Rajendra High School Khapa

  • Home
  • Rajendra High School Khapa

Rajendra High School Khapa A well known and established municipal school in saoner region founded in the year 1956.

*दुःखद वार्ता*      नगर परिषद खापा शाळेचे माजी वरिष्ठ लिपीक श्रीमान सदाशिवराव कुंभारे, यांचे काल सायंकाळी 6,30 वाजता नाग...
03/12/2022

*दुःखद वार्ता*
नगर परिषद खापा शाळेचे माजी वरिष्ठ लिपीक श्रीमान सदाशिवराव कुंभारे, यांचे काल सायंकाळी 6,30 वाजता नागपूर मुक्कामी दुःखद निधन झालेले आहे. परमेश्वर त्यांचे मृत आत्म्याला शांती प्रदान करो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. भावपुर्ण श्रध्दांजली.
💐💐🙏🏻🙏🏻

10/06/2018

*दहावीच्या निकालात नगर परिषद राजेंद्र हायस्कूल शाळेच्या निकालात पुन्हा एक मानाचा तुरा खापा परिसरात आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत प्राविण्य श्रेणीत एकुण 35 विद्यार्थी व त्यात 90 टक्के च्या वर 5 विद्यार्थी आहेत.*
*यशस्वी विद्यार्थ्यांचे नगर परिषद राजेंद्र हायस्कूल कडून हार्दिक अभिनंदन*
1.कौसर सुभेदार 94%
2.कृतीका नवले 93.20%
2.किर्ती बोरकर 93.20%
3.सुजाता गाडीगोने 92.80%
4.साक्षी दातीर 90.80%

05/11/2016
26/09/2016
09/09/2015

बाबा मला वचन द्या !"....संध्याकाळची वेळ होती. बळीराम शेतातून आला असता घराच्या दारात त्याची मुलगी व मुलगा लाईट नसल्यामुळे चिमणी समोर घेऊन अभ्यास करत होते. हे पाहून बळीरामला बरे वाटले.आणि म्हणाला, 'पोरावो, खुप आभ्यास करा...! '
असे म्हणुन मुलांच्या आईला आवाज दिला आणि म्हणाला, 'अगं लक्ष्मी..! मला जेवायचं नाही हाय...! तु सकाळी दिलेल्या भाकरीनं पोट माझ टच झाल हाय...!'
असं म्हणत डेर्यातील पाणी पिण्यासाठी घरात गेला असता घरात समशानाची शांतता...! लक्ष्मी पण पाणी पेत होती. बळीराम म्हणाला, 'तु कोरभर भाकरी खायना !'
लक्ष्मी म्हणाली, 'घरात धान्याचा एक दाणा पण नाही हाय.... कशी बशी एक भाकरी केली हाय...! आणि ती भाकरी मुलांना ठेवली हाय...! ही भाकरी खाऊन पोरांना काय देणार म्हणुन कालची कोरभर भाकरी खाल्ली हाय...! धनी तुम्ही पण कालची कोरभर भाकर ठेऊन तीच आज खाल्ली हाय ते मला माहीत हाय ना...?'
बळीराम निशब्द झाला व काही काळ थांबुन म्हणाला, 'लक्ष्मी काय कराव...? पाऊस पाणी नाय हाय...! त्यामुळे शेताचं समशान झालं हाय...!
शेतात काहीच नाय हाय..? मग काय कराव मला समजत नाय हाय...!
आणि उद्या राखी पूनव पण हाय..! आणि पोरीला एक राखी आणुन देण्याची आयपत राहिली नाय...! काय कराव हे उमजत नाय हाय..?
देव शेतकर्यावर का कोपला हाय...? आणि कीती शेतकर्याचा बळी घेणार हाय..? काय माहीत..? शेतात गेल की पोटात कालवतंय..! काय करावं तेपण समजत नाय हाय..?'
म्हणून पोटभर पाणी पिऊन बळीराम बाहेर आला. आणि म्हणाला, 'पोरावो, बिगी बिगी चला... कोरभर भाकरी खावा...!'
दोन्ही पोर घरात आली...
त्यांना सुद्धा घरची परिस्थिती ठाऊक होती .म्हणून पोर नुसती भाकर खात होती . बळीराम घरात आला. त्याची मुलगी विद्याजवळ येवून बसला... विद्या म्हणाली, 'बाबा थोडं जेवा की...! बळीराम म्हणाला, 'आत्ताच तुझी आय आणि मी जेवलो हाय..!' पण विद्याला घरची परिस्थिती काय आहे याची पुर्ण जाण होती. त्यामुळे ह्या चिमुकलीनं ना स्वता घास घेतला...अन् त्यौ तीच्या बापाला भरवला..!
आणि बापाच्या डोळ्यातून पाणी आले...! स्वत:ला सावरत बाबा शांत झाला. विद्या म्हणाली, 'बाबा ऊद्या राखी पोर्णिम हाय. मला तुमच्या कडुन एक गोष्ट पाहिजे आहे ती तुम्ही देणार ना...? अशी म्हणाली असता बळीराम हो म्हणाला... आणि विद्या जेवण करुन झोपली...!
मात्र बळीराम जागाच होता.उद्या पोरगी काय मागतीया; या विचाराने तो कासावीस होता... रात्रभर तो बाप झोपला नाही.
सकाळ झाली आणि बळीराम अंघोळ करुन गावात गेला...
एक दोघाला हात ऊसने पैसे मागितले. परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे बळीराम हाताश झाला...
त्याला काय करावं हे समजत नव्हतं... राख्या घेण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यामुळे राख्या कशा घेऊन जायच्या; या प्रश्नाने बळीराम व्याकुळ होता. आणि निराश होऊन घरी आला असता; विद्या ही घरी वाट पाहत बसली होती... बळीराम घरी आल्यावर विद्या म्हणाली, 'बाबा कीती वेळ झालं कुठं गेला होताव...? चला राखी बांधायची हाय...!' बळीराम म्हणाला, 'मी राखी आणली नाही हाय...?'
विद्या म्हणाली, 'माझ्याकडं राखी हाय.'
बळीराम अश्चयचकीत झाला आणि म्हणाला, 'तु राखी कोठून आणली हाय...? त्यावर विद्या म्हणाली, 'बाबा तुम्ही मागच्या वर्षी करदुडा आणला होता; तोच मी जपुन ठेवला होता. त्याच्या गोंड्याच्या मी दोन राख्या बनवल्या हायत...!
एक भैय्या ला बांधली अन् एक तुमच्या साठी ठेवली हाय...!
हात पाय धुवा आणि मग मी तुम्हाला राखी बांधते...!'
असे विद्या म्हणाली असता बळीराम गेला राखी बांधून घ्यायला.. परंतु त्याच्या मनात विचार होता, की पोरगी रात्रीच म्हणाली हाय, काय तरी मागणार हाय..? मात्र आपल्या जवळ दमडी पण नाही हाय...? काय करावं..? आणि पोरीला नाही म्हणालं तर... ही पोरगी जिवाला खाईल...! हा विचार बळीरामला सतावत होता. हात पाय पुसून तो पाटावर बसला आणि मुलीनं ओवाळले आणि राखी बांधली... आणि ती म्हणाली, 'बाबा मी जे मागीन ते देणार ना...? बळीराम हिम्मत करत म्हणाला, 'माग..? काय मागायच हाय ते माग...?
विद्या म्हणाली नक्की ना बाबा...! हे ऐकून बळीरामच्या ह्रद्यायाचे ठोके वाढले आणि म्हणाला बोल पोरी..!
विद्या म्हणाली, 'मला वचन द्या कशीबी परिस्थिती असना तुम्ही या परिस्थितीचा हिम्मतीने सामना करायचा...!
तुमच्या शिवाय आमचे कोण हाय या जगात...? दुष्काळाला खचुन आत्महत्या करायची नाय...? आणि मला आयुष्यभर साथ द्यायची ही ओवाळणी मला द्या...!' हे ऐकून बळीराम आणि लक्ष्मीच्या डोळ्यातुन आश्रु वाहू लागले... आणि बळीराम म्हणाला, 'होय पोरी...! मी दुष्काळाचा सामना करीन...! पण... पण आत्महत्या करणार नाही.' हे वचन बळीराम ने विद्या ला दिले. त्यावेळी विद्याला जगातील सर्वात अनमोल ओवाळणी मिळाल्याचा अनंद झाला. तिच्या चेहऱ्यावरून तसं दिसत होतं...!
🍂🍂🙏👏🌱🍃.

03/12/2014

aaplya gaavmadhe vachanalay( library) banayala havi????

comments........

21/08/2014

माझी शाळा
जुन्या आठवणीत रमता रमता
माझी शाळा अजुनही पुन्हा पुन्हा आठवते
डोळ्यातील आसवांवाटे परत ती पाझरते.
शाळेचा तो पहिला दिवस आठवणीतुन काही जात नाहीत.
बाईंचे ते प्रेमळ शब्द आता काही ऐकु येत नाहीत.
ईवल्याश्या पिटुकल्याला शाळेत सोडणारे ते आई वडिलांचे आनंदी चेहरे.
ऐकटे अनोळखी ठी़काणी रहावे लागणार
म्हणुन आईशी बिलगुन रडणार्‍या त्या पिटुकल्याचे ते निरागस डोळे.
तिथेच भेटलेल्या मित्रांचा प्रेमळ सहवास.
मस्ती केली तर मिळणार्‍या गुरुजींच्या माराचा धाक.
मित्रांच्या नकळत खाल्लेले त्यांचे डबे.
अभ्यास केला नाही म्हणुन परिक्षेत काय लिहावे?
ह्याचे दणाणलेले धाबे.
गुरुजींची नक्कल केली म्हणुन झालेली शिक्षा.
नेहमीच दुसर्‍यांना मदत करावी ही मिळालेली दिक्षा.
शाळेचा व मित्रांचा निरोप घेताना आलेले रडु
पाठीवर प्रेमळ हात फिरवत मित्रांचे ते सांगणे
"आपण परत परत भेटणार , असा रडु नकोस रे जाडु."
शाळा सोडताना हेलावलेल मन ,जडावलेले पाय,
क्षिक्षकांशी असलेल आपुल़कीच अतुट नात
मनात अजुनही जिवंत आहे.
शाळा आता नसली तरी,
माझ मन अजुनही व्यापुन आहे.
शाळा आता नसली तरी,
माझ मन अजुनही व्यापुन आहे.

17/06/2014

Congratulations to all the students and teachers of our school for 91.70% result.

Address

AT POST. KHAPA TA. SAONER DIST. NAGPUR

441101

Opening Hours

Monday 11:00 - 17:00
Tuesday 11:00 - 17:00
Wednesday 11:00 - 17:00
Thursday 11:00 - 17:00
Friday 11:00 - 17:00
Saturday 07:00 - 12:00

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajendra High School Khapa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share