02/07/2026
एम.आर. किट वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
कागल : पंतप्रधान दिव्यांगजन सक्षमीकरण केंद्र (PMDK) योजनेअंतर्गत दिनांक 24 जून 2026 रोजी स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय, कागल येथे विद्यार्थ्यांना एम.आर. किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य असलेल्या एम.आर. किटचे वितरण करण्यात आले. सदर किटचे वाटप कु. मयुरी चौगुले मॅडम व कु. सुशा कांबळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल पाटील सर, परिचारक श्री. अक्षय निकम सर तसेच विशेष शिक्षक श्री. नितीन कांबळे सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पंतप्रधान दिव्यांगजन सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन जीवनात सहाय्यभूत ठरणारे साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.