CSVJ

CSVJ Shri Chatrapati Shivaji Vidyalaya Jawala.

14/12/2016

*तु खरच खुप खास आहेस..*
डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील, तेव्हा कळेल..
तु खुप खास आहेस...
आयुष्य म्हणजे आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी करावा लागणारा प्रवास आहे..
मग प्रवासात कधी दरी,
कधी पर्वत..
कधी वादळ,
तर कधी वाळवंट आहे..
कधी ऊन, तर कधी मुसळधार पाऊस आहे..
कधी गालिचे, तर कधी काट्यांची फौज आहे..
पण नजर लक्ष्यावर असेल,
तर प्रवास हा एक मौज आहे..!
अशा असंख्य लक्ष्यांची तुझी आस आहे..
डोळे मिटुन जेव्हा स्वतःला शोधशील..
तेव्हा कळेल,....
तु खरंच खुप खास आहेस..
वेदनांचे स्वतःचे एक महत्त्व आहे..
त्या सहन केल्यास तरच
तुझ एक ’अस्तित्त्व’ आहे..
पण जर हार मानुनि गेलीस/गेलास
तर मात्र पराभवाचे प्रभुत्त्व आहे..
प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर,
कधी शुभेच्छा,
तर कधी शिव्या-शाप आहे..
दुर्लक्ष केलस तर कळेल, तुला तर तुझ्या स्वप्नांचाच इतका व्याप आहे..!
काहीही झाले तरी डगमगु नकोस, तुझ्यात प्रचंड साहस आहे..
डोळे मिटुन स्वतःला शोधशील तर कळेल..
तु खरच खुप खास आहेस..

18/07/2016

निर्भया घडले त्यानंतर सरकार खाडकन जागे झाले ,
आणि जन मताच्या रेटयापुढे कायद्यात बदल करण्यात
आले .अल्पवयीन मुलाचे वय ठरवण्यात आले ,स्त्रियांच्या
सुरक्षतेबाबत ठोस पाउल उचलले गेले .
इतके करूनही बलात्काराच्या घटना कमी झाल्या नाहीत.
कारण सरकारने कायदे करताना इथल्या मानसिकतेचा
कितपत विचार केलाय हा प्रश्नच आहे .
पुन्हा अहमदनगर मध्ये निर्भया पेक्षा भयंकर घटना घडली
पण त्याचे पडसाद अजून तीव्रतेने उमटले नाहीत .मानवी
जगण्यावर काळिमा फासण्याऱ्या हि घटना आहे,अत्यंत
क्रूररीत्या भारत मातेची अब्रू वेशीवर टांगण्यात आली.
तरी अजून मेणबत्या संस्कृतिवाले आणि समानतेचा
पुरस्कार करणारे फोर्थ कॉलम वाले दखल घेत नाही
आहेत .पण आपण माणूस म्हणून त्या निर्भयाला न्याय
मिळावा ,आरोपींना मरेपर्यंत न्यायालयाने फाशी द्यावी
व अशा घटना पुढे होऊ नये याकरिता आपण पुढे येणे
गरजेचे आहे .
यासाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्याल
ा,स्थानिक लोक प्रतिनिधींना निवेदने ,मुख्यमंत्र्यांना-
गृहमंत्र्यांना पत्रे लिहून मेसेज पाठवून त्यांना या घटनेकडे
लक्ष देऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेफक्त फेसबुकवर निषेध नोंदवून या घटनेला न्याय मिळवून
देता येणार नाही .
आणि हो जाती धर्मावर भांडणं करायला खूप मुद्दे आहेत
पण इथे एक माणूस म्हणून न्याय द्यायला एकत्र या .

02/03/2016

बाजारू जगात पोरांची स्वप्नं आईबापच पाहतात. पोरांनी कसं
जगावं हे ठरवतात. हे वाईट आहे. खरं तर पोरांना स्वतःच्या
जगण्याची स्वप्नं स्वतःलाच पाहू द्यावीत. त्या स्वप्नांमध्ये
आईबापांनी साथीदार म्हणून सामील व्हावं, पण अतिरिक्त
ढवळाढवळ करू नये. पोरं स्वतः पाहिलेल्या स्वप्नांची ओझी
सहज उचलतात, कारण ती त्यांच्या स्वतःच्या मालकीची
असतात. आईबापांनी पाहिलेल्या स्वप्नांची ओझी मात्र पोरांना
जड होतात, कारण ते त्यांच्यावर बाहेरून लादलेलं ओझं असतं,
ते उसनं किंवा परकंच ठरतं. स्वप्न ही व्यक्तिगत मेंदूची
मालमत्ता असते. आपल्या मेंदूची स्वतःची मालमत्ता आणि
दुसऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेचं आपल्या मेंदूवर लादलेलं ओझं
यात फरक असतो. आईबापांनी मुलांचं मैतर जरूर व्हावं, पण
मालक होऊ नये. आजच्या भांडवली जगात आईबाप मालक
होण्याची चूक करतात. मला वाटतं, पोरांना त्यांच्या स्वतःच्या
मेंदूच्या मालकीचं जगू द्यावं.

25/12/2013

May your life be colorful
magnificent,shimmering and Joyful, As
the magic of Christmas spreads on you
Merry Christmas to all

20/12/2013
Congratulations to olll........
18/12/2013

Congratulations to olll........

18/12/2013

I try to hold on, on to everything. sweet memories, but that was yesterday.....................

Address

Ahmednagar
413201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSVJ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category