Bhakti Typing & Computer Institute Govt.recognised

Bhakti Typing & Computer Institute Govt.recognised typing training

जीसीसी टीबीसी जून-जुलै 2025 परीक्षेत अर्चना शिंदे 96.50% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात द्वितीय, तेजस्विनी थोरात आणि सुशां...
01/09/2025

जीसीसी टीबीसी जून-जुलै 2025 परीक्षेत अर्चना शिंदे 96.50% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात द्वितीय, तेजस्विनी थोरात आणि सुशांत वगरे 95.50% गुण प्राप्त करत तृतीय

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज च्या विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

अकलूज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने जून जुलै 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी टीबीसी कॉम्प्युटर टायपिंग स्पीड परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज या संस्थेतील अर्चना तुकाराम शिंदे हिने इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात 96.50% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये द्वितीय येण्याचा बहुमान मिळविला, तर तेजस्विनी सुहास थोरात हिने इंग्रजी 30 स्पीड या विषयात व सुशांत हरिदास वगरे याने मराठी 30 स्पिड या विषयात 95.5% गुण प्राप्त करत तालुक्यात तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला. भक्ती संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाची मागील परंपरा कायम ठेवत दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे.
विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-
इंग्रजी 30 श.प्र.मि. स्पीड या विषयात - अर्चना तुकाराम शिंदे 96.50% प्रथम, तेजस्विनी सुहास थोरात आणि सुशांत हरिदास वगरे 95.50% द्वितीय, वैष्णवी सुनील देसाई 94.50% तृतीय.
मराठी 30 श.प्र.मि. या विषयात :- आकाश गंगाराम घुले 95% प्रथम, श्रीकांत सतीश साठे आणि अर्चना तुकाराम शिंदे 94.50% द्वितीय, राजू सुभाष तेली 92% तृतीय.
इंग्रजी 40 स्पीड या विषयात :- प्रेरणा निवृत्ती जाधव 90.50% प्रथम, श्रीराज नितीन भोसले 85% द्वितीय, वैष्णवी रविकांत नाळे आणि संजीवनी बाळासाहेब वाघमोडे यांनी 79% गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या परीक्षेतील मराठी 30 स्पीड विभागामध्ये राजू सुभाष तेली व काजल जोतीराम सावंत यांनी 40 पैकी 40 गुण प्राप्त केले तर लेटर स्टेटमेंट आणि ई-मेल या एकत्रित विभागांमध्ये विकास हरिदास जाधव, ऋतुजा आनंदराव महानवर, वैष्णवी राजेश कपुरिया, कावेरी बन्सी गायकवाड, अस्मिता जगदीश इंगळे, आकाश गंगाराम घुले, कोमल सतीश तोडकर, मच्छिंद्रनाथ प्रभाकर घाडगे, मोनाली राजेंद्र माने, प्रगती छगन पालवे यांनी 35 पैकी 35 गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य संपादन केले. संस्थेतील 73 विद्यार्थ्यांनी ए प्लस श्रेणी व 18 विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त केली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने शासकीय, निमशासकीय, महामंडळे, सहकार क्षेत्र आदी विभागातील लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी जीसीसी टीबीसी मराठी, इंग्रजी व हिंदी 30 व 40 शब्द प्रति मिनिट या विषयाचे कोर्सेस महाराष्ट्र व गोवा राज्यातील शासन मान्यता प्राप्त संस्थांमधून चालविले जात असून परिषदेमार्फत वर्षातून दोनदा या परीक्षा घेतल्या जातात व या परीक्षा पास झालेले विद्यार्थी लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात.
जून जुलै 2025 मधील जीसीसी टीबीसी परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ, नितीन दुरणे सर, किरण भगत सर, ज्ञानदीप जवंजाळ सर, प्रज्ञा गायकवाड मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उज्वल यश प्राप्त केलेल्या तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून संस्थेच्या वतीने प्राचार्य गजानन जवंजाळ सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

जीसीसी-टीबीसी डिसेंबर २०२४ परीक्षेत कु.बनसोडे क्षितिजा कुबेर ९६% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात प्रथम, तर साळुंखे सुरज द्व...
08/02/2025

जीसीसी-टीबीसी डिसेंबर २०२४ परीक्षेत कु.बनसोडे क्षितिजा कुबेर ९६% गुण मिळवून माळशिरस तालुक्यात प्रथम, तर साळुंखे सुरज द्वितीय आणि वळकुंडे काजल तृतीय

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूजच्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

अकलूज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे वतीने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी-टीबीसी (कॉम्प्युटर टायपिंग स्पीड) परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी यशाची उज्वल परंपरा कायम ठेवत दैदिप्यमान यश प्राप्त केले.
संस्थेतील कु. बनसोडे क्षितिजा कुबेर हिने कॉम्प्युटर टायपिंग परीक्षा जीसीसी-टीबीसी इंग्रजी ३० श.प्र.मि. या विषयात ९६% गुण प्राप्त करत माळशिरस तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळविला, तर याच विषयात साळुंखे सुरज राजेंद्र याने ९४.५ गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांकाचा आणि वळकुंडे काजल मोहन हिने इंग्रजी ३० व मराठी ३० या विषयात ९३.५% गुण प्राप्त करत तालुक्यात तृतीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केला.
जीसीसी-टीबीसी डिसेंबर २०२४ परीक्षेत विषयानुसार संस्थेमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :-
इंग्रजी ३० श.प्र.मि. या विषयात :- बनसोडे क्षितिजा कुबेर ९६% प्रथम, साळुंखे सुरज राजेंद्र ९४.५% द्वितीय, वळकुंडे काजल मोहन ९३.५% तृतीय.
इंग्रजी ४० श.प्र.मि. या विषयात :- कु.वळकुंडे काजल मोहन ९०% प्रथम, साळुंखे सुरज राजेंद्र व हाके सुशांत दत्तात्रय ८४.५% द्वितीय, नागरगोजे आर्यन भीमराव ८३% तृतीय.
मराठी ३० श.प्र.मि. या विषयात :- वळकुंडे काजल मोहन ९३.५% प्रथम, मुळे कल्याण रमेश ८९% द्वितीय, माने निकिता पांडुरंग ८७% तृतीय, असे गुण प्राप्त करत या सर्वांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. तर भिताडे अतुल ९२%, आगलावे तेजस व गायकवाड मयुरी ९१.५%, भोसले श्रीराज ९१%, माने निकिता ९०%, दहिवाळ वैष्णवी व मस्के उज्वला यांनी ८९.५% गुण मिळवत संस्थेमधील ५३ विद्यार्थ्यांनी ए प्लस व १४ विद्यार्थ्यांनी ए श्रेणी प्राप्त करत विशेष प्राविण्य संपादन केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत शासकीय, निम-शासकीय विभागातील लिपिक (क्लार्क) पदांच्या भरतीसाठी जीसीसी-टीबीसी मराठी, इंग्रजी व हिंदी ३० व ४० शब्द प्रति मिनिट या विषयांचे कोर्सेस चालविले जात असून वर्षातून दोन वेळेस या परीक्षा घेतल्या जातात व परीक्षा पास झालेले विद्यार्थी सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे आदी विभागातील लिपिक पदांच्या भरतीसाठी पात्र ठरतात.
डिसेंबर २०२४ मधील जीसीसी-टीबीसी (कॉम्प्युटर टायपिंग) परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ सर, नितीन दुरणे सर, किरण भगत सर, ज्ञानदीप जवंजाळ सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. उत्तुंग यश प्राप्त करत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून संस्थेच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.

22/03/2023

GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी, मराठी व हिंदी 30 wpm, 40 wpm टायपिंग कोर्स
"शासकीय निमशासकीय खात्यातील लिपिक/क्लार्क पदासाठी अनिवार्य"
🎯
करियर घडविण्यामधील एक अत्यावश्यक टप्पा
🎯
*राज्यातील वर्ग-3* मधील *लिपिकांची (क्लार्क)*
सर्व रिक्त पदे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत
जुलै 2023 मध्ये होणाऱ्या GCC-TBC कॉम्प्युटर टायपिंग इंग्रजी, मराठी व हिंदी 30 wpm, 40 wpm परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी/
नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या इच्छुकांनी आजच आपला प्रवेश आमच्या शासनमान्य भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेत नोंदवावा.
👇
खुप काही फायदे आहेत Typing कोर्स करण्याचे..

आज बाजारात इंटरनेट, कॉम्प्युटर आणि टायपिंगचे ज्ञान तथा कौशल्य असलेले अनेकजण या कौशल्याच्या जोरावर आपले चरितार्थ करताना आपण पाहात आहोत.
त्याच बरोबर हा कोर्स केलेले अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीत लिपिक/क्लर्क टायपिस्ट* या *पदावरती* नोकरी करताना ही दिसतात.
अधिकारी वर्गातही मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटर टायपिंग कौशल्य प्राप्त अधिकारी आहेत.
त्यामुळे त्यांना त्यांचे ‘काम अधिक सोपे, वैयक्तिक आणि गोपनीय पद्धतीने करण्यास मदत होते’,
असे अधिकारी वर्गाचे मत आहे. शिवाय *स्पर्धा परीक्षा* मध्येही अनेक पदांसाठी कॉम्प्युटर टायपिंग कम्पलसरी आहे.
बँका, पतसंस्था, सहकारी संस्था- बँका, शाळा-कॉलेजेस, विद्यापीठ, कचेरी, ट्रेझरी, पोस्ट ऑफिस, टेलिफोन ऑफिस, न्यायालय/कोर्ट, ग्रामपंचायत, नगरपरिषद इत्यादी सर्व शासकीय-निमशासकीय विभागांपासून ते मंत्रालयातील कार्यालयापर्यंत सर्वच क्षेत्रात आज कॉम्प्युटर टायपिंग क्लासचा विद्यार्थी झळकताना दिसत आहेत.
🎯
27 वर्षांची उज्वल परंपरा जोपासलेले
शासन मान्यता प्राप्त
🎯

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज
जुने एसटी स्टँड जवळ, सिद्धनाथ कलेक्शन समोर,
धनश्री कॉम्प्लेक्स, फ्रेंड्स इलेक्ट्रिकल्स चे वर,
पहिला मजला, गाळा नंबर 13 व 14, अकलूज
प्रा. गजानन ज्ञानेश्वर जवंजाळ
मो.9423327903

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज च्या विद्यार्थ्यांचे शासकीय जीसीसी-टीबीसी परीक्षेत नेत्रदीपक यश - कु.साबळे य...
30/04/2022

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज च्या विद्यार्थ्यांचे शासकीय जीसीसी-टीबीसी परीक्षेत नेत्रदीपक यश - कु.साबळे योगिता 99% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम

नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे वतीने घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भक्ति कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलुज या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.
या परीक्षेमध्ये संस्थेतील कु.साबळे योगिता नवनाथ हिने मराठी 30 श.प्र.मि. या विषयात 99% गुण प्राप्त करत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. कु.शिंदे स्नेहल विनायक हिने इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात 96.5% गुण मिळवून संस्थेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कु.सुरवसे वैष्णवी संजय हिने मराठी 30 श.प्र.मि. मध्ये व गिरमे रोहन राजेंद्र याने हिंदी 40 श.प्र.मि. या विषयात 96% गुण मिळवून संस्थेत विभागून तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले.
विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे :- जीसीसी-टीबीसी मराठी 30 श.प्र.मि या विषयात - कु.साबळे योगिता 99% प्रथम, कु.सुरवसे वैष्णवी 96% द्वितीय, कु.मुलाणी शबाब 93.5% तृतीय.
जीसीसी टीबीसी-इंग्रजी 30 श.प्र.मि. या विषयात - कु.शिंदे स्नेहल 96.5% प्रथम, कु.साबळे योगिता 95.5% द्वितीय, कु.शेख हिना 93.5% तृतीय.
जीसीसी-टीबीसी इंग्रजी 40 श.प्र.मि. या विषयात - कु.मुलाणी शबाब 94% प्रथम, कु.साबळे योगिता 91% द्वितीय, इंगवले सुजय 90% तृतीय.
गिरमे रोहन याने हिंदी 40 श.प्र.मि. या विषयात 96% व GCC-SSD-CTC या विषयात 81.5%, साठे स्वप्निल याने मराठी 40 श.प्र.मि. या विषयात 83% तर कु. जगताप साक्षी हिने GCC-SSD-CTC या विषयात 83.5% व हिंदी 30 या विषयात 89.5%, भासगी अर्चना हिने मराठी 30 मध्ये 92%, बागव रणजित याने इंग्रजी 30 मध्ये 92.5% गुण प्राप्त करत उज्वल यश संपादन केले.
या परीक्षेतील प्रश्न विभाग एक मध्ये साबळे योगिता हिने याने 50 पैकी 50 गुण प्राप्त केले, तर विभाग दोन मध्ये चव्हाण मयुरी, मुलाणी शबाब, साबळे योगिता, जगताप साक्षी, बागव रणजीत, इंगवले सुजय, जामदार राधिका, लोंढे अनिकेत, गिरमे रोहन यांनी 30 पैकी 30 मार्क मिळविले, तसेच तिसऱ्या गती परिच्छेद विभागात चव्हाण रविराज, शेख हिना यांनी 20 पैकी 20 गुण मिळवत विशेष उल्लेखनीय यश प्राप्त केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ, नितीन दुरणे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी संस्थेच्या वतीने अभिनंदन केले आहे.

रोटरी क्लब ऑफ अकलूजआणिभक्ति कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूजयांचे संयुक्त विद्यमानेआयोजित🩸रक्तदान शिबिर🩸👇रविवार दिन...
27/03/2022

रोटरी क्लब ऑफ अकलूज
आणि
भक्ति कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज
यांचे संयुक्त विद्यमाने
आयोजित
🩸रक्तदान शिबिर🩸
👇
रविवार दिनांक 27 मार्च रोजी
सकाळी 10 ते सायं.5.00 या वेळेत
👇
शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक,
गणेश नगर-अकलूज,
(टेलिफोन टॉवर जवळ) येथे
आयोजित केलेल्या
🩸रक्तदान शिबिरात🩸
इच्छुक रक्तदात्यांनी तसेच आपले मित्र परिवार जर इच्छुक असतील तर त्यांना देखील सोबत घेऊन रक्तदान करून या सामाजिक कार्यास हातभार लावावा ही विनंती.
:-
रोटरी क्लब ऑफ अकलुज
भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज

'ध्येय' इतिहास घडवणाऱ्या सामर्थ्यवान माणसांची शक्तीच असते- चंद्रशेखर गायकवाडजगाच्या इतिहासात जेवढी महान माणसे घडली त्यां...
03/10/2021

'ध्येय' इतिहास घडवणाऱ्या सामर्थ्यवान माणसांची शक्तीच असते
- चंद्रशेखर गायकवाड

जगाच्या इतिहासात जेवढी महान माणसे घडली त्यांचे विचार, स्वप्ने, ध्येये महान होती. एखादा चांगला विचार मनुष्याच्या जीवनात क्रांती घडवितो, एखादे स्वप्न मनुष्याला महान बनवून टाकते. तर एखाद्या महान ध्येयातून इतिहासाची निर्मिती होते असे उद्गार साहित्यिक व प्रसिद्ध व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांनी रोटरी क्लब अकलूज आणि भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज आयोजित "ध्येय वेडी माणसंच इतिहास घडवतात.." या विषयावरील व्याख्यान देताना काढले.
26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता कृष्णप्रिया मल्टी फंक्शन हॉल, अकलूज येथे रोटरी क्लब अकलूज व भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने रोटरीच्या लिटरसी मंथ अंतर्गत सदर व्याख्यान, तसेच उपस्थितांना व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड लिखित "हो मी जिंकणारच" या पुस्तकाचे मोफत वितरण तसेच भक्ति टायपिंग संस्थेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण व विशेष सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचा प्रारंभ व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते तुळशीचे रोपास पाणी घालून करण्यात आला.
रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष सीए नितीन कुदळे यांनी प्रास्ताविक करताना त्यांनी रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सामाजिक संघटना असून ती पर्यावरण, महिला-मुली सक्षमीकरण, आरोग्य-वैद्यकीय, शैक्षणिक, जलसंधारण इत्यादी क्षेत्रात खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचून त्या गरजा दूर करण्यासाठी कटिबद्ध असून बहुतांशी ठिकाणच्या या गरजा पूर्ण केल्या असल्याचे सांगत रोटरी क्लबने माळशिरस तालुक्यात या विविध क्षेत्रातील केलेल्या विद्यार्थ्यांना 250 डिजिटल टॅब वाटप, आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना शिलाई मशीनचे वाटप, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांच्या जडणघडणही मधले सेमिनार, जिल्हा परिषद शाळांना ई लर्निंग सॉफ्टवेअर, चे तसेच शैक्षणिक उपकरणांचे वाटप, रोटरी ची मेडिकल बँक इक्विपमेंट सेवा, डायलेसिस मशीन ची सेवा, ब्लड डोनेशन कॅम्प, अवयव दान आदी अशा भरीव कामांचा आढावा घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी सोलापूर जिल्हा टंकलेखन-लघुलेखन आणि संगणक टायपिंग संस्थांची संघटना चे माजी अध्यक्ष मा.अजय निकते, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी मा.सौ रेखा नारायण गाडेकर, रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष नितीन कुदळे, सचिव आणि भक्ती संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ हे उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ.रेखा गाडेकर यांनी रोटरी क्लब व भक्ती टायपिंग संस्थेने आजचे हे आयोजित केलेले प्रेरणादायी व्याख्यान, तसेच "वाचाल तर वाचाल" ही उक्ती सार्थ करण्यासाठी व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड 'हो मी जिंकणारच' हे प्रेरणादायी पुस्तक उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत भेट हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे विशद केले. तसेच मी स्वतः 30 वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मराठी व इंग्रजी या विषयांच्या 30,40 स्पीड परीक्षा प्रमाणपत्राच्या आधारावर लिपिक पदापासून प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला तो प्रशासन अधिकारी या पदापर्यंत जाऊन पोहोचला.
तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे अंतर्गत शासनमान्य टायपिंग/कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट मधून मराठी,इंग्रजी व हिंदी या विषयांच्या स्पीड परीक्षा पास होऊन त्या प्रमाणपत्राच्या आधारावर स्पर्धा परीक्षा तथा अनुकंपा तत्त्वातून लिपिक पदासाठी काही जण पात्र ठरतात. असेच अनेक विद्यार्थी भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज च्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावत आहेत असे सांगत उपस्थित विद्यार्थ्यांना कासवाच्या गतीने चालताना जरी अनेक ससे आडवे आले तरी तुमचे खऱ्या अर्थाने जीवन सफल करणारे ध्येय गाठा असे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी या दोन्ही संस्थांच्या वतीने साहित्यिक चंद्रशेखर गायकवाड लिखित "हो मी जिंकणारचं" या प्रेरणादायी पुस्तकांच्या 250 प्रतींचे मोफत वितरण करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत जानेवारी 2020 व मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या जीसीसी-टीबीसी मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयांच्या 30/40 शब्द प्रति मिनिट तसेच जीसीसी-एसएसडी-सीटीसी या परीक्षेत भक्ति कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट,अकलूजच्या ज्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांना तसेच या विषयांच्या प्रमाणपत्राच्या आधारावर काही विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजू झाले आहेत अशांचा सन्मान तसेच पारितोषिक वितरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
या पारितोषिक वितरण प्रसंगी मार्च 2021 च्या परीक्षेतील निहाल हारूण नदाफ, आलम कचरूद्दीन सय्यद, रोहिणी बळीराम शिंदे, स्वप्नील बयाजी साठे, अर्चना सिद्धाप्पा भासगी, समीक्षा बापूसाहेब सोनवणे, रसिका महादेव ननवरे, किरण पोपट भगत, शिबाली बापूसाहेब सोनवणे, आकाश प्रभाकर महादार, साक्षी अनिल माने, अमोल अंकुश डोके, ईकबाल सिकंदर शेख, आदेश सुधाकर टिळेकर, काजल रघुनाथ घोगरे, प्रणव संतोष पटणे आणि ज्ञानदीप गजानन जवंजाळ यांना, तर जानेवारी 2020 च्या परीक्षेतील कोमल अर्जुन नवगिरे, शिबाली बापूसाहेब सोनवणे, साजिया रशिद तांबोळी, वैष्णवी महादेव ननवरे, यशराज संजय झेंडे, निलेश मधुकर शिंदे, धनश्री मोहन रुपनवर, मिराज नजीर शेख, राहुल राजेंद्र सुरवसे, आसिफ कासिम मुलाणी, रसिका महादेव ननवरे, प्रणव संतोष पटणे, अमृता अर्जुन नवगिरे, सायली बबन गायकवाड आणि निर्मिती स्वप्नील जाधव या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
यासोबत विविध शासकीय कार्यालयीन सेवेत रुजू झालेल्या वंदना गणेश फुले, रविराज दत्तात्रय भांगे, सागर रविंद्र लोंढे, अमोल अंकुश डोके, शिवकुमार दत्तात्रय भिंगे, पांडुरंग भीमराव जाधव, विशाल दत्तात्रय जावळे, याहयाअली अमीन पठाण यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी भक्ति टायपिंग संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ तसेच संस्थापक श्री.अजय निकते, शिक्षक वर्ग नितीन दुरणे, ओंकार गोंदकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या विविध उपक्रमयुक्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुहास उरवणे सर यांनी केले, तर आभार प्रा.रो.गजानन जवंजाळ यांनी मानले.
याप्रसंगी अशोक साळुंखे, नीलकंठ हजारे, संचिता नेटके, हनुमंत भडके, अशोक साळुंखे, नीलकंठ हजारे, अशोक घोडके, संजय नवले, पांडुरंग पवार, रतिश नायर, ज्ञानदीप जवंजाळ, अमोल टिंगरे, संतोष गारडे, पोलीस पाटील शंकर बागडे ॲड.भारत गोरवे, सौ.अश्विनी जवंजाळ, मास्टर दीप स्पोकन इंग्लिश चे प्रा.दीपक बोडरे, रोटरी क्लब अकलूजचे सदस्य रो.नवनाथ नागणे रो.गोमटेश दोशी, रो.बबनराव शेंडगे, रो.स्वप्निल शहा, रो.सुशील व्होरा, रो.जयदीप बोरावके, रो.संदीप साळुंखे, रो.दत्तात्रय नलवडे, रो.केतन बोरावके, रो.स्वराज फडे, रो.योगेश व्होरा, रो.संतोष पवार, रो.आशिष गांधी, रो.कल्पेश पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते

अभिनंदनमहाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांचे मार्फतमार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्याशासकिय GCC-TBC काॅम्प्युटर टायपिं...
04/06/2021

अभिनंदन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे यांचे मार्फत
मार्च 2021 मध्ये घेण्यात आलेल्या
शासकिय GCC-TBC काॅम्प्युटर टायपिंग स्पिड परीक्षेचा
निकाल नुकताच ऑनलाईन जाहिर झाला.
त्यामध्ये आमचे
"शासनमान्य भक्ती काॅम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट, अकलुज" या संस्थेतील विद्यार्थ्यांनी
उज्ज्वल यश संपादन केले.
सदर परीक्षेचे प्रमाणपत्र शासकिय तसेच निमशासकिय
खात्यांमध्ये लिपिक (क्लार्क) पदांसाठी अनिवार्य असते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन.

भक्ती टाईपरायटिंग अँड कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्नभक्ती कॉम्प्युटर टा...
27/03/2021

भक्ती टाईपरायटिंग अँड कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज या शासनमान्य संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरमध्ये 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचा प्रारंभ अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर चे प्रा. जावेद शेख, आतापर्यंत 36 वेळा रक्तदान केलेले श्री. किशोर घोडके, रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्ष डॉ. बाहुबली दोशी, कायदेतज्ञ भारत गोरवे, रक्तदाते विद्यार्थी आदेश टिळेकर यांच्या शुभहस्ते श्री गणेश प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाला.
प्राध्यापक जावेद शेख यांनी सध्याच्या कोविड परिस्थितीत गरजू रुग्णांसाठी रक्तदानाची नितांत गरज असल्याचे लक्षात घेऊन भक्ति कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज या संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबवीला असल्याचे सांगत या संस्थेतील 1995-96 सालचा प्रथम विद्यार्थी या नात्याने माझ्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन केले याचा मला मोठा अभिमान वाटत असल्याचे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

श्री.किशोर घोडके यांनी या शिबिरात 37 व्या वेळा रक्तदान करत गरजू रुग्णाला तातडीने जर रक्त उपलब्ध झाले तर त्याचा प्राण वाचू शकतो, रक्तदान ही एक चळवळ बनून रक्तदानासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीने किमान वर्षातून दोन वेळेस का होईना रक्तदान केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
रोटरी क्लब, अकलूज चे अध्यक्ष डॉक्टर बाहुबली दोशी यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत रक्तदात्यांच्या मनात रक्तदाना बाबत असणारी भीती/अंधश्रद्धा चे निराकरण करत रक्तदाता व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो असे सांगत तसेच बहुतांशी महिलांच्या बाबतीत हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने त्या रक्तदानासाठी सक्षम नसल्याचे सांगत हिमोग्लोबीन विषयी जागृकता निर्माण केली.
कायदेतज्ञ भारत गोरवे यांनी भक्ति कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलुज ह्या संस्थेने विद्यार्थ्यांना टायपिंगचे-कॉम्प्युटरचे अद्यावत प्रशिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, विविध व्याख्याने, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, रक्तदान शिबिर अशा माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्याचे सांगत संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ, नितीन दुरणे सर यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
आदेश टिळेकर, किरण भगत, शिवाजी बागव, गणेश जाधव, शैलेश रेळेकर, पांडुरंग पवार, किशोर घोडके, आशीर्वाद सूर्यवंशी, शाहरुख शेख, अनिकेत गोंदकर, संतोष मुळे, सलीम बागवान, तुषार वाघमोडे, परितोष अधटराव, आकाश महादार, वैभव जामदार, नवनाथ गेजगे, गोविंद जाधव, मंगेश पवार, स्वप्नील साठे, प्रा संदीप कांबळे, हनुमंत घोडके, अस्लम मुजावर, अमोल लोखंडे आणि स्नेहल उरणे यांनी रक्तदान करत या सामाजिक कार्यात हातभार लावला.

21/03/2021

आपल्या *भक्ती टाईपरायटिंग इन्स्टीट्यूट, अकलूज*
आणि
*भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, अकलूज* या
*संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त*
आयोजित *🩸रक्तदान शिबिर🩸*
👇
आज रविवार *दिनांक 21 मार्च* रोजी
*सकाळी 10* ते *दुपारी 2* या वेळेत *शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, गणेश नगर-अकलूज, (टेलिफोन टॉवर जवळ)* येथे *आयोजित केलेल्या*
*🩸रक्तदान शिबिरास
*इच्छुक रक्तदात्यांनी तसेच आपले मित्र परिवार जर इच्छुक असतील तर त्यांना देखील सोबत घेऊन रक्तदान करून या पवित्र सामाजिक कार्यास हातभार लावावा* ही विनंती.

🩸 *रक्तदान शिबिराचे उद्घाटक :-*🩸
संस्थेचे प्रथम विद्यार्थी
*मा.प्रा. जावेद शेख*
(राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालय इंदापूर)
तसेच
*36 वेळा रक्तदान केलेले*🩸
*मा. श्री.किशोर घोडके*

🩸रक्तदान शिबिर👇
*स्थळ :-
शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, टेलिफोन टॉवर जवळ,
गणेश नगर-अकलूज,
*वार :- *रविवार*
*दिनांक :- *21 मार्च*
*वेळ :- *सकाळी 10 ते दुपारी 2* पर्यंत

*आपले विनीत :-
प्राचार्य गजानन ज्ञानेश्वर जवंजाळ
नितीन अनंतराव दुरणे सर
ओंकार तुकाराम गोंदकर सर
*भक्ती टाईपरायटिंग इन्स्टीट्यूट, अकलूज*
*भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकलूज*
मो.9423327903
7840993151

नमस्कारप्रवेश.. प्रवेश..प्रवेश चालू..आमचेशासनमान्य*भक्ती टाईपरायटिंग इन्स्टिट्युट, अकलुज*आणि*भक्ती काॅम्प्युटर टायपिंग इ...
16/02/2021

नमस्कार
प्रवेश.. प्रवेश..प्रवेश चालू..
आमचे
शासनमान्य
*भक्ती टाईपरायटिंग इन्स्टिट्युट, अकलुज*
आणि
*भक्ती काॅम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट, अकलुज*
या संस्थेत
जुन-जुलै 2020 मध्ये हाेणार्या शासकिय मराठी,इंग्रजी,हिंदी या विषयांच्या
काॅम्युटर टायपिंग 30 व 40 w.p.m. स्पिड परीक्षेसाठी प्रवेश सुरु आहेत.
तरी
शासकीय-निमशासकीय कार्यालयातील कोणत्याही पदासाठी, नोकरीसाठी उपयुक्तच नव्हे तर अनिवार्य असा कंप्यूटर टायपिंग कोर्स
:-
*शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा*
:-
GCC-TBC : Government Certificate in Computer Typing Basic Course
:-
परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फ़त शासकीय प्रमाणपत्र.
:-
GCC-TBC इंग्रजी, मराठी, हिंदी
३०, ४० श. प्र. मि.
:-
*वैशिष्ट्ये:*
१. कंप्यूटर टायपिंग बिनचुक व गतिसह शिकण्याची कला
:-
२. हा कोर्स सुरु करण्याचा शासनाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना टायपिंग व कंप्यूटरचे अद्ययावत प्रशिक्षण देऊन शासकीय सेवेत दर्जेदार कर्मचारी यावेत व त्यांचे कामकाज अधिक गतीने आणि पेपरलेस व्हावे असा आहे.
:-
३. इच्छुकांनी तात्काळ प्रवेश घेवून आपले शासकीय नोकरीचे स्वप्न पूर्ण करावे.
:-
प्रवेश फ़क्त शासनमान्य संगणक टायपिंग इंस्टिट्यूटचे
ई-प्रमाणपत्र पाहूनच घ्यावा व आपली होणारी फसवणूक टाळावी.
:-
भाजी मंडई अकलुज येथील आमचे 24 वर्षांची उज्वल परंपरा असलेले इन्स्टिट्युट आता नविन प्रशस्त जागेत.
संपर्क :-
*भक्ती टाईपरायटींग इन्टिट्युट, अकलुज* अाणि
*भक्ती काॅम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युट अकलुज*
नविन एस.टी.स्टँड जवळ, पु.ना.गाडगिळ ज्वेलर्स समाेर,
धनश्री काॅम्प्लेक्स, फ्रेंड्स डेकोरेटिव्ह चे वर, पहिला मजला, गाळा नं.13 व 14, अकलुज
:-
प्राचार्य
गजानन ज्ञानेश्वर जवंजाळ
माे. 9423327903

Address

NEAR NEW S. T. STAND, OPP. P. N. G. JWELLERS, DHANASHREE COMPLEX, FIRST FLOOR, SHOP NO. 13&14, A/P. AKLUJ
Akluj
413101

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm

Telephone

9423327903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhakti Typing & Computer Institute Govt.recognised posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category