08/03/2025
जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जाफराबाद व जिजाऊ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल जाफराबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने 8 मार्च 20525 रोजी महिला दिन उत्साहात सादर करण्यात आला
जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल सावरखेडा रोड जाफराबाद येथे महिला मेळावा उत्साहात साजरा झाला. 8 मार्च 'जागतिक महिला दिनानिमित्त' शाळेत 'माता-पालक मेळावा' आयोजित करण्यात आला यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. उखाने, नृत्य स्पर्धा, रस्सीखेच,स्मार्ट मम्मी, फुग्यांचा खेळ,प्लास्टिक ग्लास खेळ, जिलेबी गेम, योगायोग स्पर्धा, नृत्य स्पर्धा अश्या विविध स्पर्धेत २०० माता-पालकांनी सहभाग घेतला होता. प्रमुख पाहुणे म्हणून सौ देवकी संतोष पाटील (आरोग्य सल्लागार)यांना आमंत्रित केले होते. त्यांनी 'मुले घडवताना' या विषयावर मार्गदर्शन केले तसेच महिलांना आरोग्य विषयक सल्ला दिला.