15/04/2025
------------------------*१०५ वर्षांपूर्वीच्या इतिहासाला मिळणार उजाळा : मविप्रच्या पाठपुराव्याला अखेर यश*------------------------राजर्षी शाहू महाराजांच्या हस्ते १५ एप्रिल १९२० रोजी भूमिपूजन करून उदाजी मराठा वसतिगृह ही मविप्र संस्थेची पहिली वास्तू म्हणून नावारूपास आली. त्यावेळी शाहू महाराजांनी १५ हजार रुपये देणगी दिली होती. यासंदर्भात ठराव (आज्ञापत्र) करण्यात आला होता. त्याची मूळ प्रत मविप्रने केलेल्या पाठपुराव्यामुळे नुकतीच कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाकडून प्राप्त केली आहे. हा ऐतिहासिक अमूल्य ठेवा जतन व्हावा, या हेतूने या ठरावाच्या मूळ प्रतीचे आज दि. १५ एप्रिल २०२५ रोजी वसतिगृहाच्या स्थापनादिनी अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, तर प्रमुक पाहुणे म्हणून सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, संचालक अॅड. लक्षमण लांडगे, रमेश पिंगळे, सेवक सदस्य डॉ. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ.नितीन जाधव, डॉ. विलास देशमुख, डॉ. कैलास शिंदे, डॉ. अजित मोरे, प्रा. शशिकांत मोगल, प्राचार्य प्रशांत पाटील, होरायझन अकॅडमीच्या मुख्याध्यापिका डॉ. निधी मिश्रा, ज्योती सामंता, नेहा सोनवणे, दीप्ती पटेल उपस्थित होते. याप्रसंगी मविप्रच्या ११० वर्षांच्या यशस्वी वाटचालीची चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी केबीजीटी महाविद्यालयाचे विद्यार्थी, उदाजी मराठा वसतिगृहाचे माजी विद्यार्थी, उदाजी संग्रहालयाचे सर्व कर्मचारी व उदाजी अर्ली स्कूलचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. Maratha Vidya Prasarak Samaj , . Nitin Thakare Balasaheb Kshirsagar