Smt P D Patil Social Work College, Khadki, Akola.

Smt P D Patil Social Work College, Khadki, Akola. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Smt P D Patil Social Work College, Khadki, Akola., Educational Research Center, Akola.

12/08/2022
10/08/2022

*स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव निमित्ताने समाजकार्य महाविद्यालयात 75 गुणवंत विद्यार्थ्यांना डिग्री देऊन सन्मानित करण्यात आले.*

स्थानिक ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ खडकी, द्वारा संचालित श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, येथे दिनांक 06 ऑगस्ट 2022 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम विचार मंचावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यासोबत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथील विद्यापीठ स्वागत गीत सादर करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ केशवराव गोरे सर यांनी केले. प्राचार्य गोरे सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की खरंतर श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी दरवर्षी गुणवत्ता यादीत अर्थात अमरावती विद्यापीठामधून मेरीट येतात. सोबत असंख्य विद्यार्थी घवघवीत यश संपादन करतात. खरंतर विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीची ही पावती आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सोबत ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि सचिव यांचे सुध्दा यावेळी सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने धन्यवाद मानले. की त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव समाज कार्य महाविद्यालय स्थापन करून असंख्य विद्यार्थ्यांच्या अंधारमय जीवनाला प्रकाशमय करण्याचे कार्य केले तसेच एम. एस. डब्ल्यू. उन्हाळी परीक्षा 2021 मध्ये आकाश शंकर कारंजकर हा विद्यापीठातून तिसरा मेरीट आला तर ज्ञानेश्वर भास्कर भाकरे हा विद्यापीठातून चवथा मेरीट आला. तर कु. निकिता राजेंद्र इंगळे ही विद्यापीठातून सहावी मेरीट आली. तर राम संजय गालट हा विद्यापीठातून सातवा मेरीट आला. विद्यापीठातून मेरिट आलेले विद्यार्थ्यांचे तसेच घवघवीत यश संपादन करणाऱ्या 75 गुणवंत विद्यार्थ्यांना डिग्री देऊन सन्मानित करण्यात आले,विद्यार्थ्यांचे यावेळी पदवी व बक्षीस देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांचा आदर सत्कार करण्यात आला. यावेळी दीक्षांत समारंभ या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रा. डॉ.सुरेश रावजी काळे सर (सचिव ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ खडकी) तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रा. डॉ.राजीवजी बोरकर ( संचालक विद्यार्थी विकास कक्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती.) तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित सन्माननीय प्रा.डॉ.रावसाहेब ठोके (अध्यक्ष समाजकार्य अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती) हे होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित सन्माननीय प्रा. डॉ.केशवरावजी गोरे (प्राचार्य श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी, अकोला.) हे होते. दीक्षांत कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा. डॉ.केतन वाकोडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. परळीकर मॅडम यांनी केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील प्रा.डाॅ.संकेत काळे, प्रा.डाॅ. संदीप भोवते, प्रा.डॉ.सुधीर देशमुख, प्रा.डाॅ. गणेश बोरकर,प्रा.डॉ. कविता कावरे, प्रा.डॉ.बळीराम अवचार, प्रा. नवनाथ बडे, प्रा. वागतकर,प्रा.डॉ.रोहित काळे,प्रा.डॉ.अर्चना धर्मे,प्रा.डॉ. प्रेमसिंग जाधव,प्रा.डॉ.बळवंत पाटील, प्रा. पांडुरंग पाचपुते, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा.डॉ.प्रफुल्ल पवार, यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

श्रीमती पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 18 फेब्रुवारी 2022रोजी समान संधी केंद्राचे उदघाटन करण्य...
19/02/2022

श्रीमती पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 18 फेब्रुवारी 2022रोजी समान संधी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

29/07/2021
*समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन* खडकी येथील श्रीमती पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात...
29/07/2021

*समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन*
खडकी येथील श्रीमती पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रम संपन्न, यावेळी प्रा.नवनाथ बडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप भोवते सर तर प्रमुख पाहुणे म्‍हणून ग्रामीण विकास शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संकेत काळे सर उपस्थित होते,कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. डॉ.सुधीर देशमुख ,प्रा. डॉ.बळीराम अवचार, प्रा. नवनाथ बडे ,प्रा. मनोहर वागतकर, प्रा. डॉ.प्रफुल्ल पवार ,प्रा. डॉ. बळवंत पाटील, प्रा. डॉ.प्रेमसिंग जाधव, प्रा.पांडुरंग पाचपुते ,प्रा.डॉ.केतन वाकोडे उपस्थित होते. छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पी.आर.पाचपुते सर तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. केतन वाकोडे यांनी केले.

Address

Akola
444004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smt P D Patil Social Work College, Khadki, Akola. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share