11/11/2015
NESH
This Page is for the Alumni students of N.E.S.H. its night b4 its afternoon. december is here b4 its june. my gudness how the time has flewn.
school-days,i believe r the happiest in the whole span of human existence--- it is in school we make our 1st frnd,1st crush,compete 2 excel,hope 4 places in sports team,&learn our 1st lessons abt life
"recollecting memories of school days is away of holding onto the things u love, the things u r,the things u never want 2 lose"
SCHOOL DAYS.....
how did it get over so soon? why did it get over so soon?
11/11/2015
!! शाळेतले ते दिवस !!
अडगळीच्या खोलीमधलं दप्तर
आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||
प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||
या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||
रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||
पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर
तुमच्यासारखं स्वतःलाच
रागवून बघतो ||
इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा सवय
आता गेली आहे ||
चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||
दोन बोटं संस्कारांचा समास
तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||
योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||
तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||
04/03/2013
"काय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे..........................."
"काय दिवस होते ना ते शाळकरी वयाचे,
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे…,
सकाळ, दुपार, संध्याकाळ..वेगवेगळ्या तासांचे,
आनंद, कंटाळा, मस्ती अशा भाव आणि भावनांचे,
गणिताच्या पायाचे, कवितेच्या झुल्यांचे,
जीव-भौतिक-रसायनच्या इति-भूगोल-नाशाचे…. ,
टोपणनावांनी हाक मारून सगळ्यांना बोलवायचे,
दंगा-मस्ती करताना तहान-भूक विसरायचे,
तसे निरागस होते दिवस पण बिलंदरही बनायचे,
गृहपाठ नाही केला तर, “वही विसरलो” सांगायचे… ,
पाठीवरच्या धपाट्याने अपमानित व्हायचे,
“लहानपण देगा देवा”, अग्गदी खोटं वाटायचे,
चांगलं काही केलं तर करडे डोळे निवळायचे,
तीच पाठ, तोच हात.. अभिमान मिरवायचे…,
मधल्या सुट्टीचे खेळ, आधीच्या तासांना ठरवायचे,
रडीचा डाव खेळला तर कडकडून भांडायचे,
सुट्टी संपण्याआधी मात्र सगळं विसरून जायचे,
आपल्या डब्यांची बिनधास्त वाटावाटी करायचे… ,
आवडीच्या तासाला अगदी मनापासून रमायचे,
नाटकाच्या तालमींना सगळ्यांआधी पोचायचे,
मुलामुलींनी एकमेकांशी बोलणेही टाळायचे..पण
अर्ध्या कळत्या वयातले स्वप्नं रेशमी गुंफायचे…,
किती धन गोळा करतोय, तेव्हा नाही समजायचे,
अजून काय घेऊ शकू, तेही नाही उमगायचे,
पण खरंच… काय दिवस होते ना शाळकरी वयाचे?
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे…
पाखरांमागे धावताना फुलपाखरू होण्याचे…........................."
09/12/2012
एक अनोळखी ...
तरी पण का वाटतंय..
तुजे आणि माजे
नाते पूर्वीचे ते
किती ..
ऋणानुबंध जुळले छान ते किती...
ना नाव माहिती होते ...
ना गाव माहिती होते...
तरी पण का वाटतंय ..
भेटलो होतो आधी कधी..
कळलेच नाही तू
मला आवडलीस
कधी ..
समजलच नाही मी तुज
झालो कधी..
एक अनोळखी..
म्हणून सोडून जाऊ नको ...
प्रीत हि हृदयाची तोडू नको..
एक
अनोळखी..
म्हणून विश्वास सोडू नको..
आपले
नाते विसरू नको..
06/12/2012
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Ahmednagar
Ahmednagar
414103