Shri Sai Computers Jamkhed

Shri Sai Computers Jamkhed Computer Institute

29/09/2017
31/05/2017

*इंजीनियरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या 'मराठा' विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना...*
इंजीनियरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की, TFWS (Tution Fee Waiver Scheme) अंतर्गत प्रत्येक इंजिनियरिंग कॉलेजला प्रत्येक बॅचसाठी DTE (Director of Techinical Education) नियमानुसार 5% जागा राखीव असतात.
TFWS scheme अंतर्गत विद्यार्थ्यांना कॉलेजची केवळ डेव्हलपमेंट फी भरावी लागते,कॉलेजची tution फी पुर्णपणे माफ होते.
(उदा Csmss engg clg auranganad ची मराठा विद्यार्थ्यांसाठी फी 68000/- आहे त्यात tution fee 61000/- आहे, TFWS अंतर्गत एडमिशन घेणाऱ्यासाठी इथे केवळ 7000/- वार्षिक फी लागते प्रत्येक कॉलेजला 10000/- पेक्षा कमीच फी लागते)
# scheme साठी वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी लागते, त्यासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक उत्पन्न (Annual Income) प्रमाणपत्र लागते.
**TFWS scheme अंतर्गत एडमिशन घेतल्यानंतर शासनाची चालू असलेली scholarship मिळत नाही, त्यामुळे OBC/SC/ST/NT विद्यार्थी याचा लाभ घेत नाहीत. मराठा विद्यार्थ्यांनी या scheme चा पुरेपुर फायदा घ्यावा.
जो आपला मराठा बांधव विद्यार्थी/विद्यार्थिनी इच्छा असुनही इंजिनियरिंग करू शकत नाही, त्यांना खुप मोठा आधार होऊ शकतो.

08/01/2017

भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 18252 जागा
भारतीय रेल्वेमध्ये कमर्शिअल अप्रेंटिस (703 जागा), ट्रॅफिक अप्रेंटिस (1645 जागा), इन्क्वायरी कम रिजर्वेशन क्लर्क (127 जागा), गुडस् गार्ड (7591 जागा), ज्यु.अकाऊंटस असिस्टंट-कम-टायपिस्ट (1205 जागा), सिनीअर क्लर्क-कम-टायपिस्ट (869 जागा), असिस्टंट स्टेशन मास्टर (5942 जागा) ट्रॅफिक असिस्टंट (166 जागा) सिनीअर टाईम कीपर (4 जागा) अशा एकूण 18252 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

11/11/2016

बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या १०३९ जागा
बँक ऑफ बडोदामध्ये क्रेडीट ॲनॅलिस्ट (चार्टर्ड अकाऊंटंट्स) (४० जागा), फायनान्स / क्रेडीट (४४० जागा), ट्रेड फायनान्स (१०० जागा), ट्रेझरी – प्रोडक्ट सेल्स (२० जागा), ट्रेझरी-डिलर्स/ट्रेडर्स ((५ जागा), ट्रेझरी रिलेशनशिप मॅनेजर्स (फारेक्स/डेरीव्हेटीव्हस) (३ जागा), ट्रेझरी-इक्वटी ॲनेलिस्ट (१ जागा), रिस्क मॅनेजमेंट (१० जागा), अग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट - गोल्ड लोन (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट-वेअरहाऊस रिसीप्ट (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फुड अँड ॲग्रो प्रोसेसिंग (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – हाय टेक ॲग्री प्रोजेक्टस (१ जागा), ॲग्रीकल्चर प्रोडक्ट स्पेशालिस्ट – फार्म मॅकेनायझेशन (१ जागा), मार्केटींग (२०० जागा), प्लॅनींग (६८ जागा), इकोनॉमिस्टस (५ जागा), लॉ (१७ जागा), आयटी – सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट (५ जागा), आयटी – डाटा सायंटीस्ट (२ जागा), आयटी – सॉफ्टवेअर टेस्टींग (१ जागा), आयटी – डाटाबेस मॅनेजमेंट (२ जागा), आयटी – डाटा ॲनॅलिस्ट (९ जागा), आयटी सिक्युरिटी (सीआयएसए) (३ जागा), एचआरएम (४० जागा), सिक्युरिटी (३२ जागा), फायर (९ जागा), ईलेक्ट्रिकल इंजिनिअर्स (२ जागा), सिवील इंजिनिअर्स / आर्किटेक्टस (८ जागा), ऑफिशिअल लँग्वेज (हिंदी)(१२ जागा) अशा एकूण १०३९ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती http://www.bankofbaroda.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

08/11/2016

विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षकाच्या १८१ जागा
महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात विक्रीकर निरीक्षक-गट-ब (अराजपत्रित) संवर्गातील १८१ पदांची भरती करण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पूर्व परीक्षा रविवार, दि. २९ जानेवारी २०१७ रोजी होणार आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१६ अशी आहे. अधिक माहितीसाठी https://mahampsc.mahaonline.gov.in किंवा www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या १०९ जागामहाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथील आस्थापन...
08/11/2016

अर्थ व सांख्यिकी संचालनालयात विविध पदांच्या १०९ जागा
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई येथील आस्थापनेत संशोधन सहायक (१२), सांख्यिकी सहायक(४३), अन्वेषक (४२), लिपीक टंकलेखक (०९) अशा एकूण १०९ पदांची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख ०७ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०१६ अशी आहे. अधिक माहितीसाठी http://mahades.maharashtra.gov.in, http://www.maharojgar.gov.in, किंवा http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

08/11/2016

भारतीय रिजर्व बँकेत सहायक पदाच्या ६१० जागा
भारतीय रिजर्व बँकेत सहायक (६१० जागा) पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

04/11/2016

★★विक्रीकर निरीक्षक (sti)पूर्व परीक्षा-२०१६★★

एकूण पदे-१८१
परीक्षा दिनांक- २९ जानेवारी २०१७

अर्ज करण्याची मुदत- ३ नोव्हेंबर 2016 ते 23 नोव्हेंबर 2016

Address

Second Flower, Sole Patil Complex , Beed Road Corner Jamkhed
Ahmednagar
413201

Telephone

02421221344

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sai Computers Jamkhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category