Australian Marathi Vidyalaya - AMV

Australian Marathi Vidyalaya - AMV AMV is an educational institution and a non-profit organisation with a strong belief in Language It has been operational since February 2008.

‘Australian Marathi Vidyalaya'(AMV) is a community language school and ‘Marathi Association Sydney Incorporated’ (MASI) is AMV’s proud sponsor.AMV is an educational institutionand a non-profit organization. With a strong belief in ‘Language keeps you in touch with your culture’, AMV is committed to provide every possible opportunity to the young Marathi generation to be familiar and literate in th

eir own mother tongue-Marathi. In 2013, we have about 71 students as of end of term 2. AMV is run completely on voluntary basis. The funds are managed through the fees collected from the students, financial support from MASI and grant received under NSW Department of Education and Training – Community Language Program. Teachers are paid honorarium for their services. AMV is operated under the rules and regulations specified by NSW Department of Education and Training – Community Language Program. The NSW Department of Education and Training provides financial grants to organizations to promote languages education in the community sector through the NSW Community Languages Program .The aim of this program is to assist communities to maintain and develop their heritage languages. We are a member of the umbrella organisation for community languages in the lIIawarra – ‘Association of lIIawarra Community Languages Schools Incorporated’ (AICLS).

27/02/2026

“माझा मराठाचि बोलू कौतुके,
परी अमृतातेही पैजा जिंके.” — संत ज्ञानेश्वर

मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचे माध्यम नाही; मराठी म्हणजे आपल्या संस्कृतीचा शिरपेच , इतिहासाची शिदोरी आणि अस्मितेचा श्वास आहे. संतपरंपरेने ज्ञानाची अमृतवर्षा करत ही भाषा जनमानसात रुजवली. कवी, लेखक, नाटककार आणि लोककलावंतांनी तिच्या अभिव्यक्तीला वैभव दिले.

ऑस्ट्रेलियासारख्या दूर देशात राहूनही आपल्या मातृभाषेचा दिवा अखंड तेवत ठेवण्याचा प्रयत्न आपण ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या माध्यमातून करत आहोत. हजारो विद्यार्थ्यांनी येथे मराठी शिकली, बोलली, अनुभवली — आणि आपल्या मुळांशी नातं घट्ट केलं.
भाषा शिकवणं म्हणजे केवळ शब्द शिकवणं नाही तर संस्कार, परंपरा आणि आत्मभान पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणं होय.
मराठी भाषा दिनानिमित्त आपण सर्वांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगूया, तिचा वापर वाढवूया आणि पुढील पिढीपर्यंत ती प्रेमाने पोहोचवूया
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय मराठी! जय महाराष्ट्र!

जैसी दीपांमाझि दिवटी। कां तिथींमाझि पूर्णिमा गोमटी।
तैसी भाषांमध्ये मर्‍हाटी । सर्वोत्तम।।१।।
जैसी सरितांमध्ये गोदावरी। कां पर्वतांमधे रत्नगिरी।
तैसी भाषांमध्ये साजरी। मर्‍हाटी पै।।२।।
हरळांमध्ये रत्नकिळा। कां पुष्पांमध्ये कमळ।
तैसी भाषांमध्ये सोज्वळ। शोभिवंत दिसे।।३।।
दुर्गावरि शोभे चरी। कां मुक्ताफळे शोभती हारी।
तैसी शोभे भाषांमाझारी मर्‍हाटी पैं।।४।।
तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी।
भाषांमध्ये तैशी। मर्‍हाटी शोभिवंत।।५।।
परिमळांमध्ये कस्तुरी। कां अंबरामध्ये शंबरारी।
तैसी मर्‍हाटी सुंदरी। भाषांमध्ये।।६।।

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय, वेस्टमिड शाखा — शैक्षणिक सहल २०२५ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व ...
26/10/2025

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय, वेस्टमिड शाखा — शैक्षणिक सहल २०२५

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सर्व शाखांसाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात आले. काही आठवड्यांपूर्वी Macquarie Fields शाखेची सहल पार पडली होती. त्यानंतर वेस्टमिड शाखेची शैक्षणिक सहल शनिवारी, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. यावर्षीची सहल University of Wollongong Science Space (UOW Science Space) या ठिकाणी घेण्यात आली होती.

सकाळी नऊ वाजता शाळेतून बस सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालकांसह विज्ञानाच्या अद्भुत जगात सफरीसाठी निघाली. प्रवासभर मुलांनी खेळ, गाणी आणि गप्पांमधून उत्साह टिकवून ठेवला. काही तासांत बस Wollongong येथील Science Space येथे पोहोचली.

मुलांना विज्ञानातील गमतीजमती आणि प्रयोग पाहायला नेहमीच आवडतात; पण या ठिकाणी त्यांनी स्वतः प्रयोग करून पाहण्याचाही आनंद घेतला. विविध वयोगटांसाठी तयार केलेले प्रयोग, तसेच इंटरॅक्टिव्ह ऍक्टिव्हिटी आणि विज्ञानावर आधारित रोचक शो पाहून सर्व विद्यार्थी भारावून गेले.

लहान मुलांइतकाच उत्साह शिक्षक आणि सहलीत सहभागी झालेल्या पालकांमध्येही होता. हसत खेळत विज्ञान शिकत आणि स्वतः प्रयोग करत शिकण्याचा हा दिवस अविस्मरणीय ठरला. Science Space मध्ये मराठी भाषेतील मुलांचा किलबिलाट आणि आनंदी हास्य ऐकून असे वाटत होते की — इथेच आपली मराठी शाळा भरली आहे!

सहल संपल्यानंतर सर्वांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि नंतर बस पुन्हा शाळेच्या दिशेने रवाना झाली. दिवसभराच्या सहलीनंतरही विद्यार्थ्यांचा उत्साह तसाच ओसंडून वाहत होता — कोणालाच थकवा जाणवत नव्हता!

आता शैक्षणिक वर्षाचा शेवट जवळ येत असताना, सुट्ट्यांच्या आधी आयोजित केलेल्या या सहलीने सर्वांच्या मनात आनंद आणि ऊर्जा भरली. या सहलीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व शिक्षकवर्ग, पालकवर्ग आणि अॅडमिन टीमचे मनःपूर्वक आभार.

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
✨ शुभ दिवाळी! शुभ नवीन वर्ष! ✨

आमच्या शाळेतील आनंदी दिवाळी सण भारतीय संस्कृतीप्रेमी आमच्या शिक्षकांच्या पुढाकाराने, दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑस्ट्रेलियन म...
25/10/2025

आमच्या शाळेतील आनंदी दिवाळी सण

भारतीय संस्कृतीप्रेमी आमच्या शिक्षकांच्या पुढाकाराने, दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या सर्व शाळांमध्ये दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्व विद्यार्थी पारंपारिक भारतीय पोशाखात सजून आले होते. पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. मधल्या सुट्टीनंतर आयोजित या दिवाळी कार्यक्रमात सर्व वर्गांनी आपापली गाणी, कविता, गोष्टी आणि दिवाळीच्या कथा सादर केल्या. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केलेली तयारी कार्यक्रमातून स्पष्ट जाणवत होती.

मुलांच्या सादरीकरणाला सर्व उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर दिवाळीनिमित्त पारंपारिक फराळाचा आस्वाद घेण्यात आला — लाडू, करंज्या, चिरोटे, शंकरपाळे, चिवडा अशा विविध स्वादिष्ट पदार्थांचा सर्वांनी मनसोक्त आनंद घेतला.

शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून सुंदर भेटवस्तू देण्यात आल्या. आमचे विद्यार्थी दरवर्षी या सणाची आतुरतेने वाट पाहतात आणि मनापासून त्यात सहभागी होतात.

तर अशी झाली आमच्या शाळेची दिवाळी!
तुमची दिवाळी कशी झाली ते आम्हाला जरूर सांगा.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाची वार्षिक शैक्षणिक सहलऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयात दिनांक १२ ऑक्टोबर २०२५, रविवारी वार्षिक श...
20/10/2025

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाची वार्षिक शैक्षणिक सहल

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयात दिनांक १२ ऑक्टोबर २०२५, रविवारी वार्षिक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस दरवर्षीप्रमाणे यंदाही एक दिवसाची सहल मुलांसाठी ठेवण्यात आली. वर्षभर अभ्यास केल्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मित्रमैत्रिणी एकत्र येऊन आनंद साजरा करावा, नवे ठिकाण पाहावे आणि काहीतरी नवीन शिकून पुढील वर्षासाठी उत्साहाने तयारी करावी—हीच या सहलीमागची संकल्पना होती.

यंदाच्या सहलीसाठी निवडलेले ठिकाण होते Wollongong येथील University of Wollongong चे Science Space केंद्र. हे ठिकाण खूपच आकर्षक आणि शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध असल्यामुळे मुलांना खूप आवडले.

सकाळी Macquarie Fields येथून निघालेल्या सहलीच्या बसेस मुलांच्या मजा, मस्ती, गप्पा, गाणी अशा उत्साहाने भरलेल्या होत्या. दिवसभर Science Space मधील विविध प्रात्यक्षिके, प्रयोग आणि विज्ञानाशी निगडीत उपक्रम मुलांनी अनुभवले. मित्रमैत्रिणींमध्ये गप्पा, शिक्षकांसोबतचा सहवास आणि दमल्यानंतरचा मिळालेला खाऊ या सगळ्यामुळे दिवस अविस्मरणीय ठरला.

सायंकाळी चार वाजता मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तसाच कायम ठेवत सहलीच्या बसेस शाळेत परतल्या.

ही सहल यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षकवर्ग, पालकवर्ग आणि व्यवस्थापक टीमचे मनःपूर्वक आभार.

🌸 सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸आमच्या ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या Macquarie Fields शाखेत रविवारी शाळेच...
27/08/2025

🌸 सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
आमच्या ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या Macquarie Fields शाखेत रविवारी शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच मध्यंतरानंतर एक आगळीवेगळी उपक्रम राबविण्यात आला – गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा.
विद्यार्थी आपल्या पालकांसह उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाले. गणेशमूर्ती बनवण्यासाठी लागणारी शाडूची माती शाळेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती. शिक्षकांनी मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती घडवल्या.
या कार्यशाळेमुळे भारताबाहेर असतानाही विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाले. शिक्षक व पालकांना त्यांच्या लहानपणी भारतात साजऱ्या झालेल्या गणेशोत्सवाच्या गोड आठवणी जागवल्या, तर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने मूर्ती घडवण्याचा आनंद अनुभवला.
एकूण जवळजवळ ५० गणेश मूर्ती घडवल्या गेल्या असून आज त्या प्रत्येकाच्या घरी उत्साहात स्थापना होणार आहे.
हा सुंदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व शिक्षक, पालक आणि शाळेच्या Admin टीमचे मनःपूर्वक आभार!
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय – Westmead शाखाआज आमच्या Westmead शाखेमध्ये एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळाला. विशेष प्रसंग ह...
23/08/2025

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय – Westmead शाखा
आज आमच्या Westmead शाखेमध्ये एक वेगळाच उत्साह अनुभवायला मिळाला. विशेष प्रसंग होता “गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा”.
गणेशोत्सव जवळ येतो तसा मुलांमध्ये बाप्पाची मूर्ती स्वतः बनविण्याची ओढ वाढते. याच उत्साहातून आज सुमारे ५० विद्यार्थ्यांनी पालकांसह मातीची गणेशमूर्ती बनवण्याचा आनंद घेतला.
पालकांना त्यांच्या लहानपणीचा अनुभव पुन्हा जागा झाला. सुरुवातीला ते मुलांना मार्गदर्शन करत होते, पण नंतर मात्र ते स्वतःही लहान मुलांप्रमाणे मातीत रमून गेले. या प्रक्रियेत सगळ्यांनीच आपले बालपण पुन्हा अनुभवले.
आजच्या व्यस्त जीवनशैलीत मुलांबरोबर असा वेळ घालवण्याची संधी दुर्मिळ असते. पण या कार्यशाळेमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सगळे मिळून एकत्र आले, आणि या सामूहिक अनुभवामुळे वातावरण आनंदाने भारून गेले.
आता मुलांनी स्वतः बनवलेल्या सुंदर गणेशमूर्ती गणेशचतुर्थीच्या दिवशी घराघरात विराजमान होतील, आणि दहा दिवस आपल्या हातांनी बनवलेल्या बाप्पाची पूजा करण्याचा आनंद सर्वांना लाभेल.
आजच्या गणेशमूर्ती कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!!

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय – Macquarie Fields शाखाआज आमच्या शाखेत स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहान...
17/08/2025

ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय – Macquarie Fields शाखा
आज आमच्या शाखेत स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यासाठी अनेक पालक उपस्थित होते. सर्वांनी मिळून राष्ट्रगीत गायले आणि त्यानंतर झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला.
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी मनोगते व भाषणे सादर केली. शिक्षक व पालकांनीही मुलांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याविषयी माहिती देत स्वातंत्र्यवीरांचे स्मरण केले.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

ऑस्ट्रेलियन मराठी शाळा – वेस्टमेड शाखाकाल आमच्या वेस्टमेड शाखेत स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व...
17/08/2025

ऑस्ट्रेलियन मराठी शाळा – वेस्टमेड शाखा
काल आमच्या वेस्टमेड शाखेत स्वतंत्र भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि ध्वजवंदनाने झाली. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना भारताविषयी प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. मुलांनीही उत्स्फूर्त भाषणांमधून भारतमातेविषयी असलेले आपले प्रेम व्यक्त केले.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या सौ. रश्मी कुकडे यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीरांच्या कथा मुलांना सांगून त्यांना प्रेरित केले.
याच कार्यक्रमासोबत, मागील आठवड्यात झालेल्या गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव सुद्धा आनंदात पार पडला. मुलांनी या कार्यक्रमात मनसोक्त मजा केली.
हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार
स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दहीहंडी आमच्या ऑस्ट्रेलियन मराठी शाळेच्या Macquarie Fields शाखेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचा रंगतदार उत्सव साजरा...
10/08/2025

दहीहंडी
आमच्या ऑस्ट्रेलियन मराठी शाळेच्या Macquarie Fields शाखेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीचा रंगतदार उत्सव साजरा करण्यात आला.

लहान मुलांसाठी हा सण म्हणजे वर्षातील एक सर्वात मजेदार दिवस असतो प्रत्येक वर्गाला स्वतःची खास दहीहंडी फोडायची संधी मिळते… आणि त्यात असतात गोड चॉकलेट्सची सरप्राईज मेजवानी

कार्यक्रमाची सुरुवात वर्गशिक्षकांकडून दहीहंडीचा इतिहास, महत्त्व आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीशी असलेले नाते याबद्दलची माहिती देऊन झाली.
"उंचावर असलेली दहीहंडी आणि तिला गाठण्याची धडपड – हे फक्त खेळ नसून जीवनात उद्दिष्ट गाठण्यासाठीची प्रेरणा आहे,
एकत्र येऊन दहीहंडी उत्कृष्ट टीमवर्क च उदाहरण आहे
फोडलेल्या हंडीतून मिळणाऱ्या चॉकलेट ओढून घ्यायच्याच पण त्या सर्वांना मिळाल्या पाहिजेत याची काळजी सुद्धा घ्यायची
दहीहंडीच्या या सणातून काही न शिकवता नकळत असे अनेक संदेश मुलांना दिले जातात.

खरी धमाल असते ती दहीहंडी फोडण्याची – मुलांनी टाळ्या, हशा आणि आनंदाच्या जल्लोषात कागदापासून बनवलेल्या आणि चॉकलेटने पूर्ण भरलेल्या दहीहंडी फोडल्या.
चॉकलेट्स इकडे-तिकडे पडताच ती गोळा करण्यासाठी सुरू झाली एकच धावपळ… आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू
या आनंदात शिक्षक आणि पालकही सहभागी झाले

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक, ॲडमिन स्टाफ आणि पालकांचे मनःपूर्वक आभार

दहीहंडी उत्सवाची काही क्षणचित्रे

रक्षाबंधन – आपल्या संस्कृतीचा सुंदर उत्सव आज ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या Westmead आणि Macquarie Fields शाखेत रक्षाबं...
10/08/2025

रक्षाबंधन – आपल्या संस्कृतीचा सुंदर उत्सव
आज ऑस्ट्रेलियन मराठी विद्यालयाच्या Westmead आणि Macquarie Fields शाखेत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला.
शाळेतील मुलांनी स्वतःच्या कल्पकतेने सुंदर राख्या बनवल्या आणि एकमेकांना बांधल्या.
कार्यक्रमात केवळ राख्या बांधण्याचा आनंदच नव्हे तर, रक्षाबंधन सणाचा अर्थ, त्यामागील कथा, आणि आपल्या संस्कृतीतील बंधुभाव व प्रेम यांचे महत्त्व मुलांना सांगण्यात आले. मुलांनीही उत्सुकतेने प्रश्न विचारून आपले शंकानिरसन केले.
दरवर्षी आमच्या शाळेत अनेक सांस्कृतिक उत्सव साजरे होतात, आणि त्यामध्ये रक्षाबंधन हा एक खास आणि हृदयाला भिडणारा उत्सव आहे. अशा उत्सवांमुळे मुलांना आपल्या सणांची माहिती मिळते, त्यांच्या मागील परंपरा व मूल्ये समजतात, आणि आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर व अभिमान अधिक दृढ होतो.

या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक, ऍडमिन स्टाफ, आणि उत्साहाने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार

Address

Macquarie Fields Public School
Glenfield, NSW
2167

Alerts

Be the first to know and let us send you an email when Australian Marathi Vidyalaya - AMV posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Australian Marathi Vidyalaya - AMV:

Shortcuts

Share

Category