Dr. RGCA, Buldana

  • Home
  • Dr. RGCA, Buldana

Dr. RGCA, Buldana Dr. Rajendra Gode college of Agriculture, Buldana

Establishment 18 June 2008

आज दिनांक २९/०७/२०२४ रोजी डॉ राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे डॉ. एस. एस. हाडोळे (विद्यार्थी कल्याण अधिकारी ड...
29/07/2024

आज दिनांक २९/०७/२०२४ रोजी डॉ राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे डॉ. एस. एस. हाडोळे (विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची आढावा बैठक घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. यू. वाघ सर यांनी डॉ हाडोळे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉ. एस. एस. हाडोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचा अभिप्राय घेतला. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आज दिनांक २३ जुलै २०२४ रोजी डॉ राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण...
23/07/2024

आज दिनांक २३ जुलै २०२४ रोजी डॉ राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर यू वाघ यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन तिरंदाजी स्पर्धा २०२४ धनुर्विद्या केंद्र, बुलडाणा येथे आयोजि...
18/07/2024

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन तिरंदाजी स्पर्धा २०२४ धनुर्विद्या केंद्र, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली होती . या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. रोहित तांबे(सहाय्यक प्राध्यापक, शाररिक शिक्षण विभाग, डॉ पं. दे.कृ. वि. अकोला) हे लाभले. या कार्यक्रमाच्या प्रमूख उपस्थिती म्हणून श्री. बी. एस. महानकार सर (जिल्हा कृषी अधिकारी, बुलडाणा), चंद्रकांतजी इलग सर (भारतीय संघ प्रशिक्षक) व डॉ. राजेश वाघ (प्राचार्य डॉ. रा. गो. कृ. म, बुलडाणा) हे लाभाले. प्रमुख पाहुण्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. रोहित तांबे यांचे स्वागत प्राचार्य डॉ. राजेश वाघ यांनी केले. श्री महानकर सर यांनी मार्गदर्शन करुन स्पर्धकांचा उत्साह वाढविला. व त्यानंतर अध्यक्ष्यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम सरप यांनी केले.

16/07/2024
09/07/2024

Dr. Rajendra Gode College of Agriculture, Buldana ✨
Admission Open 2024

आज डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे  कृषि दिन तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजर...
01/07/2024

आज डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे कृषि दिन तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. यू. वाघ सर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महविद्यालाचे तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी कु. निशा काळे, कु. रीना राठोड, कु. खंडागळे , शिवम तरापुरे , यश कायंदे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते व विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे आज दिनांक २६ जून २०२४ रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात...
26/06/2024

डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे आज दिनांक २६ जून २०२४ रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर यू वाघ सर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Shahumaharajjayanti

आज दिनांक २१ जून २०२४ डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्य...
21/06/2024

आज दिनांक २१ जून २०२४ डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन योग प्रशिक्षक श्री भगवानराव सावळे सर हे लाभले. त्यांचे पुष्गुच्छ देवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. यु .वाघ सर यांनी स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगा करुन योग दिवस साजरा केला.

इंदिरा बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त डॉ राजेंद्र ...
27/05/2024

इंदिरा बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री योगेंद्रजी गोडे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त डॉ राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय व डॉ राजेंद्र गोडे नर्सिंग इन्स्टिट्यूट बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मा. श्री योगेंद्र गोडे साहेब , मा. सौ. सोनालीताई योगेंद्र गोडे मॅडम व चि. युवराज योगेंद्र गोडे साहेब व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

इंदिरा बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री योगेंद्र गोडे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त डॉ. राजेंद्र ग...
27/05/2024

इंदिरा बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री योगेंद्र गोडे साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलडाणाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Address


443001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. RGCA, Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share