Smv Akluj Malshiras

Smv Akluj Malshiras Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Smv Akluj Malshiras, School, Akluj.

सदाशिवराव माने विद्यालय , अकलूज विजयादशमी कार्यालयपुजन मा.मुख्याध्यापक यांच्या हस्ते 🙏🙏
12/10/2024

सदाशिवराव माने विद्यालय , अकलूज विजयादशमी कार्यालयपुजन मा.मुख्याध्यापक यांच्या हस्ते 🙏🙏

08/10/2024
अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात ४ ऑक्टो.२०२४ वार शुक्रवार रोजी कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची पुण्यतिथी साजरी ...
04/10/2024

अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात ४ ऑक्टो.२०२४ वार शुक्रवार रोजी कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षिका सौ.वाय्.एफ्. शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इ.९वी तु.ड च्या वर्गाने केले.प्रारंभी कु.श्रावणी भडकुंबे हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मा. मुख्याध्यापक श्री.फुले सर यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी निवड केली.
कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री.फुले सर,मा. उपमुख्याध्यापक श्री.घंटे सर,मा. उपप्राचार्य श्री. सय्यद सर,मा. उपप्राचार्य श्री. बी.पी.शिंदे सर,पर्यवेक्षक श्री.डी.आर.मगर सर, श्री.बोरावके सर, सर्व विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी‌ व इ.९वी (ड) मधील कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले.
या थोर महापुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त चि. कैफअली सय्यद याने कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या सामाजिक कार्याचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी कु.मुस्कान शेख हिने उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तेजश्री चव्हाण हिने केले.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल वर्गशिक्षिका सौ. वाय्.एफ्.शेख मॅडम व कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या इ.९वी (ड) मधील विद्यार्थ्यांना मा. मुख्याध्यापक श्री.फुले सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास मा. मुख्याध्यापक, मा. उपमुख्याध्यापक, मा.उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, महिला प्रतिनिधी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

आज विद्यालय मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली
02/10/2024

आज विद्यालय मध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलितसदाशिवराव माने विद्यालय,अकलूज या आपल्या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्...
15/09/2024

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित
सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज या आपल्या शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र 2 मध्ये माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे त्याबद्दल अभिनंदन व जिल्हा स्तरावर निवड झाली त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !

14 सप्टेंबर 2024 वार शनिवार रोजी 'हिंदी दिवस' उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षक ...
14/09/2024

14 सप्टेंबर 2024 वार शनिवार रोजी 'हिंदी दिवस' उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षक श्री. पी.जी निंबाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी तु. ड च्या वर्गाने केले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पी.जी निंबाळकर सर यांनी केले. त्यांनी हिंदी भाषेचे 'राष्ट्रभाषा' म्हणून असलेले महत्त्व सांगितले व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. मुख्याध्यापक श्री. फुले सर यांची निवड केली.
विद्येची देवता सरस्वती, स.म. शंकरराव मोहिते पाटील उर्फ काकासाहेब व स्वर्गीय आक्कासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. फुले सर, मा.उप मुख्याध्यापक श्री. घंटे सर, मा. उपप्राचार्य श्री. सय्यद सर, सर्व पर्यवेक्षक, महिला शिक्षिका प्रतिनिधी, सर्व हिंदी विषयाचे शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांच्या हस्ते करण्यात आले.'हिंदी दिवसा'चे औचित्य साधून मंचावरील सर्व मान्यवरांचा सत्कार गुलाबपुष्प देऊन करण्यात आला तसेच हिंदी विषय शिकवणाऱ्या विद्यालयातील शिक्षकांनाही गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 'हिंदी दिवसा'निमित्त कु.अपेक्षा नलवडे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मुख्याध्यापक श्री. फुले सर यांनी राष्ट्रभाषेतून सर्वांना 'हिंदी दिवसा'च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी कु.वैष्णवी घोगरे या विद्यार्थिनीने उपस्थित सर्वांचे हार्दिक आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.केतकी गाजरे हिने केले. याप्रसंगी विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक,मा. उपमुख्याध्यापक, मा. उपप्राचार्य, सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

दिव्यांग साठी रॅम्प करताना एन एस एस ची मुले
10/09/2024

दिव्यांग साठी रॅम्प करताना एन एस एस ची मुले

स्वच्छतेविषयी चित्रकला स्पर्धा घेतल्यानंतर त्यातील काही निवडक चित्रे
10/09/2024

स्वच्छतेविषयी चित्रकला स्पर्धा घेतल्यानंतर त्यातील काही निवडक चित्रे

जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तर रायफल शूटिंग स्पर्धेत येथील सदाशिवराव माने विद्...
10/09/2024

जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तर रायफल शूटिंग स्पर्धेत येथील सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज या शाळेतील कु. सिद्धी राजेंद्र राऊत या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला तर चि. अनुज दिनेश जाधव याने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली,त्याबद्दल तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे साहेब यांच्या हस्ते या दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र-जिल्हा उपरुग्णालय, अकलूज यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
10/09/2024

प्राथमिक आरोग्य केंद्र-जिल्हा उपरुग्णालय, अकलूज यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.

आज  विद्यालयामध्ये सखी सावित्री मंच, या समितीची सभा संपन्न झाली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत त्याचबरोबर आरोग्य बाबत  च...
05/09/2024

आज विद्यालयामध्ये सखी सावित्री मंच, या समितीची सभा संपन्न झाली. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत त्याचबरोबर आरोग्य बाबत चर्चा करण्यात आली...

वीर साम्राज्य ग्रुप,व  सदाशिवराव माने विद्यालय अकलूज चे माजी विद्यार्थी,  यांच्यामार्फत  प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी  आ...
29/08/2024

वीर साम्राज्य ग्रुप,व सदाशिवराव माने विद्यालय अकलूज चे माजी विद्यार्थी, यांच्यामार्फत प्रशालेतील विद्यार्थिनींसाठी आरोग्य विषयक साहित्य देण्यात आले

Address

Akluj
413101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smv Akluj Malshiras posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Smv Akluj Malshiras:

Shortcuts

Share

Category