Adv M N Deshmukh College Rajur, Akole

Adv M N Deshmukh College Rajur, Akole Adv.M.N.Deshmukh College Rajur,Akole

*ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा संपन्न* राजुर: राजूर येथील ॲड. एम.एन.देशमुख कला, ...
16/04/2023

*ॲड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात राज्यस्तरीय वादविवाद व वक्तृत्व स्पर्धा संपन्न*
राजुर: राजूर येथील ॲड. एम.एन.देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात दि.५ व ६ एप्रिल रोजी कै.होनाजी तुकाराम कोंडार स्मृतीचषक वादविवाद व कै. डॉ. माधवराव दिगंबर उमराणी स्मृतीचषक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.या दोन्ही स्पर्धांचे फिरते स्मृती चषक अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे विद्यार्थी कु. महेश उशीर व अनिकेत डमाळे या संघाने जिंकले. तर वादविवाद स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रु.३००१) देखील याच महाविद्यालयातील विद्यार्थी कु .महेश उशीर याने तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून (रु.२५०१) अनिकेत डमाळे, व निलेश शिरसागर, अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले, यांना मिळाले. तृतीय क्रमांक पारितोषिक (रु.२००१), पवन खाडे, ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालय, राजुर, यांनी पटकाविले.तर वक्तृत्व स्पर्धेचे वैयक्तिक प्रथम क्रमांक(रू .३००१) चे पारितोषिक अनिकेत डमाळे,द्वितीय क्रमांक पारितोषिक (रू.२५०१) नितीन गागरे, तृतीय क्रमांक विभागून (रू.२५०१) महेश उशीर, आणि अक्षता वडावणीकर, यांना मिळाले अशी माहिती देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख यांनी दिली.पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ. किरणजी उमराणी आणि श्रीमती मंगलताई कोंडार यांचे हस्ते विजयी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याप्रसंगी डॉ.किरणजी उमराणी व कै. होनाजी कोंडार यांच्या स्नुषा मा.श्रीमती मंगलताई कोंडार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री.दीपक पाचपुते सर व डॉ.डी.के. गंधारे यांनी व वादविवाद स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. लक्ष्मण घायवट व प्रा. बी.एम.पवार काम केले. या कार्यक्रम प्रसंगी परिक्षक मा. दीपक पाचपुते यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना " स्पर्धेतील सहभागामुळे आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांची जाणीव होऊन सुधारणा करता येते. अपयशातूनच पुढे यशाची पायरी चढता येते "असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन वादविवाद व वक्तृत्व मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. पंढरीनाथ करंडे यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.अरुण सातपुते यांनी केले. या प्रसंगी डॉ. गिते, प्रा. परते, सर्व स्पर्धक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

13/04/2023
30/03/2023
*हार्दिक अभिनंदन !!!* पदव्युत्तर वाणिज्य ( M.Com.) या वर्गात यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे म...
06/09/2022

*हार्दिक अभिनंदन !!!* पदव्युत्तर वाणिज्य ( M.Com.) या वर्गात यश संपादन केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे महाविद्यालय व सत्यनिकेतन संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन. व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 👍🌹 🙏

03/03/2022

आदिवासी संस्कृती प्रदर्शन.....

*💥महादर्पण न्यूज💥**जामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन*👇👇👇 *http://mahadarpan.in/?p=3359*
07/02/2022

*💥महादर्पण न्यूज💥*

*जामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन*

👇👇👇

*http://mahadarpan.in/?p=3359*

*माजी विद्यार्थी संघ* ॲड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर मधील सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्य...
04/02/2022

*माजी विद्यार्थी संघ*

ॲड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर मधील सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच आपण नोंदणी प्रक्रिया पार पाडली असून त्याचे प्राथमिक नोंदणी प्रमाणपत्र सहाय्यक संस्था निबंधक अहमदनगर यांचेकडून आपणास प्राप्त झालेले आहे.
*माजी विद्यार्थी संघाचा विस्तार करण्यासाठी नवीन सदस्य जोडणी आपण सुरू केली आहे* .
सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी खाली दिलेली लिंक भरून आजच माजी विद्यार्थी संघाचं सदस्यत्व घ्यावं.

https://forms.gle/VzbTRLvZ9mgGW7Nn7

सर्व सभासद,
माजी विद्यार्थी संघ,
ॲड. एम. एन. देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर.

Adv. M. N. Deshmukh Arts, Science and Commerce College Rajur, Tal- Akole, Dist- Ahmednagar, 422604

*यिन (YIN) निवडणूक ***(सूचना)**  महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की मंगळवार *दिनांक २१/१२/२०२१* ...
19/12/2021

*यिन (YIN) निवडणूक ***(सूचना)** महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की मंगळवार *दिनांक २१/१२/२०२१* रोजी "दैनिक सकाळ" आयोजित निवडणूक होणार आहे या निवडणुकीत मतदान करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी *Young Inspirator Network* हे ॲप डाऊनलोड करावे. त्यात आपली प्रवेश पावती व महाविद्यालयाचे ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. आपल्या महाविद्यालयातून खालील ४ विद्यार्थी निवडणुकीस उभे राहिलेले आहेत
1 .श्रुती नवले
2. देशमुख अक्षय.
3. गवारी कांचन.
4. निखिल चोथवे.

15/12/2021

शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी स्कॉलरशिप फ्रॉम सुरू.
अंतिम मुदत 31 जानेवारी 2022.

*स्कॉलरशिप फ्रॉम कागदपत्रे*
१) आधार कार्ड ( मोबाईल नंबर अपडेट केलेला असावा)
२) मोबाईल नंबर, ई मेल.
३) बॅंक पासबुक.( आधार नंबर लिंक असावा.)
४) डोमासाईल.
५) जातीचा दाखला.
६) उत्पन्न दाखला( तहसिलदार)
७) ऍडमिशन पावती.
८) एसएससी/एचएससी/एफ वाय/एस वाय मार्क्स शिट.( मागील वर्षीचे रिझल्ट)
९) रेशनकार्ड.

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv M N Deshmukh College Rajur, Akole posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Adv M N Deshmukh College Rajur, Akole:

Shortcuts

Share

Category