Creative Z.P.SawaiMukti School Dhule

Creative Z.P.SawaiMukti School Dhule

Partager

उपक्रमशील शाळा सवाई मुकटी

31/08/2024

#शाळा शुभारंभ # (इयत्ता:पहिली)
जि.प.शाळा सवाई मुकटी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे

28/06/2024
Photos from Creative Z.P.SawaiMukti School Dhule's post 22/06/2024

*मंथन व भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षेत सवाई मुकटी येथील विद्यार्थ्यांची केंद्र व जिल्हास्तरावर निवड...*

शिंदखेडा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी डॉ. सी.के.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. शाळा सवाई मुकटी येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकासासंदर्भात शाळेत विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात. सध्याचे युग हे स्पर्धात्मक आहे भविष्यात या आधुनिक व स्पर्धात्मक युगात टिकून राहायचे असेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात स्पर्धे शिवाय पर्याय नाही हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी बालपणापासूनच त्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण होऊन व भविष्यात अवघड वाटणाऱ्या या परीक्षांची सवय व्हावी. म्हणून वर्गशिक्षकांनी इ:1लीपासूनच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत सहभागी करून त्यांचा सराव नियमित स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला.

शैक्षणिक वर्ष सन: 2023-24 मंथन व एज्यूमिट अकॅडमी महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च (BTS) परीक्षेत प्रथमच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपापल्या वर्गशिक्षकांनी शालेय अभ्यासक्रम व स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम यांची सांगड घालून मुलांचा विविध सराव चाचण्या घेऊन सातत्याने अभ्यास करून घेतला त्याचेच फळ म्हणून नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात पहिलीच्या वर्गात शिकणारा *कुणाल विनोद सोमवंशी* हा विद्यार्थी मंथन परीक्षेत *खलाणे केंद्रातून पहिला* तर *भारत टॅलेंट सर्च (BTS)परीक्षेत राज्यातून 8व्या रँकने व जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत द्वितीय* क्रमांकाने घवघवीत यश मिळवून शाळेच्या नावलौकिकास मानाचा तुरा रोवला आहे. तसेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे. मुलांच्या या यशाबद्दल शाळेसाठी नेहमीच कार्यतत्पर असणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेशदादा पाटील,सरपंच नंदकिशोर देसले,मनोज पाटील, विस्तार अधिकारी. डी एस सोनवणे,केंद्रप्रमुख. संतोष चौधरी मुख्याध्यापिका श्रीमती. भारती क्षीरसागर मॅडम, शाळेतील शिक्षक युवराज पवार,अजय चव्हाण व पालकांनी कुणालचे विशेष कौतुक केले व शाळेतील इतर मुलांवर कौतुकाचा वर्षाव करून भरभरून शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेतील वर्गशिक्षिका शितल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

Photos from Creative Z.P.SawaiMukti School Dhule's post 20/06/2024
08/06/2024

My school

Photos from Creative Z.P.SawaiMukti School Dhule's post 25/02/2024

जि.प.शाळा सवाई मुकटी येथे १९ फेब्रुवारी शिवजयंती मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवजयंतीच्या निमित्ताने शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शिवरायांची अत्यंत सुंदर व सुबक अशी मूर्ती भेट दिली.
गावातील सरपंच आदरणीय. नंदकुमार भाऊ देसले, उपसरपंच मनोजदादा पाटील यांनी प्रतिमापूजन केले. शाळेतील विद्यार्थिनींनी शिवरायांच्या जीवनावर आधारित भाषणे व नृत्य सादर करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय चव्हाण सर यांनी केले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.भारती क्षिरसागर मॅडम आणि केले तर आभार प्रदर्शन श्रीमती शितल चव्हाण यांनी मांनले.

Vous voulez que votre école soit école la plus cotée à Democratic Republic of the ?

Cliquez ici pour réclamer votre Listage Commercial.

Type

Site Web

Adresse


Democratic Republic Of The