Marathi Katta Germany e.V.

Marathi Katta Germany e.V.

Teilen

The objective of this page is to bring together all the people living in Germany who love our state of Maharashtra and language Marathi

We are a non-profit organization serving the Marathi /Maharashtrian community living in Germany for many years. Our mission is to promote cultural ties among people interested in Maharashtrian culture from various parts of the world. In last three years we have organized more than 30 events ... Marathi cinemas, music events, Diwali, Ganapati , meetings/interactions with some celebrities like so

10/05/2026

मातृदिनानिमित्त 🌸

Marathi Katta Germany कडून
सर्व मातांना मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️

या खास व्हिडिओतून विविध मातांच्या सुंदर अनुभवांना सलाम! ✨

Special Thanks,
Asmita Raje
Swati Rane
Shilpa Gadmane
Sampada Sapre
Kalpashree Kulkarni
Sheetal Bagul

01/05/2026

मराठी कट्टा जर्मनीच्या संपूर्ण परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻😊

आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि मराठीपणाचा अभिमान सदैव असाच वाढत राहो. 🚩

जय महाराष्ट्र! 🚩

Do follow our social media platforms:

Web :
www.marathikattagermany.com

FB page : https://www.facebook.com/marathikattagermany/

Instagram : https://www.instagram.com/marathikattagermany/

14/04/2026

Mrs. Pratibha Parkar is currently serving as Joint Secretary (Parliament & Coordination) at the Ministry of External Affairs, New Delhi. She previously served as the Ambassador of India to the Angola in Africa.

She had served as honorable Consul General of India in Frankfurt from 2017 to 2020.

Most importantly for us, she remains a cherished friend of our Marathi Katta Germany e.V. community . and Friends of India in Germany

Its always a Great pleasure to receive her wishes on 12th anniversary of Marathi Katta Germany e.V.

08/04/2026

पहिल्या युरोपीय मराठी एकांकिका स्पर्धेत मराठी कट्टा जर्मनी, अभिनय कल्लोळ या संघाचे घवघवीत यश!

४ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान युरोपातून एकूण १३ एकांकिका या स्पर्धेत सहभागी झाल्या. त्यात आपल्या “सोलमेट्स्” या एकांकिकेने एकूण ७ बक्षिसे पटकावली!

1. संगीत- तन्मय मेहेंदळे -सर्वोत्कृष्ट द्वितीय
2. नेपथ्य- शर्वरी मेहेंदळे, प्रगती जोशी आणि सचिन जोशी- सर्वोत्कृष्ट द्वितीय
3. प्रकाश योजना- तन्मय मेहेंदळे -सर्वोत्कृष्ट तृतीय
4. लेखन- तन्मय मेहेंदळे -सर्वोत्कृष्ट तृतीय
5. अभिनेत्री- ईशा इंगळे - सर्वोत्कृष्ट तृतीय
6. अभिनेता- Anendd Shukkla- सर्वोत्कृष्ट तृतीय
7. सांघिक -उत्तेजनार्थ

विशेष म्हणजे युरोपातून सादर झालेल्या एकूण १३ संघांपैकी ५ संघ तर फक्त जर्मनीतून सहभागी झाले होते.
त्यात केवळ आपल्याच संघाला प्रत्येक विभागात बक्षीस मिळाले!

या स्पर्धेतील काही सहस्पर्धक संघांनी सादर केलेल्या एकांकिका यापूर्वी व्यावसायिक स्तरावरही सादर केलेल्या होत्या. त्यामुळे स्पर्धेत एकप्रकारची चुरस होती आणि एकंदरीत एकांकिकांचा दर्जा खुपच उत्तम होता.

आपल्या स्पर्धेचं परिक्षण, १०० व्यावसायिक नाटकं दिग्दर्शित करण्याचा अनुभव पाठीशी असलेले श्री विजय केंकरे व श्री सचिन कंटक यांनी केले.

आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहो हीच प्रार्थना!

कळावे
टीम सोलमेट्स
मराठी कट्टा जर्मनी अभिनय कल्लोळ
६ एप्रिल २६

Www.marathikattagermany.com

01/04/2026

आपल्या कट्ट्याचा शुभचिंतक अक्षय महाशब्दे

01/04/2026

प्रख्यात संगीतकार , गायक आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्या कट्ट्याचे हितचिंतक श्रीधर फडके .

अशा चांगल्या माणसांना जर्मनीत त्यांच्या कार्यक्रमांमुळे आणि भारतात गेल्यावर मुंबई पुण्यामध्ये हक्काने भेटता येतं .. ह्यासाठी कट्ट्याचे आभार

01/04/2026

#एक तप

आपल्या लाडक्या मराठी कट्टा जर्मनीला 12 वर्ष पूर्ण झाली.
12 वर्ष म्हणजेच "एक तप" हा केवळ एक कालावधी नाही तर teamwork आणि विश्वासाचं प्रतीक आहे आणि आपण सगळे या सुंदर प्रवासाचा भाग आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप शुभेच्छा!!

प्रसिद्ध जादूगार आणि मराठी कट्ट्याचे शुभचिंतक जितेंद्र रघुवीर यांनीही कट्ट्याला त्यांच्या खास जादुई शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

❤️ पुढेही असेच जोडलेले राहूया!!!

Plz follow MKG :-

https://linktr.ee/marathikattagermany

28/03/2026

Dear Marathi Katta family and friends,
We’re planning another wonderful Switzerland trip together — just like our previously successful trips!
Limited seats (first come, first serve).
3 Days Trip to Switzerland
Switzerland
8th–10th May 2026
Attractions :-
Luzern
Mount Titlis
Lauterbrunnen
Meiringen
Interlaken
And more**
**For more details, please click on the following link and register.
*Keeping our past successful trips in mind, seats are expected to fill up quickly*
*Please confirm your participation at the earliest to secure your seat*.
Make an entry using Google link mentioned below :-
https://forms.gle/6HJGvZsKjfRT76mm9

22/03/2026

नमस्कार मंडळी ,
जर्मनीमधील विविध राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचं जोरदार वारं आहे . जर्मनीचो सोळा राज्यं , महानगरपालिका , नगरपालिका आणि ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एक चांगली बातमी आली आहे .
जर्मनीची आर्थिक राजधानी असणाऱ्या फ्रँकफर्ट ह्या महानगरजवळील एक ४०,००० लोकसंख्येचं एक छोटं शहर म्हणजे लांगेन.

‘’Langen’’ शहराच्या संसदेच्या निवडणुकीमध्ये ‘’फॉरेन ऍडवायजरी काउन्सिलच्या नगरसेवकपदी ’’ पदी आपल्या मराठी कट्टा जर्मनीचा मित्र सागर तिदमे प्रचंड मताधिक्क्याने निवडून आला आहे. त्याबद्दल त्याचं मराठी कट्टा जर्मनीच्या सर्व मित्रमंडळीतर्फे खूप खूप अभिनंदन . ह्यानिमित्त जर्मनीच्या आपल्या भागातून किंबहुना जर्मनीमधून पहिल्यांदाच मराठी माणूस जर्मनीच्या शासनव्यवस्थेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाला आहे . सागर हा आपल्या मराठी कट्टा जर्मनीचा धडाडीचा कार्यकर्ता तर आहेच पण तो आणि त्याची सुविद्य पत्नी . अर्चना तिदमे हे दोघंही कोणताही गाजावाजा न करता मराठी कट्टा आणि लांगेन ह्या शहरातील मित्रमंडळींसाठी निस्वार्थीपणे झटत असतात .

जर्मनीमध्ये वाढत असणाऱ्या मूळच्या परदेशी नागरिकांना अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये सामील होण्याची संधी मिळते .

मूळचा नाशिककर असणाऱ्या सागरने स्वतः एक संशोधक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि आज तो एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतो .

अतिशय नम्र आणि मृदू स्वभावाचा सागर आपल्या विजयाचे संपूर्ण श्रेय लांगेन ह्या शहरातील सर्व मित्रमंडळी आणि मतदार ह्यांना देतो.

मराठी कट्टा जर्मनीतर्फे सागरला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

धन्यवाद

अजित रानडे
मराठी कट्टा जर्मनी
Www.marathikattagermany.com

MKG Kids Goan Dance Performance at VHP Diwali 2025 27/10/2025

🌸 Marathi Katta School of Dance – Goan Dance Performance at VHP Deepavali Mahotsav 2025! 🌸

This lively performance celebrated Goa’s joyful spirit — full of rhythm, humour, and energy! 💃✨
Our talented young dancers brought the vibrant tunes of Goa to life with colourful movements and cheerful expressions, capturing the fun and festive charm of Goan culture. 🌺🎶

Performers:
1. Devavrat Katkar
2. Aarna Korrapati
3. Divi Sawale
4. Advait Joshi
5. Aarya Mantri
6. Parth Fauzdar
7. Khushi Dhake
8. Parnika Bhattad
9. Avani Pejgude
10. Advika Joshi
11. Netra Zimur
12. Ira Joshi

A big round of applause to our little stars for lighting up the stage with their energy and smiles! 🌟👏

Vishva Hindu Parishad -VHP

MKG Kids Goan Dance Performance at VHP Diwali 2025 Marathi katta school of dance kids performed Goan Dance at VHP Deepavali Mahotsav 2025 🌸This lively performance celebrates Goa’s joyful spirit. The performa...

Wollen Sie Ihr Schule/Universität zum Top-Schule/Universität in Frankfurt machen?

Klicken Sie hier, um Ihren Gesponserten Eintrag zu erhalten.

Lage

Adresse


Contact Ajit Ranade For Details
Frankfurt
60528