थेचे सचिव प्राविश्वनाथ गद्रे सर व संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव यांनी बक्षिसे देऊन कौतुक केले. या कार्यक्रमाला कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, मुख्याध्यापिका, शाळा समिती सदस्य, शिक्षक, पालक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत [अठरावर्षाखालील गटामध्ये] आमच्...
24/09/2017

महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत [अठरावर्षाखालील गटामध्ये] आमच्या शाळेची इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कु. सिद्धी अनंत झामरे हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक [रु. १५०००/-] पटकावले. निबंधाचा विषय - "स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते! " असा होता.

Well done Siddhi, we are proud of you!

बाल शिवाजीची मानसी राऊत विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावरराज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर,शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावत...
24/09/2017

बाल शिवाजीची मानसी राऊत विज्ञान मेळाव्यात राज्यस्तरावर
राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर,शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती,शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग अकोला यांनी आयोजित केलेल्या अमरावती विभागीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०१७मध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेची कु.मानसी अरुण राऊत हिने विभागीयस्तरावर अव्वल येत राज्यस्तरावरील फेरीकरिता आपले स्थान निश्चित केले आहे.
प्राथमिक फेरीत तालुका स्तरावर व नंतर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावित मानसीने विभागीय स्तरावर देखील उत्कृष्टपणे सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळवला व राज्यस्तरावरील आपले स्थान निश्चित केले आहे.या वर्षीचा विज्ञान मेळाव्याचा विषय होता "स्वच्छता अभियान-विज्ञान व तंत्रज्ञानाची भूमिका व आव्हाने". या विषयावर मानसी राऊत हिने सखोल अभ्यासपूर्वक, विज्ञान व तंत्रज्ञानातील स्वच्छता अभियानातील आपली भूमिका विशद केली. विविध उपकरणांचा वापर योग्य रितीने केल्यास आपण किती प्रचंड प्रमाणात स्वच्छता राखू शकतो. तसेच शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकरिता स्वच्छतेचे महत्त्व सर्वानी जाणून कृतीशील राहावे.भारताचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी पाहिलेले स्वच्छ भारताचे स्वप्न २०१९ पर्यंत पूर्ण करण्याकरिता प्रत्येक नागरिकाची भूमिका किती महत्वाची आहे.तसेच या सर्वांचे नियोजन करताना विंज्ञानाची भूमिका व त्यापुढील आव्हाने मानसीने उत्कृष्टपणे आपल्या Power Power Point Presentation द्वारे सादर केली

Address

Jatharpeth, Akola
Akola
444005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balshivaji high school,akola posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Balshivaji high school,akola:

Shortcuts

Share

Category