Rani Saraswatidevi Kanya Shala & jr.college of science,sangli

Rani Saraswatidevi Kanya Shala & jr.college of science,sangli

Share

WOMEN'S EDUCATION SOCIETY
Since 25th September 1933

Photos from Rani Saraswatidevi Kanya Shala & jr.college of science,sangli's post 10/07/2025

आपल्या संस्थेच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा व मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या विभागामध्ये आज गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय मंगलमय व प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सांगली मधील प्रसिद्ध अशा दंतवैद्य डॉ. निलिमा लिमये उपस्थित होत्या.

तसेच याप्रसंगी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सरिता माणकापुरे यादेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

डॉ. सौ. लिमये यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थिनींना अतिशय मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या शारीरिक स्वच्छतेसोबतच मानसिक स्वच्छता ही देखील अतिशय महत्त्वाची आहे. आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहोत हे जास्त महत्वाचे आहे. आपला देह व देव या दोन्हींच्या मध्ये देश आहे व आपण आपल्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे हे सदैव आपल्या स्मरणात असले पाहिजे. या वयामध्ये आपल्याकडून कोणतेही चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही याची प्रत्येकीने दक्षता घ्यावी. आयुष्यात आपल्याला काय बनायचे आहे हे ठरवून त्याप्रमाणे ध्येयाकडे आत्तापासूनच वाटचाल करावी असे सांगून मोबाईल आणि प्रलोभने यांपासून नेहमी लांब रहा असाही सल्ला त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही काही भेटवस्तू, गुलाबपुष्प इत्यादी गोष्टी शिक्षकांसाठी आणल्या असतील, पण ज्यावेळी तुम्ही स्वतः कमवायला लागाल, तेव्हा त्या पैशातून तुम्ही एखादी भेटवस्तू शिक्षकांना दिली तर तो शिक्षकांचा खरा सन्मान आहे अशा भावना व्यक्त केल्या.

श्री. अनिलकुमार धायगुडे यांनी प्रमुख पाहुण्या डॉ. नीलिमा लिमये यांची ओळख सर्वांना करून दिली. विभाग प्रमुख सौ. उज्वला पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

इयत्ता 12 वी ची विद्यार्थीनी कु. वैष्णवी घोरपडे हिने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

14/05/2025

🎀 वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी संचलित राणी सरस्वती देवी कन्या शाळा , सांगली. 🎀
🏅🏆 उज्वल यशाची परंपरा
कायम 🏆🏅
इ. १०वी बोर्ड परिक्षेचा निकाल ९९.११ %*
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
🏆प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी🏆
🥇 कु. पाटील आकांक्षा सिद्धेशवर ९८.०० %
🥈कु.मुजावर सबा जाफर ९४.६० %
🥉कु.खिलारे मृणाल मनोज ९३.८० %
🎖️कु.पाटील दिव्या संदीप ९३.२० %
🎖️कु. पाटील सृष्टी राजेश ९२.८० %
✨✨✨✨✨✨✨✨✨✨
संस्कृत १०० पैकी १०० गुण प्राप्त विदयार्थीनी

.कु. पाटील दिव्या संदीप*

💐💐💐💐💐💐💐💐💐
सर्व यशस्वी विद्यार्थींनींचे, शिक्षक व शिक्षकेतर यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐

Photos from Rani Saraswatidevi Kanya Shala & jr.college of science,sangli's post 07/05/2025

वूइमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा, मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स व श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय मधील आर्ट्स व कॉमर्स या तीनही शाखांचा इयत्ता 12 वी चा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट लागला. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. 🌹🌹

07/05/2025
01/10/2024

*'वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी'चा ९१वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा!*

सांगली, (दि. २५ सप्टें.) स्त्री शिक्षणासाठी समर्पित, सांगलीतील सर्वात जुनी शिक्षण संस्था, 'वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी'चा ९१ वा वर्धापन दिन नुकताच दिनांक २५ सप्टेंबर रोजी बेदमुथा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, सांगली येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या जिल्हा समन्वयक डॉ. हेमा चौधरी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात बेदमुथा कॉलेज मधील विद्यार्थिनींच्या संस्थागीताने झाली. 'वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी'च्या अध्यक्षा मा. डॉ. लताताई देशपांडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना संस्थेच्या कार्याची रूपरेषा मांडली. स्थापनेपासूनच केवळ स्त्री शिक्षणासाठी समर्पित संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा, कार्याचा आढावा मांडला. त्याचप्रमाणे संस्थेतील प्रत्येक व्यक्ती, संस्थेचा घटक महत्त्वाचा असून संस्था मोठी झाली तरच आपण मोठे होऊ;असे मत व्यक्त केले. संस्थेच्या विकासात, प्रगतीमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा हातभार लागला त्या सर्वांचे त्यांनी या निमित्ताने स्मरण केले. संस्था विकासात सर्वांचे सामुहिक प्रयत्न कसे आवश्यक आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या जिल्हा समन्वयक डॉ. हेमा चौधरी यांनी, लोकांमध्ये अवयवदाना बाबत जागरूकतेतचा अभाव असल्याचे सांगितले. अनेक स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक संस्था याबाबत जनजागृती करत आहेत. पण समजुती व रुढींमुळे लोकांमध्ये अवयव दानाचा उदात्त हेतू दिसून येत नाही. अवयव दान कोण करू शकतं? कोण अवयवदान करू शकत नाही? अवयव दानासाठी कुठे संपर्क साधावा? समाजात अवयवादानाची गरज का आहे? इ. प्रश्नांचा उहापोह केला. तद्वतच अवयव दानाचे व्हिडिओ 'झुंज' , 'मानवता हाच धर्म' दाखवून मोलाचे मार्गदर्शन केले. त्वचा दानामुळे अनेक भाजलेल्या रुग्णांना जीवनदान मिळू शकते. मेंदू मृत अवयव दानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. 'अवयव हे दागिने आहेत , ते जाळू नका तर दान करा.' असे आवाहन केले.

या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख अतिथींच्या हस्ते संस्थेतील निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयाचे, माजी प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, डॉ. वर्षा गायकवाड, प्रा. अस्मिता केळकर, प्रा. डॉ. एम. एस.जोशी तर रा.स.कन्या शाळेच्या, माजी मुख्याध्यापिका श्रीमती धनश्री करमरकर, श्रीमती युथिका तेंडुलकर, श्रीमती वंदना हुळबत्ते तसेच सौ. सीताबाई मिरजकर पूर्व प्राथमिक शाळेतून श्रीमती शुभदा जावडेकर, श्रीमती सुनंदा पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.

तसेच व विशेष उपलब्धी प्राप्त केलेल्या, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अनिल सुगते, प्रा. डॉ. धनश्री देशपांडे, प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर, प्रा. डॉ. भावना मारू; गरवारे एमबीए इन्स्टिट्यूटचे प्रा. सिद्धार्थ पाटील; बेदमुथा ज्यु. कॉलेज ऑफ सायन्सचे प्रमुख प्रा. श्री. निर्भयकुमार विसपुते, प्रा. श्रीमती अश्विनी पाचोरे आणि राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेच्या श्रीमती प्रांजली प्रदीप कुलकर्णी श्री. विजय उंटवाले यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी यांचा परिचय संस्थेच्या मा. उपाध्यक्षा श्रीमती नीलाताई बोडस यांनी केला. आभार संस्थेच्या मा. कार्यवाह श्रीमती स्मिताताई केळकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या माजी अध्यक्षा श्रीमती मेधाताई भागवत, मा. सहकार्यवाह श्रीमती यशश्री आपटे तसेच संस्थेचे सर्व मा. संचालक श्रीमती मनीषा गोखले, श्रीमती विभावरी राजोपाध्ये, श्रीमती गायत्री कुलकर्णी त्याचप्रमाणे संस्थेच्या सर्व विद्याशाखांचे प्रमुख आणि प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ऋचा नातू यांनी केले.

Photos from Rani Saraswatidevi Kanya Shala & jr.college of science,sangli's post 01/09/2024

आमच्या शाळेतील एक आनंदाचा प्रसंग..

विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि आणि त्यांची जडणघडण यासाठी शाळा आणि आम्ही शिक्षक कार्यरत असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीमध्ये समाजही तितकाच सहभागी असतो. आमच्या शाळेतील वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनींना एका संस्थेने यावर्षी मदतीचा हात देऊ केला ती संस्था म्हणजे सांगलीमधील 'सेवाध्यास फाउंडेशन'!

माझी शाळा श्री. राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्याशाळा, सांगली! या शाळेमधील ज्या विद्यार्थ्यांना वडिलांचा आधार नाही अशा मोजक्या विद्यार्थिनींना शोधून त्यांच्या एकल मातांना आर्थिक मदत करण्यासाठी 'सेवाध्यास फाउंडेशन' ही संस्था पुढे आली. एक - दोन नाही तर तब्बल दहा विद्यार्थ्यांना या संस्थेने आर्थिक मदत दिली. मुलांच्या शिक्षणातील एक मोठी अडचण यावर्षीसाठी त्यांनी दूर केली. याबद्दल या संस्थेचं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं, देणगीदारांचं कौतुक करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.

जोपर्यंत अशा संस्था आणि समाज विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, तोपर्यंत हे विद्यार्थी उत्तम नागरिक घडतील यात काही शंका नाही. ही संस्था, संचालक विजय निकम आणि अमेय फाळके तसेच आणि त्यांचे वर्गमित्र देणगीदार यांचे शाळेतर्फे मनःपूर्वक धन्यवाद!

27/05/2024

🎀 वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी संचलित राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा , सांगली. 🎀
🏅🏆 *उज्वल यशाची परंपरा कायम* 🏆🏅
*इ. १०वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९५.३२%*

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

🏆प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी🏆
🥇कु. शिंदे केतकी संग्राम ९५.८०%
🥈कु.पाटील ब्राम्ही सतिश ९५.००%
🥉कु.वाटेगांवकर आदिती राजेंद्र ९४.००%
🎖️कु.पाटील गौरी अरविंद ९३.६०%
🎖️कु. मोहिते समिक्षा दिपक ९३.४०%
🎖️कु. ननवरे वैष्णवी नवनाथ ९३.४०%

✨✨✨✨✨✨✨✨✨✨

*संस्कृत १०० पैकी १०० गुण प्राप्त विदयार्थीनी*
*१.कु. पाटील ब्राम्ही सतिश*
*२. कु.ननवरे वैष्णवी नवनाथ*
*विशेष प्राविण्य प्राप्त श्रेणीत - ५८ विद्यार्थीनी*
*प्रथम श्रेणी प्राप्त ७० विद्यार्थीनी*
*द्वितीय श्रेणी प्राप्त ५५ विद्यार्थींनी*
💐💐💐💐💐💐💐💐💐

सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे संस्थेचे सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांचे वतीने हार्दिक अभिनंदन!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐

21/05/2024

राणी सरस्वती देवी कन्या शाळा व मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, सांगली...

🏆 उज्वल यशाची परंपरा कायम 🏆

इ. १२वी च्या बोर्ड परिक्षेचा निकाल ९८.७८ %

✨ प्रथम पाच क्रमांकाचे मानकरी ✨

1) कु. सिद्धी महेश साळुंखे ९१.६७ %

2) कु. स्नेहल मनोज मिरजे ९१.१७ %

3) कु. वैष्णवी विजय मोरे ८३.३३%

4) कु. पायल अमोल सुर्यवंशी ८२.६७ %

5) ईश्वरी गुरुप्रसाद पटवर्धन ८०.१७ %

सर्व यशस्वी विद्यार्थीनींचे शाळेच्या व संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!!

Photos from Rani Saraswatidevi Kanya Shala & jr.college of science,sangli's post 30/04/2024

आपल्या वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या विविध शाखांमध्ये सन 2024-25 या वर्षाची प्रवेश नोंदणी सुरू झालेली आहे.

तरी सर्व पात्र विद्यार्थिनीनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावीत.

Want your school to be the top-listed School/college?