26/06/2026
*माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांना महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली*
अकोला:स्थानिक सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड.मोतिसिहजी मोहता आणि मानद सचिव डॉ.पवनजी माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉ.आर.डी.सिकची यांच्या प्रेरणेने आणि सांस्कृतिक तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षात आयोजित या शोकसभेत प्र.प्राचार्य.बी.बी.धारणे, युनिट प्रमुख प्रा.एस.आर.दामोदर, IQAC समन्वयक डॉ.बी.जी.जोगदड,डॉ.डी.आर.एललकर, डॉ.भारती पटनायक, डॉ.स्नेहल शेंबेकर, डॉ .ज्ञानशील खंडेराव,डॉ.कैलास वानखेडे, डॉ.सुनिल गायगोळ, डॉ. संतोष कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ.अशोक सोनोने,डॉ.हरिचंद नरेटी, डॉ.निरज लांडे,डॉ.अजयकुमार सोळंके, डॉ.नाना भडके, डॉ.अमोल गावंडे तसेच इतर सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. बी. टी. देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रा. बी. टी. देशमुख यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. "बी ,टी, भाऊंचे निधन ही शिक्षण क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी आहे. त्यांनी आयुष्यभर शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा दिला. विदर्भाच्या विकासाचा आणि सिंचनाचा प्रश्न त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला," अशा शब्दांत प्राचार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांचे साधे राहणीमान, उच्च विचारसरणी आणि समाजकार्याची तळमळ ही नवीन पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे त्यांनी सांगितले.
या शोकसभेचा समारोप अत्यंत शोकमय वातावरणात झाला.